समुपदेशन – ओळख



समुपदेशन किंवा counselling हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या कानावर पडतो. पण त्याचे नेमके स्वरूप काय असते, त्याची संकल्पना काय आहे, ह्याची माहिती असतेच असे नाही. counselling म्हणजे सल्ला असा एक समज असतो. खरेतर counselling हा खू मोठा विषय आहे. बदलणारी समाजव्यवस्था आणि जीवनशैली यात माणूस हरवतो आहे का? याचा विचार केला तर समुपदेशन हे एक जगणे सुसह्य करणारे प्रभावी माध्यम आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा बोलायला आणि ऐकायला माणसे असायची. वेळ असायचा. आज परिस्थिती बदलते आहे. आता आपण बघतो शहरांमध्ये कुटुंबाचा आकार लहान होत चालला आहे. घरात नवरा-बायको-मुले आणि आज्जी-आजोबा येऊनजाऊन असे चित्र पाहायला मिळते. नाती डिजिटल होत चालली आहेत. पण माणसाला शेवटी माणूसच हवा हे सत्य नाकारता येणार नाही. ह्या बदलत्या काळाची गरज ओळखू ह्या लेखात counselling विषयावर प्रकाश टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!

ध्या समुपदेशन हा शब्द फारच ऐकायला येतो. पण समुपदेशन म्हणजे नक्की काय?

समुपदेशन ही संकल्पना काय आहे हे नीट समजले पाहिजे. या बाबतीत अनेकांच्या कल्पना निरनिराळळ्या आहेत. कोण समजते, समुपदेशन म्हणजे सल्ला, पदेश, मार्गदर्शन. बऱ्याच वेळी समुपदेशनाबद्दल आपण ऐकलेले असते आणि त्यानुसार आपण आपले मत ठरवत असतो.
समुपदेशनाची नेमकी संकल्पना काय आहे हे आधी थोडक्यात सांगायला हवे
मन शांत नसेल तर अस्वथ वाटत राहते. डोक्यात सारखे एक ना दोन विचार चालू राहतात. शेवटी  विचार करून मेंदूसुद्धा थकतो. काय करावे, काही सुचत नाही. मग आपण अगदी जवळच्या व्यक्तीपाशी आपले मन मोकळे करतो. त्यामुळे थोडे रेही वाटते. त्या वेळी बरेच जण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सुचवतात. त्यानी धीरही येतो. मग समुपदेशन कशासाठी? असा प्रश्न साहजिकच येतो
समुपदेशक हा प्रोफेशनल  असतो. तुम्ही जे काही त्याच्याशी बोलणार असाल ते तो पूर्णपणे ऐकून घेतो. तुमच्याविषयी त्याचा कोणताच पूर्वग्रह नसतो. त्रयस्थाच्या  भूमिकेतून तो तुमच्या समस्येकडे पाहू शकतो. मोकळेपणी तुम्ही बोलू शकता. तो/ती तुमच्याबद्दल कुठे बोलणार नाही याचे त्यांच्यावर नैतिक बंधन असते.

समुपदेशक नेहमी सल्लाच देतात अशी एक कल्पना आहे. पण नेहमी तसे असते असे नाही. आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुम्ही मनातले सगळे स्पष्ट बोलू शकताच असे नाही. हळूहळू ह्या सगळ्याचा तुमच्या प्रकृतीवरही परिणाम होत असतोच. एक उदाहरण देते म्हणजे समुपदेशनाची कल्पना आणि संकल्पना आणखी स्पष्ट होईल.
समीर एक २८ वर्षांचा तरुण. शिकलेला, नामांकित कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी. समुपदेशनासाठी आला होता. त्याची तक्रार अशी होती की त्याला गेले दोन महिने नीटशी झोप लागत नव्हती. कामावर नीट लक्ष देता येत नव्हते. सहकारी नीट बोलतनव्हते. घरी आई-वडिलांसोबत विनाकारण भांडण/वाद होत होते. राग पटकन येत होता. शेवटी हे काय होतंय हे तर समजायलाच वे होते. त्याच्या वागण्यातील बदलाच परिणाम घर/ऑफिस सगळीकडे जाणवू लागला तेव्हा तो प्रथम त्याच्या फॅमिली डॉक्टरांनाना भेटला. त्यांनी टेस्ट करून घे असे सुचवले. शारीरिक रिपोर्ट नॉर्मल आले. पण बदल जाणवत होता. शेवटी डॉक्टर म्हणाले की एखादे समुपदेशनाचे सेशन का घेत नाहीस? वरवर दिसणारे हे बदल कदाचित दबलेल्या भावनांचा शरीरावर दिसणारा परिणाम असू शकतो. कसला ताण /तणाव आहे का?

रे तर समुपदेशन हा शब्द ऐकल्यावर समीर उडालाच. काय? डॉक्टर मला वेड लागले का? मला समुपदेशन वगैरे काहीच नकोय. मला काही त्याची गरज वाटत नाही. घरी आल्यावर समीरने सगळे बोलणे आईवडिलांना सांगितले. त्यांना ही जरा आश्चर्य वाटले.
त्यांनाही समुपदेशनाची गरज नाही असेच वाटत होते. उलट ते म्हणाले, अरे तुला काही बोलावेसे वाटत असेल तर आमच्याशी मोकळेपणी बोल. ठीक आहे, से म्हणून तो निघून गेला. हळूहळू महिनाभर होत आला. पण झोपेचे तंत्र काही जमेना. प्रकृती ही वारंवार बिघडू लागली. औषध घेतले की तात्पुरते रे वाटायचे. परत येरे माझ्या मागल्या. आता समीर स्वतः कंटाळला. शेवटी समुपदेशन ही घेऊन बघू या से ठरवून तो माझ्याकडे आला.
त्याच्याशी सुरुवातीला चर्चा केल्यावर लक्षात ले, की त्याला "चिंता उद्याची" नामक भीती सतावत होती. हळूहळू समीरही मोकळेपणी त्याचे लहानपण से गेले, त्याचा शालेय प्रवास कसा कष्टप्रद होता. त्याला मोठा होऊन खूप पैसे मिळवून बडा आदमी बनायचे होते. आणि नोकरीत नीट बस्तान बसूनही आजकाल त्याला कामाचे समाधान वाटत नव्हते. त्यामुळे त्याची सतत चिडचिड होत होती. डोक्यात तेच तेच विचार. याचा परिणाम म्हणून झोप नाही. मग त्याचा प्रकृतीवर परिणाम.
पण समीरला जगण्याचा एक नवा दृष्टिकोन दाखवला समुपदेशकाने. आणि सांगितले की अशा ही दृष्टींनी विचार करून बघ. प्रयत्न तरी करून पहा. फरक पडला तर चांगलेच आहे. त्याने तो अमलात आणायला सुरुवात केली. त्याला हळूहळू बरे वाटायला लागले. समुपदेशकाकडे तो मनमोकळे बोलू लागला. समुपदेशक ज्या स्पष्टतेने त्याच्याशी बोलत त्याला मार्गदर्शन करत ते जवळची माणसे करू शकत नव्हती.

समुपदेशकाकडे कधी जायचे? चांगला समुपदेशक कसा निवडायचा? समुपदेशनाचे किती प्रकार आहेत?
समुपदेशन किती प्रकारचे असते हे माही करून घेणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपल्याला कोणते समुपदेशन उपयोगी ठरेल हे समजते. सर्वसामान्य आणि जे महत्त्वाचे आहेत ते मी सांगते. कारण प्रकार बरेच आहेत. आणि मी म्हणाले से प्रॉब्लेम किंवा issue नेमका काय आहे यावर ते अवलंबून असते.
. जेव्हा मन उद्विग्न होते, रोजचे जीवन जगायला त्रास होतो

एखादी चिंता /प्रश्न भेडसावत राहातो. एखादी अशी परिस्थिती निर्माण होते की त्यातून बाहेर कसे पडावे हेच समजत नाही. अशा वेळी करण्यात येणाऱ्या समुपदेशनाला counselling for psychological distress असे म्हणतात.

. मुलांच्या संगोपनाविषयीची माहिती

एखादे मूल जन्मतःच वेगळे असेल (special child ) तर त्याला कसे वाढवावे याचे मार्गदर्शनही समुपदेशक करतात.
. आपल्या सगळ्यांना परिचयाचे असलेले career counselling - मुलांना अभ्यासक्रम निवडीसाठी असे मार्गदर्शन निगडित असते.
. Family counselling - 
यात कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती समाविष्ट असते. याचे कारण संपूर्ण कुटुंब अडचणीत असते. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य आणि त्याच्याशी बोलणे गरजेचे असते.
. अजून असते ते marital counselling  - 
यात समजा नवरा आणि बायको दोघांत मतभेद असतील. एकमेकांसोबत राहणे अवघड होत असेल तर किंवा काही family issues असतील तर.
. काही व्यक्ती व्यसनाधीन असतात. 

तेव्हा ती व्यक्ती आणि संपूर्ण कुटुंब ह्याला वेगळ्याच संकटाना सामोरे जावे लागते. जसे आर्थिक अडचणी, घरात सतत होणारी भांडणे, शारीरिक आणि मानसिक छळ. तेव्हा अशा व्यसनाधीन व्यक्तीला आणि त्याच्या/तिच्या पूर्ण कुटुंबाला समुपदेशक, व्यसनमुक्ती केन्द्र / किंवा संस्था यांचे  चांगले सहकार्य होते. ज्यांना साधारण एकाच प्रकारचे issues असतील त्यावेळी group counselling  ही केले जाते. त्या गटामध्ये साधारण ते १०पर्यंत लोक एका वेळी भाग घेऊ शकतात.
असे counselling  चे ढोबळ प्रकार आहे.
. काहींना गंभीर स्वरूपाचे आजार झाले असतील तर त्या आजाराचे स्वरूप काय आहे किंवा त्या आजाराशी निगडित अशा चिकित्सा कोणत्या आहेत याची माहिती देणे.
. सर्वात महत्त्वाचे, काहींना मानसिक आजार असतील तर counselling त्याच्या पूर्ण कुटुंबाला केले जाते. याचा फार फायदा होतो.
. आता anxiety/ depression यावर तर counselling therapy फारच परिणामकारक ठरता.
आता एक लक्षात आले असेल की counselling म्हणजे काही नुसता सल्ला/ मार्गदर्शन नाही तर त्या व्यक्तीला/कुटुंबाला एक जगण्याची नवीन दिशा मिळते.
समुपदेशक हे नेहमी सल्लाच देतात का? आणि समुपदेशक काय शिकलेला असावा?

समुपदेशक बेसिक counselling चा  course केलेले असतात. काही psychology/ psychological counselling / Clinical Psychology शिकलेले असतात.
समुपदेशकाचा अनुभव किती आहे? कोणत्या प्रकारचे counselling तो करू शकतो हे प्रत्यक्ष विचारायला काहीच हरकत नाही. जर कोणी referral देत असेल तर जास्त चांगले.
What is the difference between psychiatrist and psychologist and counsellor?
हा खूप महत्त्वाचा प्रश्न
मानसोपचार तज्ञ / Psychiatrist हा वैद्यकीय शिक्षण घेतलेला असतो. हे डॉक्टरच औषधे / medication देऊ शकतात. गरजेप्रमाणे therapy / hospitalization / tests यांचे निर्णय घेऊ शकतात .

मानसशास्त्रज्ञ/psychologist हे समुपदेशन / counselling and Therapy देतात. पण ते medication / औषधोपचार देऊ शकत नाही. पण काही मानसिक चाचण्या घेऊ शकतात.

समुपदेशक /counsellor बोलून / सल्ला देऊन / मार्गदर्शन करून मानसिक आधार देऊ शकतो.

समुपदेशनासाठी किती वेळ लागतो?
हे रे तर तुमच्या मानसिक स्थितीवर/ आजार आणि समुपदेशकाच्या अनुभवावर/ त्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. त्याला मदतीचा हात देणारी किती आहेत? घरातील लोकांचे वागणं कसं आहे? आजूबाजूची परिस्थिती कशी आहे? अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

पण हे वाचल्यावर मनात अजून एक प्रश्न येतोच कि counselling चा खरंच फायदा होतो? याबद्दल आणखीन जाणून घेऊया पुढच्या लेखात!!!


क्रमशः
डॉ. पूर्वा रानडे


3 comments:

  1. वरील लेखात इतक्या सोप्या, सुंदर शब्दात तू समुपदेशनाची प्राथमिक माहिती दिली आहे कि पुढचे लेख वाचायची उत्सुकता अगदी नक्कीच वाढली.

    ReplyDelete
  2. खूप उपयोगी माहिती सांगितली आहेस,साधं, सोपं, सुटसुटीत लिखाण

    ReplyDelete