समुपदेशन ८-COVID-१९ प्रश्न आजचे आणि उद्याचे


जगभर COVID -१९ ने घातलेला धुमाकूळ------
माननीय नरेंद्र मोदीजींनी देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेचा विचार करून अमलात आणलेला २१ +दिवसांचा lock down........ 
प्रत्येक न्यूज चॅनेल वर corona tested +, death टोल चे आकडे, त्यातून होणाऱ्या चर्चा, dos आणि don'ts, whats app वरचे forwards, तज्ञ डॉक्टरांची CORONA विरुद्धची लढाई…… 

या काळात मनात असंख्य प्रश्न  उमटत असतील. घरी असणाऱ्या/काम करण्याऱ्या महिला - घरातील काम???, ऑफिसचे काम? रोजचे भाजीपाला, किराणा सामान ??, मुलांचे भविष्य?, एकटे असणारे / एकत्र कुटूंबात राहणारे वृद्ध या चिंतेत की आपल्याला काही झालं तर पाहणार कोण? आणि शेवटी केंव्हा संपणार हे?

आज अनुभवत असलेले अनिश्चिततेचे वातावरण मनावर कळत नकळत परिणाम करते आहे. जसे चिंता/काळजी (anxiety), एकटेपण (loneliness ), नैराश्य (depression), अनामिक भीती (स्वतःची, आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांची), ताण (stress)…. इत्यादी.
ह्या काळात मानसोपचार तज्ञ आपल्या परीने या काळात मानसिक संतुलन कसे सांभाळावे याचे मार्गदर्शन करत आहेत. एक मानसशास्त्रज्ञ म्हणून अशा ह्या lock down काळात स्वत:ला कसे जपू शकतो याबद्दलचा माझा एक खारीचा वाटा.

नंतर अजून किती दिवस? असं वाटताना आता केंव्हा हे संपणार यावर वेळ खर्च करण्यापेक्षा प्रत्येक क्षण सजगपणे जगूया. ही मिळालेली एक संधी आहे त्याचा मी जास्त फायदा कसा करीन? हे जास्त महत्वाचे... ड्रेसवर डाग पडला तर कसा पडला? कुणी पाडला? कधी पडला? यावर उहापोह करण्यापेक्षा तो लवकरात लवकर कशाने काढता येईल? हा विचार महत्वाचा.

माझे आजच्या दिवसाचे वेळापत्रक  कसे आहे? यात काम, झोप, फुरसतीच्या वेळ (विश्रांती) यांचा त्यात समावेश/ अंतर्भाव आहे ना? याचा विचार होणं गरजेचें...?

मी स्वतः हेकेखोरपणे वागतो आहे का?, किंवा एकाद्या गोष्टीचा आग्रह/हट्ट धरते/धरतो आहे का? बरचसं काम मी स्वतः करते का? किंवा मला कोणते काम दुसऱ्यावर सोपवणे शक्य आहे का? कारण जेंव्हा कोणी मदत करतं तेंव्हा, आपण आणि दुसऱ्यानी केलेल्या कामात फरक पडण्याची शक्यता असते. ते मला पसंत पडते का? का याच वेळी, हे असंच, मला अशाच पद्धतीने लागतं या आग्रहामुळे  मी चिडचिडी होते /होतो. याचा stress येऊ शकतो. थोडंसं काम झालं किंवा नाही झाले किंवा पुढे ढकललं तरी चालू शकते का? आपल्या सवयी आणि सध्याची गरज काय आहे? यावर विचारपूर्वक नियंत्रण (conscious thinking) ठेवलं तर बऱ्याच अंशी ताण कमी होऊ शकतो.

सगळ्यांनी मिळून घर सांभाळायचे आहे तेव्हा मुलांना सुद्धा त्याना जमतील अशी कामे  सांगण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे अवघड परिस्थितीशी सगळ्यांनी कसा सामना करायचा याचा एक धडा आपण नकळत शिकवून जाऊ.

जर घरी वृद्ध आई वडील असतील तर त्यांना वेळ देऊन आयुष्यातील चांगल्या घटनांची उजळणी त्यांना आनंद देऊ शकते. घरच्या वयस्क मंडळींना त्यांना झेपेल इतपत काम करू दयावेजेणे करून त्यांचे लक्ष कामात गुंतेल. वय झालेल्या नातेवाईकांना फोन करून त्याची चौकशी केली तरी त्याचा एकाकीपण काही अंशी दूर होऊ शकते.

आपल्यातील कला गुण, गाणं, पैंटिंग, वाचन, लेखन, yoga, मोबाईल, whats app sharing, नवे पदार्थ बनवणे, शब्दकोडी (आयती /स्वत: बनवलेली) सोडवणे यामुळे वेळ जाण्यास /एकटेपणा कमी होण्यास मदत होईल. गुगलवर अशा अनेक कल्पना मिळू शकतात.

एखादे नवीन काम किंवा skill शिकण्यास हरकत नाही, मुलांसाठी घरच्याघरी activity तयार करणे - स्वत: सहभागी होणे. मिळालेल्या वेळेचा संधी समजून सदुपयोग करायचा.
जे आपल्या परिवारापासून लांब आहेत, पैशाची अडचण आहे, तब्येतीविषयी तक्रार असेल, त्यांना चिंता/काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण आपले काय/कसे  होणार,  त्याचे परिणाम काय होतील याच्या विचारांच्या गुंत्यात फ़सण्याऐवजी, त्यावरचे समाधानकारक पर्याय शोधण्यासाठी जास्त वेळ देणे श्रेयस्कर.

गरज पडली तर मार्गदर्शन घेता येते  हा  विचारही मनाला दिलासा देतो. परिस्थिती कशी असेल हे आपल्या हातात नाही, तरीही सद्य परिस्थितीत आपल्याला काय करता येईल हा सकारात्मक दृष्टिकोन बराच काही फायदा करून जाईल.

Join fight against CORONA. and Stay home stay safe

पूर्वा रानडे


1 comment:

  1. Every single person, their habits are totally different and if it is not as per our expectations, then clashes start. So for that reason counseling is very important. The cases of domestic violence during lock down period has increased all over world, which is very serious.

    ReplyDelete