दीप शोभे माझ्या दारी
तिन्ही सांजेच्या प्रहरी
वंदोनी आशिषा घेई
मनोभावे....
दीप साजिरा सुंदर
उजळवी घर परिसर
चित्त सात्विक प्रसन्न
समाधानी...
दीप सोन्या-मृत्तिकेचा
असे संतुष्ट भावाचा
फक्त तेल वातीचा भुकेला
निस्पृहसा...
दीप वसे आरतीत
भावा बहिणीच्या प्रेमात
जन्मदिनी यासी मान
औक्षणात...
दीप शांत नवरात्रीचा
आदिशक्तीच्या पर्वाचा
तेवतसे मंद ज्योत
अखंडीत...
दीप राजा दीपावलीचा
आनंदाच्या उत्सवाचा
तमातूनी प्रकाशाच्या
वाटचालीचा...
दीप श्रेष्ठ तो ज्ञानाचा
दूर सारी पडदा मायेचा
गुरुकृपे साक्षात्कार
आत्मबोधाचा...
शुभदा पाठक
वा वा छान यमक पूर्ण अर्थगर्भ काव्यरचना...नंदकिशोर लेले पुणें
ReplyDeleteSunder,aprateem
ReplyDeleteदिव्यासारखीच प्रसन्न कविता!
ReplyDelete