दीन मी,अजाण मी



या सावळ्याची शोभा, सांगू मी किती
दीन मी, अजाण मी, मी पामर, अल्पमति

नटखट हा नंदकिशोर, राजस हा नवनीतचोर
करतो किती खोड्या, गोपींचा हा चित्तचोर

या नंदलालाची शोभा, सांगू मी किती
दीन मी अजाण मी, मी पामर, अल्पमति

कन्हैया हा यशोदेचा, कान्हा हा गोकुळचा
मनमोहन हा राधेचा, देवकीनंदन राजा द्वारिकेचा

या यदुवीराची शोभा, सांगू मी किती
दीन मी, अजाण मी, मी पामर, अल्पमति

हा श्याम, हा सुंदर, श्रीकृष्ण हा सावळा
हा गिरीधर, हा मुरलीधर, श्रीरंग गोपाळा

या घनश्यामाची शोभा, सांगू मी किती
दीन मी अजाण मी, मी पामर अल्पमति

कोणी म्हणती वासुदेव, कोणी म्हणती हरी
रास रचतो गोपींसवे, नृत्य करीत भूजंगावरी

या गोविंदाची शोभा, सांगू मी किती
दीन मी अजाण मी, मी पामर अल्पमति

जाहली वेळ युद्धाची, जमले रथी महारथी
दिली शिकवण गीतेची, द्वारकाधीश झाला पार्थसारथी


या मुकुंदाची शोभा, सांगू मी किती
दीन मी अजाण मी, मी पामर अल्पमति

किती किती त्याची नावं, कोणते म्हणावे गोड
कोणी म्हणती केशव, कोणी म्हणती रणछोड

या माधवाची शोभा, सांगू मी किती
दीन मी अजाण मी, मी पामर अल्पमति

धरुनीया हरिचरण, बोला नारायण, नारायण
अवघे जीवन झाले भजन, केले सर्व कृष्णार्पण


प्राजक्ता पाठक





1 comment:

  1. वा प्राजक्ता ताई खूप मस्त

    ReplyDelete