उजळून टाकी दाही दिशा
वातीसंगे इवला दिवा
अंधार भेदण्या हाती हवा
प्रकाशाचा दिवा...
अज्ञानाने गोंधळ उडता
काय करावे कधी न कळता
मार्ग शोधण्या हाती हवा
ज्ञानाचा दिवा...
दुराचाराचा राक्षस फिरता
अस्मितेवर घाला पडता
संहार करणाऱ्या हाती हवा
शक्तिचा दिवा...
क्रोधाने जीव जळता
दुर्विचार थैमान घालता
शांतीसाठी हाती हवा
संयमाचा दिवा...
आयुष्य सुंदर सगळ्यांचे
आनंदाने भरुन जावे
फक्त मनी असावा
वात्सल्याचा दिवा...
डॉ. हेमलता चौधरी
Superb this poem as it is this all words and line to line for humanity's relationship.......👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
ReplyDelete