भिकारी,
बेघर वस्ती;
गांजा
नशेडी अड्डा;
जो
कोणीही उचलत नाही, असा कचरा
फेकण्याची जागा;
भरकटलेल्या
किंवा धुमसत असलेल्या तरुणाईची ग्राफिती करायची जागा;
हिजड्यांचा-कॉल गर्ल्सचा गिऱ्हाइकं पटवण्याचा अंधारा आडोसा;
फुकटात
मुतायसाठी पिलर्समागच्या खुल्या मुताऱ्या;
नवीन
रिलीज झालेल्या जाहिरातींची पोस्टर फुकट उंच ठिकाणी चिकटवायची जागा....
अर्थात
'पुलाखालच्या जागा' हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलंच असेल.
शहरं
मोठी होताना, मोकळ्या जागा - सार्वजनिक जागा
कमी होत जातात. अशात पुलाखालच्या जागा नुसत्या मोकळ्या पडून असल्याने, सर्व
प्रकारची घाण व निषिद्ध कामं करण्यासाठी याच जागा लोकं वापरतात.
पण
बंगलोरमध्ये मात्र काहीतरी वेगळं घडतंय.
तुम्हाला
वाचून आश्चर्य वाटेल की भारतातल्या आकारमानाने दुसऱ्या नंबरवर व लोकसंख्येने
तिसऱ्या नंबर वर असणाऱ्या बंगलोर शहरात मात्र 40 पैकी
30 फ्लायओव्हरखालच्या जागा स्वच्छच दिसतात व तिथल्या पिलर्सवर
एकही पोस्टर अथवा जाहिराती दिसत नाहीत.
हे
कसं घडलं?
बंगलोरच्या
'India
Rising Trust' ने अशा जागा स्वच्छ व सुंदर बनविण्याची आणि राखण्याची
जबाबदारी स्वयंप्रेरणेने उचलली.
सन 2015 ते 2016 या काळात फ्लायओव्हरखालच्या जागा स्वच्छ केल्या. त्या
जागा नेटक्या व रिस्पेक्टेबल वाटाव्यात याकरता पुलांचे खांब व पुलांच्या भिंती एका
विशिष्ट पॅटर्नने रंगविल्या.
यासाठी परवानगी
- सरकार व आजूबाजूच्या लोकांची.
पैसे
- आजूबाजूच्या व्यावसायिक कंपन्यांच्या CSR फंडाच्या डोनेशनचे.
मनुष्यबळ
- प्रत्यक्ष शहराचे नागरिक.
अशा
पद्धतीने काम केलेल्या या जागा नुसत्या स्वच्छ,सुंदर टिकल्या नाहीतर सरकारनी पण
याची नोंद घेऊन लोकांसाठी विविध सोयी आणि स्वच्छतेच्या कामासाठी लागणारी साधनं व
व्यवस्था उपलब्ध करून दिली. लवकरच सार्वजनिक उद्यानांप्रमाणेच हे फ्लाय-ओव्हर 'adopt-a-flyover'
अशा योजनेतून स्वच्छता व सौन्दर्यवृद्धीसाठी प्रायव्हेट कंपन्या व
सामाजिक संस्थांना देण्याचा उपक्रम बंगलोरच्या महानगरपालिकेने सुरू केला आहे. त्याच्या
नियम व आराखड्याविषयी आम्ही सरकारला सल्ला व साहाय्य पुरवत आहोत.
या
प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी सोबत लिंक पाठवत आहे.
http://theuglyindian.com/PPS/ProjectUFO/
आता गेल्या 2 वर्षांत India Rising Trust ने या जागा या लोकांना वापरण्यासाठी सोयीस्कर अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन साकार करण्यास सुरुवात केली आहे.
मला सांगण्यास अभिमान वाटतो कि सार्वजनिक जागांमधील स्वच्छता व रखरखाव याविषयीच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मी या संस्थेत Chief Design Officer म्हणून सुरुवातीपासून काम करतो आहे.
आता गेल्या 2 वर्षांत India Rising Trust ने या जागा या लोकांना वापरण्यासाठी सोयीस्कर अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन साकार करण्यास सुरुवात केली आहे.
मला सांगण्यास अभिमान वाटतो कि सार्वजनिक जागांमधील स्वच्छता व रखरखाव याविषयीच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मी या संस्थेत Chief Design Officer म्हणून सुरुवातीपासून काम करतो आहे.
५
फेब्रुवारी २०२० रोजी आम्ही फ्लायओव्हरखाली उभारलेल्या आमच्या पहिल्या ‘थीम पार्क’चं
उदघाटन बंगलोर शहराच्या कमिशनरने केलं.
कर्नाटक
हा वन्य संपदेच्या बाबतीत जगात अव्वल व एकमेवाद्वितीय आहे ह्या वस्तुस्थितीची
कल्पना लोकांना होत राहील, यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन होईल असं थीम पार्क,
आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील 'वीरणापाल्या' या फ्लाय ओव्हरखाली बनवलं. यात वापरलं
गेलेलं लाकूड, काँक्रीट पेवर्स, व
लोखंड हे 90% प्रमाणात रिसायकल्डच वापरलं. पाण्याचा अवास्तव
वापर टाळण्यासाठी आर्टिफिशल लॉनचा वापर केला आहे.
तुम्हा
सर्व आप्तस्वकीयांना ह्या कामगिरीबाबत सांगताना विशेष आनंद होत आहे.
सोबत
थीम पार्कमधील sculpture व रचनेचा अंदाज देणारा एक छोटासा विडिओ पाठवत
आहे.
https://youtu.be/5WnJQHE4SDs
धन्यवाद!
अनिरुद्ध अभ्यंकर
ग्रेट काम!
ReplyDelete