एहसास प्रेमाचा


सिर्फ एहसास है
रुहसे मेहसूस करो 
प्यारको प्यार ही हेने दो 
कोई नाम न दो...


प्रेम एक अनुभूतीएक जाणीवखोल हृदयाच्या आत जाणवणारीअत्यंत उत्कट भावना. प्रेमाला उपमा नाही आणि आणि त्या भावनेची कशाशीही तुलना नाही. तुम्ही कधी प्रेमात पडला आहात का?  किंवा तुमचा कधी प्रेमभंग झाला आहे काकिती खाजगी प्रश्न आहे नाही! स्त्री-पुरुषातील प्रेमओढ यावर अनादी काळापासून ते आजपर्यंत आणि पुढेही जिथवर सृष्टी आहे तोवर बोललं आणि लिहिलं जाणार. हा विषय चिरतरुण आणि अमर आहे. आपण स्त्रीपुरुष प्रेमसंबंधावर कादंबऱ्या वाचतोएकसे एक चित्रपट पाहतोकवितागाणी ऐकतो; पण या संबंधातील उत्कटतात्यातील तरलतागोडवाभावनिक चढाओढी आणि कटुताही प्रत्यक्षात त्या सर्व वर्णनांहूनहीगाण्यांहूनही,  चित्रपटांहूनही अधिक नाट्यमय असू शकतात. हे अनुभवण्यासाठी प्रेम करून पहायला पाहिजे 😊 आणि एखादा प्रेमभंगही अनुभवायला पाहिजे. 

अथांग असा हा विषय आहे... 
माझी एक मैत्रीण मला एकदा म्हणाली होती, प्रेमबीम काही नसतं, life is a chemical orchestra. पण मला मात्र वाटत असं काही नसतं, निसर्गाला हवी असते पुनर्निर्मिती, त्यामुळे निसर्ग नियमाने नर आणि मादी एकमेकांकडे आकर्षिले जाणं हा तर निसर्गनियमच आहे. पण  माणूस हा एक असा प्राणी आहे जो त्याच्या बुद्धीने, शब्दातून, स्पर्शातून, कृतीतून भावनांचं जाळं विणत जातो, आणि नैसर्गिक आकर्षण ही पाहिली पायरी ओलांडून भावभावनांचे इमले रचत जातो, कुणी कळसापर्यंत पोहोचतो, कुणाच्या नशिबात कळसापर्यंत पोहोचणं नसतं. पण कळसावर आयुष्यभर टिकून राहणं, प्रेमाची ओढ, उत्कटता, त्या परिपूर्तीत सतत जीवन जगणं आणि शेवटपर्यंत प्रेमाचा टवटवीतपणा  तसाच  टिकवणं फार फार थोड्यांना जमतं...  


त्याला ती पाहते, तिला तो पाहतो, दोघं एकमेकांना चोरून पाहतात, "पाहताना मला... मी तुला पाहिले" त्या क्षणी काळजाचा ठोका चुकतो, आणि जर तारा जुळल्या तर सगळं जग अचानक गुलाबी दिसायला लागतं... मग गाठीभेटी, रुसवेफुगवे, मी तुझी, तू माझापासून ते तुझ्याशिवाय मी जगू शकत नाहीपर्यंतचा गोड गुलाबी प्रवास... न पिताच चढलेली नशा. ही अवस्थाच फार unique असते. मानवी जीवनात जागेपणी चालू असलेलं ते एक गोड स्वप्न असतं... प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी हे अनुभवावं असं...
प्रेम म्हटलं की हृदयाचं चिन्ह दाखवतात. प्रेमभंगासाठी दुभंगलेल हृदय दाखवतात. काय असतो हो प्रेमाचा आणि हृदयाचा संबंध?

शब्दांच्या पलीकडलेश्वासांच्या अंतरात
ये हृदयीचेते हृदयी पोहचविले निःशब्दात

प्रेम म्हणजे खऱ्या खऱ्या physical हृदयाचा मामला... बाकी गोष्टी मेंदूला समजतात, मनाला भिडतात... पण हृदय to हृदय  जे थेट connect होतं ते प्रेम, just like wi-fi. भेटीसाठी, अगदी मेसेजसाठीची व्याकुळता असो किंवा भेटी नंतरचं miss  करणं असू देत, सगळा त्रास खऱ्या खऱ्या हृदयाला होतो... प्रियाच्या सहवासात तृप्तीचा अनुभवही हृदयात जाणवतो आणि विरहाचा दर्दही हृदयातच  सलतो. प्रेमभंगाविषयी तर लिहायलाच नको... आपलं सर्वस्व वाटणारी आपली व्यक्ती आपल्याला सोडून देते, दुसऱ्याची होते, आपल्याला नाकारते याची वेदना तीव्रतेने हृदयात उमटते, खरं खरं हृदय दुखतं जसा दात किंवा डोकं दुखत तसं... म्हणूनच exclusively  प्रेमासाठी हृदयाचं चिन्ह...

खरं प्रेमखोटं प्रेमउथळ प्रेमगाढ प्रेमतीर्थासारखं सात्विक प्रेम आणि फसफसून वाहणाऱ्या champagne सारखं मादक प्रेम... आपण प्रेमात नसतो तेव्हा आपण संस्कृती रक्षक आणि अगदी judgmental असतो, पण बागेत बसलेले प्रेमिक आणि पारव्याच्या जोडीत काय फरक असतोते उडणारे पक्षी असतातहे प्रेमपक्षी असतात 😊अगदी पाश्चात्त्य जगात आणि अलीकडे आपल्याकडेही दिसणार  प्रेमिकांचं public display of affection असो किंवा यांना आवडते म्हणून अळूची भाजी केली म्हणणाऱ्या आजीबाईंचं त्यांच्या पंतोजींवरचं प्रेम असो, Love is beautiful in all its forms. 

तर असं हे प्रेम... पण दुर्दैवाने प्रेम शापित असतं, त्याला  खरा शाप असतो एकमेकांना गृहीत धरण्याचा, अपेक्षांच्या ओझ्यांचा, अहंकाराचा आणि स्वामि त्वाच्या (possessiveness ). हे वाक्य पुन्हा एकदा वाचा, तुम्हाला मनोमन पटेल. जिने आपली झोप उडवलेली असते, जी प्रत्येक स्वप्नात दिसते ती व्यक्ती एकदा आपलीशी झाली की आपण तिला गृहीत धरू लागतो, तिला अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरवून टाकतो, कधी अहंकार, प्रेमापेक्षा मोठा होतो... ती पाहिली व्याकुळता, आर्तता, झुरणं, वाट पाहणं रोजच्या व्यवहारात लुप्त होतं, कधी कधी स्वामित्वाच्या भावनेने आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत... प्रेम नसतं असं नाही पण त्यातला ताजेपणा, उत्कटता तितकीशी अनुभवता येत नाही कारण प्राधान्यक्रम बदलतात, ताण वाढतात... जी व्यक्ती सतत समोर हवीशी वाटायची, ती चार दिवस माहेरी नाही तर टूरवर जाईल तर बरे असे वाटते.... कारण आपण एकमेकांचं एकमेकांना बांधून राहणं कमालीच्या बाहेर गृहीत धरतो.... 'इतुके आलो जवळ सखे की जवळपणाचे झाले बंधन' असं काहीसं होतं... म्हणजेच प्रेम maintenance free नसतं. त्यालाही टिकवायला, फुलवायला, टवटवीत ठेवायला effort घ्यावे लागतात... मग त्यात एकमेकांची सुखदुःखं वाटून घेणं आलं, काळजी घेणं आलं, कौतुक करणं आलं, समजून घेणं आलं प्रोत्साहन देण आलं; सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे respect देणं आलं आणि वेळोवेळी शब्दांनी, स्पर्शानी, विचारांनी, प्रेमळ कटाक्षाने व्यक्त होणं आलं. ही प्रेमाची उघड अभिव्यक्ती फार महत्त्वाची आणि सुंदर असते. इथेच थांबते. 

माझ्या शब्दात प्रेम म्हणजे -

अंतरीचा अंतराती
एक अनाहत नाद 
जीवनाला जीवनाची 
अशी निरंतर साद

भावनांची स्पंदने अन्
आठवांची कंपने 
हे विलक्षण काहीसे
हृदयातूनी झंकारणे 

नीरव सारे आतुनी
ऐकू येतो तो ध्वनी 
संगीत सुंदर  जीवनाचे 
टाकते मन  मोहुनी 

तीच वेळा तीच घटिका 
तेच अपुले  जोडणे 
पळभरासाठीच ऐसे 
माझे-तुझे  हे भेटणे


अलका देशपांडे


1 comment:

  1. लेखाला तुझ्या सुंदर कवितेची जोड !! नेहमी प्रमाणे सहज सुंदर

    ReplyDelete