गीताई:अध्याय 2 सांख्ययोग


गीतेचा दुसरा अध्याय सांख्ययोग. या अध्यायात ७२ श्लोक आहेत. खूप मोठया आणि नाट्यमय अशा या अध्यायाविषयी मी दोन भागात लिहायचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या अध्यायात विषाद योगात दुखाने खिन्न झालेल्या, शोकाकुल गलितगात्र अवस्थेतल्या अर्जुनाचे वर्णन संजय धृतराष्ट्राला ऐकवतो.
असा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रू गाळीत
करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला

श्रीकृष्ण या अध्यायात अर्जुनाला या विकल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरतात. सर्व प्रथम ते अर्जुनाची अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना करतात.

कोठुनी भलत्या वेळीं सुचले पाप हे तूज
असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ती, दुर्गती
निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी तूज
भिकार दुबळी वृत्ती सोडूनि उठ तू कसा

वेळपरत्वे अगदी जवळची व्यक्तीही आपल्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी किती कडक शब्दात झोडून काढू शकते याचं  हे उदाहरण आहे. कृष्ण अर्जुनाला निर्वीर्य म्हणजे षंढ, भिकार, दुबळ्या वृत्तीचा असं अगदी लागेल असं बोलतो. (पण अर्जुन तू मला असं का बोललास म्हणून चिडून रागावून निघून जात नाही ) अर्जुन तरीही आपल्या गलितगात्र अवस्थेचं  समर्थन करणारी philosophy पुढे रेटतच राहतो. अगदी सामान्य माणसासारखाच.

कसा रणांगणी झुंजू? भीष्म द्रोणा विरुद्ध मी
ह्यांस बाण कसे मारू आम्हा पूजनीय की
न मारिता थोर गुरुंस येथे
भिक्षा ही मागुनी जगावे
हितेच्छु हे, ह्यांस वधुनी भोग
भोगू कसे भंगुर रक्त -मिश्र

अर्जुनाला आप्तेष्टांशी लढण्यापेक्षा भीक मागून जगणे अधिक श्रेयस्कर वाटायला लागते.
अशा प्रकारे अर्जुन "नाही रे", "नको रे" "मला जमणार नाही" चा शेवटचा रेटा लावून पाहतो
आता मात्र श्रीकृष्ण, अर्जुनाच्या रथाचेच नव्हें तर त्याच्या बुद्धीचे सारथ्य हाती घेतात. या पुढे जाऊन मी म्हणेन या पुढच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अखिल भारतवर्षाच्या, हिंदू संस्कृतीच्या जगण्याचा, धार्मिक संकल्पनाचा, विश्वासांचा (beliefs) पाया रचतात. आज हजारो वर्षांनंतरही आपलं जीवन या ज्ञानावर बेतलेलं आहे. भगवान म्हणतात -
करिसी भलता शोक वरी ज्ञान ही सांगसी
मेल्याजित्या विषयी शोक ज्ञानवंत न जाणती
अर्जुनाला अज्ञानी ते ज्ञानवंता पर्यन्तचा प्रवास कसा घडवला जातो ते पहा. Very interesting.
मी आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी
तसे ची सगळे आम्ही न पुढेही असू कधी
ह्या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी
तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे
आपल्यापैकी कुणीही पूर्वी कधीही नव्हतं आणि पुढेही कधी नसणार. जसं बाल्य, तारुण्य, वृद्ध अवस्था असतात आणि त्या नंतर नवा देह प्राप्त होतो.
नसे मिथ्यास अस्तित्व, तसे सत्यास नाशही
निवाडा देखिला संती, ह्या दोहींचा अशा परी
फार मोठे  ज्ञान इथे भगवंतांनी सांगितलं आहे, की असत्याला अस्तित्व नसतं आणि सत्याचा कधीही नाश होऊ शकत नाही.
जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे
दोघे न जाणती काहीं न मारे न मरेची हा
पुढचे २२ आणि २३ क्रमांकाचे श्लोक जगप्रसिद्ध आहेत. ते संस्कृत आणि मराठीतही देत आहे.



वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही।।२२।।
सांडूनियां जर्जर जीर्ण वस्त्रे
मनुष्य घेतो दुसरी नवीन
तशीची टाकुनी जुनी शरीरे
आत्मा ही घेतो दुसरी निराळी

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।२३।।
शस्त्रे न चिरती ह्यास, ह्यास अग्नी न जाळितो

पाणी न भिजवी ह्यास, वारा न वाळवी
चिरवे, जाळवे ना हा भिजवे वाळवे ही ना
स्थिर निश्चळ हा नित्य सर्व व्यापी सनातन
न देखू न ये न चिंतू ये बोलिला निर्विकार हा
जाणुनी ह्यापरी आत्मा शोक योग्य नसे तूज

जशी वस्त्र बदलावीत तसा आत्मा नवनवीन शरीर बदलतो. आत्म्यास कोणी जाळू, शस्त्राने छेदु वा भिजवू शकत नाही. नित्य, निश्चळ, सनातन अशी ही आत्मशक्ती आहे, हे जाण आणि त्यासाठी शोक करू नको.
पुढे याहुनी एक उत्तम श्लोक श्रीकृष्ण सांगतात -
भूतांचे मूळ अव्यक्ती, मध्ये तो व्यक्त भासतो
पुन्हा शेवट अव्यक्ती त्या मध्ये शोक काय सा?

इंग्रजीत सांगायचं झालं, तर आपला हा प्रवास No body to some body and from some body to again no body असा असतो, मग यात कशाचा शोक करायचा? आत्मा अमर अविनाशी आहे. तो अव्यक्त असतो, शरीर रूपात व्यक्त होतो आणि जीर्ण शरीराचा त्याग करून पुनः अव्यक्त होतो. मग अशा अविनाशी तत्वाला कोण मारू शकेल? कोण त्याचा नाश करू शकेल?

अर्जुनाने धर्म रक्षणार्थ आप्तजनांशी युद्ध केले आणि समजा त्यात ते मेले तर त्यांच्या मृत्यूचे पाप वा पातक अर्जुनाला का व कसे लागणार नाही, हे श्रीकृष्ण आत्म्याच्या अमरत्वाचे फार मोठे तत्वज्ञान त्याला सांगून आधीच दोषमुक्तीची हमी देतात. Krishna is a clever sales man ! इतकंच नाही तर तू युद्ध केल नाहीस, तर तुझी कशी दुष्कीर्ती होईल याचं  भय दाखवून वरून क्षत्रिय धर्मास जागलास तर तुला स्वर्गाची द्वारे कशी मोकळी होतील असं मधाचं बोटही श्रीकृष्ण दाखवतात.

प्राप्त झाले अनायास स्वर्गाचे द्वार मोकळे
क्षत्रियास महा भाग्ये लाभते युद्ध हे असे
हे धर्मयुद्ध टाकोनि पापात पडशील तू
स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुनिया स्वये

श्रीकृष्णाचं  हे आत्म्याविषयीचं  ज्ञान अखिल भारत वर्षाने हजारो वर्षे फार चांगल्या संदर्भात वापरले  आहे. आत्मा अमर आहे तर आपण कोणालाही मारू शकतो असा विपरीत अर्थ न काढता, पुनर्जन्म, पाप-पुण्य, आणि धर्माला, सत्याला अनुसरून सदवर्तन करायचे  अशी परस्परांवर  आधारलेली साखळी आपण बनवली. शरीराची नश्वरता जाणून घेऊन आत्म्याच्या अमरपणाचे ज्ञान, माणसाला जन्म-मृत्यूच्या भयापासून दूर ठेवायला उपयोगी पडले. पुनर्जन्माची हमी मृत्यूच्या पलीकडे ही जीवनाची जगण्याची आशा मानवाला देऊन गेली.
It helped humanity to look at entire cycle of existence and non-existence in very positive way.

सांख्ययोगाचा या पुढचा भाग अजून interesting आहे....त्या विषयी पुढच्या भागात लिहीन...now it's all about Arjuna's inquisitiveness and ability to ask questions which leads to wonderful knowledge and insight given by Srikrishna to help Arjuna get out of dilemma and be ready for war.

सुंदर गीता, सुंदर गीताई!!

क्रमश:
अलका देशपांडे



1 comment: