घर

सुमारे तीस वर्षांपूर्वी आम्ही वाड्यातल्या जुन्याअंधा-या बोळकांडी घरातून सुबक रांगेतव्यवस्थित प्लान आखून बांधलेल्या तळ्याकाठच्या कॉलनीतल्या घरात रहायला आलो.मी आणि माझा भाऊ खूपच लहान होतो.नवीन घर उभारण्यामागे खर्ची पडलेले आई पप्पांचे कष्टपैसा समजण्याचं ते वय नव्हतं.नव्या घरात रहायला जाण्याचा आनंद होताचबरोबर स्वत:चं हक्काचं मोठ्ठं अंगणगच्ची आणि कॉलनीतलं खेळाचं मैदान या सगळ्याची अपूर्वाई ही होती.वास्तुशांतीला पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं.आम्ही मुले तर दिवसभर अंगणातच.




हळू हळू या घराने माझ्या मनाचा कधी ताबा घेतला कळलंच नाही.पुढचं दारमागचं दारभरपूर खिडक्या आणि घराच्या तीन बाजूंनी अंगणऐसपैस जागा होती.पुढची काही वर्ष आईनं तिथं सुंदर बाग फुलवली.त-हेत-हेचे गुलाबइतर फुलझाडंमोजकी फळझाडं याबरोबरच एका कोप-यात कापसाचं ही झाड होतंसहसा कोणाच्या घरी नसणारं.वर्षभर घरच्या कापसाच्या वाती देवपूजेला मिळत.पप्पा पूजेला बसले की छोट्या टोपलीत त्या त्या ऋतुत फुलणारी फुलं आंगणातून तोडून आणणं हे माझं आवडतं काम. शेवगाडाळिंबपेरूबदामनारळ ही सगळी झाडं आमच्याबरोबरच मोठी झाली आणि फळायला ही लागली.त्यांच्याच सावलीत बसून त्यांचीच फळं खात खेळलेला सुटीतला पत्यांचा डाव अजून आठवतो.


तसं बघायला गेलं तर एक बैठकीची खोलीस्वयंपाकघर आणि एकच बेडरूमएवढंच तर होतं घर पण किती तरी मोठं वाटायचं तेव्हा. सहा-सात माणसं आरामात जेवायला बसू शकतील एवढ्या मोठ्या स्वयंपाकघराची आजच्या सहा बाय आठ किचनशी तुलनाच होऊ शकत नाही. सगळ्यांना उखळातली चटणी आवडते म्हणून आईने तिथेच एक उखळ ही बसवून घेतलं होतं. उखळातल्या त्या चटणीची चव आज ही जीभेवर रेंगाळते आहे.

सुरूवातीला शिडीवरून आणि नंतर काही वर्षानी जिन्यावरून गच्चीत जाऊ केलेल्या कुरड्या पापड्या आता होत नाहीत. उन्हाळ्यातल्या कित्येक संध्याकाळी अंगणात आणि चांदण्या रात्री गच्चीत बसून केलेल्या गपागोष्टींची सर आताच्या व्हॉट्सऍप चॅटला येत नाही.

मुख्य दरवाज्यासमोरच्या कट्यावर फक्त एक कडाप्पा घालून केलेला बाक आणि त्याचा एक विशिष्ट कोपरा ही माझी अतिशय आवडती जागा होती. शाळकरी वयातकॉलेजमध्ये असतानालग्न ठरल्यावर आपल्याच विचारातएवढंच कायबाळ झाल्यावर बाळाला घेऊन देखील मी कित्येक तास त्याच कोप-यात बसत होते. तिथल्या कठड्याच्या  ग्रिलला धरून खेळू नकाग्रिल निखळेल असं पप्पा नेहमी सांगायचे.पण गंमत म्हणजे मी आणि भाऊ सोडून आमच्याकडे येणारी सगळी मुलं त्यावर खेळायची आणि अजूनही ते शाबूत आहे.


चिमुकल्या बाळाला दवाखान्यातून पहिल्यांदा घरी घेऊन येणंभावाचं लग्न सगळं काही काल-परवा घडल्यासारखे लक्ख आठवते. हा प्रत्येक प्रसंग खास होता आणि त्याचा मूक साक्षीदार होतं माझं घर. छोट्या-मोठ्या खूप आठवणी या घराशी निगडीत आहेत. बहुतेक सगळ्या चांगल्याच.माझ्या नशीबाने आजवर वाईट म्हणावे असे प्रसंग किंवा अनुभव माझ्या आयुष्यात फार कमी वेळा आलेअगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच.

या घराने आमचे बालपणतरूणाईआमची भांडणंप्रेमकित्येक आजारपणंआमच्या मुलांचे जन्म सगळं पाहिलं. जुनं जुनं होत असताना घर प्रत्येक सणासमारंभालाकार्याला रंगरंगोटी करून घेऊन नवीन होत राहिलं. माझ्या मनात नेहमीच घर म्हटले की ते बैठं आणि अंगणासहित असलेलं घरच येतं.

आता मात्र घर खूपच जुनं झालंवर्षानुवर्ष जाणंही होत नाहीगावात पुरेसं पाणी नाही. त्यामुळे पुढच्या एखाद वर्षात विकूनही टाकायला लागेल. पण मनाच्या एका कोपऱ्यात घर असंच राहिलआयुष्याच्या अखंड धावपळीत क्षणभर विसावा देत.


मानसी नाईक



1 comment:

  1. अतिशय सुंदर प्रकारे मांडले आहॆ... खूपच छान

    ReplyDelete