हासू नको अशी तू
अश्रुंहुनी व्याकुळसे
मोजक्या शब्दांहुनी
मौन असते बोलके!
घेतले ऐकून मी -
बोलण्यातील थांबणे
सजवलेल्या शब्दांतळीचे
क्षणभराचे नि:श्वासणे!
धाक तो अपुला पुरे
श्वास घे तू मोकळा
ठाऊक नाही का तुला
अदय बंधनांचा लळा?
जाऊ दे कोंदाटलेल्या
आषाढधारा ओतुनी
तिष्ठलेल्या श्रावणाचे
घे एकदा तू ऐकुनी
शोधू नको तळव्यावरी
जात्या क्षणांचा चेहरा
गोंदून घे भाळावरी
चंद्र मोहक लाजरा!
मधुस्मिता अभ्यंकर
एक सुंदर काव्य.
ReplyDelete