"मग, काय ठरलं तुमचं शेवटी ?" आम्ही दोघांनी आज कसंही करून रश्मीला गाठायचं ठरवलेलं. त्यांना परत येऊन दोन दिवस झाले होते.
"It was a good experience दादा.", रश्मीला एवढ्या सहज, एका शब्दात उत्तर द्यायचं
नव्हतं.
"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये." मी परत मुद्द्याकडे आणण्याचा प्रयत्न केला.
"हे बघ दादा, ह्या प्रवासातून एक गोष्ट आम्हाला कळलीये की आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच नाही आहोत. पण माझा निर्णय सांगण्याआधी मला मी ह्या ट्रिपमधे अनुभवलेल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत."
"तू पण ना... confuse केलंस. ठीक
आहे. सांग."
"ऐक ना. गंमत. पहिला दिवस. पूर्ण दिवसाच्या प्रवासानंतर
आम्ही रात्री देहरादूनला पोचलो. एवढे दमलो होतो हॉटेलवर पोहचेपर्यंत की परत बाहेर
पडून जेवायची अजिबात इच्छा नव्हती. आमच्या लॉज-कम-हॉटेलच्या रूम्समधे जेवण बनवायची
थोडी फार सोय होती. अविनाशच म्हणाला की इथेच काहीतरी बनवूया. मला वाटलं अरे वा,
ह्याला cooking येतं. Impressive! तसं मी विचारल्यावर तो म्हणाला की त्याला विशेष काही येत नाही, पण तो जमेल ती मदत मला करू शकेल आणि त्या निमित्ताने नवीन काहीतरी
शिकेलही. आणखीन इम्प्रेसिव! आम्ही त्या दिवशी एकत्र कूकींग खूप एंजॉय केलं."
"अरे वा! काय बनवलंत?" हिचं
कुतूहल अचानक जागृत झालं.
"रॉयल, एक्स्क्वीझीट, स्पेशल .... मॅगी!"
मी कपाळावर हात मारला. "बरे भेटलाय
एकमेकांना", माझी उस्फूर्त रिअॅक्शन.
"But the point is.... हे एक उदाहरण झालं, आम्ही पूर्ण प्रवासात 'हे तुझं काम, हे माझं काम' असं नाही केलं. आम्ही सगळ्या जबाबदार्या
वाटून घेतल्या. आणि त्यामुळे खूप मजा आली."
" छान. अजून काही?", मला
वाटलं आता ही होकार कळवेल. पण माझी बहीण असल्यामुळे गोष्टी dramatic करून लांबलचक खेचणं आलंच.
"ऐक ना. रोज सकाळी ब्रेकफास्टला तो मला पूर्ण दिवसाचा
प्लॅन सांगायचा. दोन दिवसांनंतर मला असं वाटू लागलं की ट्रिपचा पूर्ण कंट्रोलच
त्याच्याकडे आहे. म्हणून मी तिसऱ्या दिवशी त्याचा प्लॅन सांगून झाल्यावर विचारलं,
'मी का हा प्लॅन फॉलो करायचा? ह्या सगळ्यात
माझं मत कुठे आहे?', माझा टोन जरा उद्धट होता. त्यावर तो defensive
न होता शांतपणे म्हणाला, की जर तू पुढल्या
जागेचा रिसर्च करून प्लॅन तयार केलास तर आपण तो सुद्धा include करू. पुढले दोन तीन दिवस आम्ही separetely research करून
plan करू लागलो.
त्यात आमच्यातले अंतर थोडे वाढल्याचं जाणवत होतं. पण माझा research कच्चा होता हे मला लक्षात आलं आणि मी ते कबूलही केलं. शेवटी शेवटी तर आम्ही आदल्या रात्री एकत्र बसून internet research करू लागलो. It was fun. मी नंतर त्याच्याशी उद्धटपणे बोलल्याची माफी मागितली. तेव्हा त्यानेही सुरुवातीला मला गृहित धरल्याबद्दल माफी मागितली. ह्यातून दोन गोष्टी समोर आल्या. एक तर तो त्याचा ego मधे आणत नाही, आणि दुसरं, तो उगाच मला impress करायला माझं ऐकून न घेता logically आपली बाजू मांडतो आणि पटवून देतो. एकत्र प्रवास करताना आमचे कित्येकदा मतभेद झाले. पण मोकळेपणाने बोलल्याने आम्हाला बरेच वाद सोडवताही आले. मी तर माझ्या सगळया मित्र-मैत्रिणींना ही इतत्र प्रवास करण्याची कल्पना सुचवणार आहे."
"ओ के... मॅगी बनवलं, तुला
समजावलं, म्हणजे तर सर्वगुणसंपन्न! आता ह्या सगळ्याचा अर्थ
होकार घ्यायचा का?" माझा पेशन्स संपत आला होता.
"प्लीज़ दादा. कोणीही सर्वगुणसंपन्न वगैरे नसतं. पण जसं
मी आधी म्हणाले तसं - ह्या प्रवासात आम्हाला हे कळलं की आम्ही एकमेकांसाठी आत्ता Perfect
Match नसू कदाचित, But we are ready ..happy to adjust and
learn with each other. आणि ही तडजोड नाही. . आणि म्हणूनच दादा,
आमचा निर्णय 'हो' आहे."
पुढले दोन तास तिने त्यांच्या trekking, rafting अशा वेगवेगळ्या धाडसी सफरींच्या खूप गमतीजमती सांगितल्या. एका 'हॅपी जर्नी'ला सुरुवात झाली होती!
(All Photos - wikiHow)
-*-*-*-*--*-*-*-*-
मानस
😂👏
ReplyDelete