Okinawa - ओकिनावा हे
दक्षिण जपानमधील एक island आहे. इथे इकिगाई जीवनपद्धत प्रमाण
मानली जाते. कोणी शंभरी गाठलेले जपानी ओकिनावन आजोबा कराटे शिकवण्यासाठी पहाटे पाच
वाजता उठतात, तर एखादी १०२ वर्षांची आजी तिच्या मुलीच्या
मुलाला खेळवण्यासाठी पहाटे पहाटे उठून 'ग्रीन टी' पिऊन तयार होते. प्रत्येकाच्या घरी परसबाग असते व दिवसाची सुरुवात
प्रत्येक जण बागकामाने करतो. तण काढतो, रोपांची लागवड करणे,
पिके काढणे, त्यांची मशागत करणे, खत पाणी देणे वगैरेच्या छोट्या कामांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात होते.
लहान काम काळजीपूर्वक करून टप्याटप्याने मोठी कामे करणे, यावर
त्यांचा पूर्ण विश्वास असतो. व्यवहारातील प्रत्येक गोष्टीत हे तत्त्व लागू केले
जाते. त्यातही प्रत्येक जण खूप काळजी घेत असतो.
आहार :--- ८०% चे सिक्रेट
ओकिनावामधील लोकांचा आहार फारसा स्पेशल
नसतो, पण त्यांची आहाराची पद्धत वेगळी असते. आपण जसे जेवण सुरू
करण्यापूर्वी “वदनी कवळ घेता” म्हणतो,
तसे ओकिनावा-जपान मधे सर्वसाधारणपणे “Hara hachibu’’ असे परत परत म्हटले जाते. याचा अर्थ, तुमचे पोट ८०%
च भरा. म्हणजे जणू काही जेवणापूर्वी मनावर बिंबवले जाते की ८० टक्केच जेवा. अति
खाऊ नका. प्राचीन शिकवण असे सांगते, की तुमचे पोट कधीही १००%
भरू नका. पोट भरत आले आहे असे वाटताक्षणी ओकिनावन माणूस side dish किंवा apple pie असे गोड पदार्थही खात नाही.
खाण्याच्या क्षणिक आनंदापेक्षा, न खाता ते लोकं दीर्घ
आनंदाला जास्त प्राधान्य देतात.
त्यांची जेवण देण्याची पद्धत महत्त्वाची
व वेगळी असते. यात प्रथिनयुक्त पदार्थ कमी व पोषक अन्नपदार्थ
जास्त असा वनस्पतीजन्य आहार असतो. मांसाहार अत्यंत कमी. महिन्यातून एक किंवा दोन वेळाच!! फावा बीन्स, ब्लॅक बीन्सचा समावेश हे त्यांच्या आहाराचे वैशिष्ट्य. त्यांचे जेवणाचे ताट म्हणजे चार छोट्या छोट्या डिशेस एका ट्रेमध्ये व किंचित मोठी डिश मुख्यत्वेकरून भातासाठी असते, जेणेकरून कमी अन्न ग्रहण केले जाईल. या चार डिशेसमधे टोफू, रताळे, भोपळा, पालेभाज्या, कारले, मुळा यांसारख्या भाज्या असतात. बीट, गाजर, रताळे या प्रकारातील पिवळ्या/लाल भाज्यांमध्ये कॅरेटोनॉइड जास्त प्रमाणात असते जे सूज कमी करण्यास उपयोगी असते व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (according to Melissa Rifkin)
फळे, ड्रायफ्रूट्स, ऑलिव्ह ऑइल, सीड्स, ओट्स, grains, मिसो सूप याचा मर्यादित प्रमाणात समावेश हे त्यांचे वैशिष्ट्य. जवळ जवळ प्रत्येक ओकीनावन ५ वाजता मित्रांबरोबर अथवा जेवणात अर्धा ग्लास वाईन घेतो. पूर्ण आठवडा वाईन न घेता शनिवारी मात्र पूर्ण आठवड्याचा वाईनचा कोटा घेणे हे कधीच करत नाहीत. (आठवडाभर गोड खायचे नाही व शनिवारी icecreamवर ताव मारायचा असं चीटिंग करत नाहीत)

मूव्ह नेचरली :-- निसर्गाला धरून वाटचाल
हे जगातील दीर्घायुषी ठरलेले लोक कुठलेही
जिम जॉईन करत नाहीत किंवा अति पळणे, रोज
मॅरेथॉन पळणे करत नाहीत किंवा weight lifting सारखे
व्यायाम करत नाहीत. त्या पेक्षा प्रत्येक जण उठल्यावर स्वतःच्या ऑरगॅनिक बागेत
थोडा वेळ काम करतो. नैसर्गिक वातावरणात काम करणे पसंत करतात. मशीनची मदत न घेता,
हाती काम करून यार्ड वर्क व व्यायाम
दोन्ही साध्य केले जाते.
हे वाचल्यावर सहज मनात विचार येऊन गेला की निसर्गात राहून काम केल्याने शुद्ध प्राणवायू शरीरात घेतला जातो, "D vitamin" मिळतं ते देखील नैसर्गिक स्वरूपात, गोळ्या न घेता. जिमला किंवा इतर व्यायाम-क्लासला जाऊन पैसे पण खर्च होत नाहीत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरी पिकवलेल्या सेंद्रिय भाज्या कुटुंबाला खायला मिळतात, अगदी ऑरगॅनिक टोमॅटो, गाजर, बीट, कारली यांसारख्या फळ भाज्या व पालक, Amranth/माठ या सारख्या पालेभाज्या ते स्वतः आपापल्या छोट्याशा परसबागेत उगवतात. असे घरच्या घरी स्वतः कष्ट करून उगवलेल्या भाज्या खाण्यात काय सुख असते ते मी स्वतः गेले कित्येक वर्षं सेंद्रिय भाजीपाला घरच्याघरी उगवून अनुभवते आहे.
त्यामुळेच बहुदा मला ओकिनावन्स लोकांच हे पुस्तक खूप भावलं :-) आजही ओकिनावामधील १०० वर्षांच्या आजी सकाळी रोज ५.३० ला उठून senpin tea म्हणजे जस्मिन टी पीते व परसबागेत २० -२५ मिनिटे काम करते. नंतर रेडिओ ताईसो म्हणजे वॉर्म उप एक्सरसाइज रेडिओवरून प्रसारित केले जातात व प्रत्येक जण आपापल्या घरी ते व्यायाम रोज करतो… ७ ते ८ मिनिटे. लिंक पुढे देत आहे.

https://youtu.be/I6ZRH9Mraqw
ही लोकं काम करायला चालत जाणे पसंत
करतात. लिफ्टचा वापर न करता जिन्यावरून जाणे पसंत करतात. TV समोर वेळ न घालवता ते सामाजिक कार्यक्रमांना वेळ
देतात. सकाळी लवकर उठतात व रात्री जास्त न जागरण करता सात ते नऊ तासांची झोप घेतात.
मोआई (Moai):---
हा एक प्रकारचा ग्रुप असतो. या ग्रुप्समधून सामाजिक बंध तयार होतात व एक प्रकारचा
आधार मिळतो. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय
आधार तर मिळतोच, पण आध्यात्मिक जडणघडणसुद्धा याच ग्रुपमधून
होते. हे मोआई ग्रुप बनायला अगदी लहानपणापासून सुरुवात होते व ते वयाच्या
शंभरीपर्यंत वाढतात व तसेच राहतात. ओकिनावामधे आसपासचे शेजारी सामायिक कारणासाठी
रोज किंवा आठवड्यातून २-३ दिवस भेटतात, गप्पा मारतात,
स्वतःचे अनुभव एकमेकांना सांगतात. कधी ते एकमेकांना सल्ला विचारतात तर कधी आर्थिक मदतीची गरज असेल तर हात पुढे करतात.
परंपरेनुसार लहान मुलांचे पाच पाच जणांचे गट करतात व हीच मुले काही वेळा पुढे जन्मभरासाठी वचन-बद्ध होतात. एकमेकांबरोबर खेळतात मिळून काम करतात. जसे काही त्यांची दुसरी फॅमिलीच आहे. अश्या कित्येक मोआई ९० वर्षेदेखील चालू राहिल्याची उदाहरणे आहेत. ओकिनावामधील एक ८० वर्षांकडे झुकणाऱ्या Klazuko Manna नावाच्या आजी Dan यांच्याशी बोलताना म्हणाल्या की हे Moai नुसते गप्पागोष्टी करण्यासाठी नव्हेत, तर सर्वांना एकमेकांबद्दल आदर व आधार वाटतो. जर त्यांच्यापैकी कोणी आजारी पडले किंवा कोणाचे नातेवाईक वारले, कोणाला पैशांची कमतरता भासली तर त्यांना खात्री असते की सगळे आपल्या मदतीला येतील.
ही एक प्रकारचे सुरक्षा कवच असल्याची भावना नंतरचे उर्वरित आयुष्य शांतपणे व्यतीत करायला फार उपयोगी पडते असे बहुतांश ओकिनावान्स लोकांचे म्हणणे होते. संशोधनात असे दिसून आले आहे की अशा सामाजिक संबंधांचे तुमच्या आनंदावर व तब्येतीवर खूपच दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पडतात व त्याने आयुष्यातील stress कमी होण्यास मदत होते. समान मूल्ये, आरोग्यदायी सवयी, लाईफ मधील गोल्स असणाऱ्यांशी जर तुम्ही विचारांची देवाणघेवाण केली, तर नक्कीच तुम्ही दीर्घकाळ आनंदी आयुष्य जगू शकता.

हेतू- purpose :--
यालाच Okinawans
इकिगाई म्हणतात. Nicoyans (Costa Rica) याला
"Plan de vida" म्हणतात या दोन्हीचा अर्थ
"मी रोज सकाळी का उठतो".
मागील सत्तर वर्षे जी तुमची इकिगाई आहे ती तुमच्या पुढील
वाटचालीसाठी व आयुर्मानासाठी उपयोगी पडते.
Down Shift किंवा स्लो जगणे :-- Antiaging secrets
शांतपणे किंवा बिनधकाधकीचे आयुष्य जगा (live an unhurried life) हे त्यांचे स्लोगन. आजकालच्या जगात तणाव
नाही अशी व्यक्ती शोधूनच सापडेल. त्या स्ट्रेसमुळे
जुनाट जळजळ व त्याच्याशी निगडित प्रमुख अशी मोठ्या वयासंदर्भात
बरीच आजारपणे येतात हे सर्वांना माहीत आहेच.
प्रत्येक ब्लू झोनमधील लोकांनादेखील
स्ट्रेस नसतोच असे नाही. सतत घाईत असणे व जीवनाची गुणवत्ता यांचे व्यस्त प्रमाण
असते, अशी त्यांची घट्ट धारणा असते. तसे शास्त्रीय दृष्ट्या
सिद्ध झाले आहे. त्याचमुळे ही लोकं जरी सतत कामात असली तरी जवळून तपासले असता ते
महत्त्वाची कामेदेखील तितक्याच शांत भावनेने करत
असतात.
ते नेहमी कामात असतात पण तितक्याच
एकाग्रतेने, पछाडल्यासारखे व दिलेल्या कामाला
महत्त्व देऊन काम करतात. मुख्य म्हणजे आजूबाजूचे सर्वच जण असे
व्यग्रतेने काम करत असल्याने ते अजिबात distract होत
नाहीत.
काही अवघड गोष्ट तुम्हाला साध्य करायची
असेल तर त्या गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करून ती आत्मसात करणे आवश्यक असते.
एखादी गोष्ट तुम्ही परत परत केली की ते कार्य करणे यावरच सिमीत राहात नाही तर ती
सवय बनून जाते.
दुसऱ्याचा आदर करणे, मेडिटेशन करणे, जप करण्याचेही तसेच
आहे. अश्या कोठल्याही चांगल्या सवयी जोपासणे हे
ओकिनावन्सच्या अंगवळणी पडले आहे… खरं तर 'Blue Zone' मधल्या सगळ्याच लोकांच्यात हा कॉमन मुद्दा जाणवतो.
Dan यांच्या टीमला एकही
आजोबा नुसते, काही न करता बाकावर
बसलेले आढळले नाहीत. स्वतःची इकिगाई तेथील प्रत्येकाने शोधून काढलेली असते व
त्यानुसार ते वयाची पर्वा किंवा बाऊ न करता कार्य करत असतात.
कदाचित काही वर्षांपूर्वी जपानमध्ये
आलेल्या त्सुनामीनंतर इतक्या कमी
कालावधीत देश परत पूर्ववत होण्याचे कारण लोकांची कार्यमग्नता व चांगल्या सवयी
जोपासणे हेच कारण असावे.
तर तुम्ही पण तुमची इकिगाई शोधून काढणार
न?
धन्यवाद
रत्ना गोखले
सुंदर... खूपच छान
ReplyDeleteखूप मार्गदर्शक लेख, धन्यवाद या माहितीबद्दल
ReplyDelete