किती लोभस हे रूप तुझं
पाठमोराही लुभावतोस मला.....
तूझ्या हातातली ती बासरी
ओठांपर्यंत नेते मला.....
आणि ऐकू येतो
ॐ तूझ्या मुखातून....
आणि पाठोपाठ
अलवार सूर तूझ्या बासरीचे.......
त्या सूरांवर विहरत येते,
घुटमळते अवतीभवती तुझ्या.......
तुझ्या मोरपीसाचं
सूरांवर हळूवार थरथरणं
अंतर्बाह्य वेड लावतं मला!
तुझं ते उभं राहणं,
पायांची ती लडिवाळ घडी,
पितांबराच्या काठातून
डोकावणारी....
पावलांची तांबूस जोडी!
कृष्णा....किती रे वेड लावतोस.....
उगीच नाही राधा
आकंठ बुडाली प्रेमात तूझ्या!
तुझ्या अथांग डोळ्यात
उतरण्याची.....
एक संधी देशील का मलाही?
माधुरी राव.पुणे.
कान्हा, कन्हैया, कृष्ण कवींचा एक आवडता विषय. प्रत्येक वेळेस त्याचे नवीन रूप अनुभवायला येते.
ReplyDelete