श्वेता पोकळे |
संपादकीय
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने ह्या कट्ट्यात महाराजांच्या काही आठवणी देत आहोत. शिवाजी महाराज हे एक द्रष्टे पुरुष होते. स्वराज्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. ह्यात त्यांनी बांधलेले किल्लेही आलेच. ह्या दुर्ग बांधण्यामागील विचार आणि नियोजन जाणून घेऊया 'शिवरायांचे दुर्गविज्ञान' ह्या लेखातून. तसेच ह्या महिन्यातील फोटो फिचर ही महाराजांच्या किल्ल्यांच्याच फोटोंचे आहे.
'ओळख यांची ही'
ह्या लेखातून वाचुया दोन कर्तबगार
महिलांविषयी. वाचताना तुम्हांला जाणवेल की अन्यायाविरुद्ध स्त्रियांचा लढा अजूनही
चालूच आहे. ८ मार्चलाच प्रसिद्ध कवी साहिर लुधियानवी यांचा वाढदिवस ही येतो. हा
त्यांचा १०१ वा वाढदिवस. त्या निमित्ताने ह्या कवी, तत्वज्ञ कलाकाराचे कृतज्ञ
स्मरण करूया.
'प्रयत्ने
वाळूचे ...' वाचताना वाचकांना आपले बालपण आणि निबंधलेखन नक्की आठवेल. 'संघशक्तीचा
विजय' हा लेख अचानक समोर आलेल्या विचित्र परिस्थितीतील पेशंटला डॉक्टरांना कसे हाताळावे
लागते याचे वर्णन करतो. पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अशाच
एका लढ्याविषयी वाचूया 'Legal efforts to save trees' या लेखात. 'घाटातील अपघात '
ही कथा आवडली का ते जरूर कळवा.
त्याशिवाय वाचूया
आपल्या नेहमीच्या लेखमाला आणि मनातील विचार तरलपणे मांडण्याऱ्या कविता. विविध विषय
कट्ट्यात देण्याचा आमचा नेहेमी प्रयत्न असतो. ह्या महिन्याचा कट्टा कसा वाटला ते
जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
खूप छान 👍👍
ReplyDelete