कट्टा ऑक्टोबर 2020

 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। 

©सीमा ढाणके 

संपादकीय

ह्या वर्षातील सप्टेंबर महिना 'अधिक महिना' म्हणून नोंदला गेला आहे. खरे तर आता ह्या वर्षात सगळेच सणवार, ऑलिम्पिक खेळ, इतर खेळ स्पर्धा सगळेच कोरोनाच्या छायेत झाकोळले गेले आहे. आपल्या 'कट्टा'वर मात्र ह्या काळातही उत्साहाने काम चालू आहे.

ह्या महिन्यापासून आपल्या कट्ट्यात आपण नव्या लेखमाला सुरु करत आहोत.

'गीताई' वरील अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषेतील विवेचन चालूच राहणार आहे. अलका देशपांडे हे सदर लिहित आहेत. त्याशिवाय आपण 'आकाशझेप' ही विमानांवरील एक माहितीपूर्ण लेखमालिका सुरु करीत आहोत. ही माहिती देत आहेत राकेश शेटे. 'जगूया आनंदे' ह्या सदरात डॉ.पूर्वा रानडे दहा Life Skills वर माहिती देणार आहेत. 'स्वरानंद' मध्ये ऐकूया पियानो कॉर्डीयनवर वाजवलेली सुमधुर गाणी आणि वाचूया त्या गीतांच्या संगीतकारांवरील माहिती. ह्याशिवाय देणार आहोत एक शब्दकोडे. शब्दांच्या ह्या खेळात रमायला आवडेल का ते बघा. 

त्या शिवाय ह्या महिन्यात वाचा अधिक महिन्याबद्दल. विस्मृतीत गेलेल्या हादग्याबद्दल. अधिक महिना, भोंडला, ह्या सगळया गोष्टी आपल्या सांस्कृतिक जीवनाचा काही वर्षांपूर्वी महत्वाचा भाग होत्या. आता हे सगळे मागे का पडले आहे असे राहून राहून मनात येते. 'गोष्टींच्या गोष्टी'त अनुभवा मुलांची देखील बदललेली दृष्टी. इतक्या गोष्टी बदलत चालल्या आहेत तर ह्या काळातही 'सुखदुःखाचा ताळेबंद' कसा मांडावा? हे देखील शिकून घ्या. काहीही उणे नसलेल्या पुण्याबद्दल जरूर वाचा. याशिवाय कवितांचाही आस्वाद घ्या. अनेक तरुण कवी कट्टासाठी आवर्जून कविता पाठवत आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या.


कट्ट्याचे  नवे स्वरूप आवडतेय का ते नक्की कळवा. येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा!!

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 


5 comments:

  1. Vaa लेखांची, चित्रांची, स्वरांची लयलूट म्हणजे हा कट्टा

    ReplyDelete
  2. सीमा ची कलाकृती लाजवाब

    ReplyDelete
  3. So well written and more than that You are so well informed

    ReplyDelete
  4. सीमा देवी चं चित्रं अप्रतिम नी डोळ्यातही सुंदर भाव. खूप छान

    ReplyDelete