कट्टा सप्टेंबर २०२०

पूर्वा सिन्नरकर 
संपादकीय
ह्या कट्ट्याचे मुखपृष्ठ प्रभू श्रीरामाचे आहे. अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ ५ ऑगस्टला झाला. अनेक भारतीयांची अनेक काळापासून असलेली मागणी आता पूर्ण होत आहे. भारताच्या DNA त श्रीराम आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. फक्त श्रीराम कशाला, महादेव, श्रीकृष्ण, दुर्गा, गणपती, गौरी हे सगळी दैवते सदैव आपल्या मनात असतातच. आपल्या सणवारांतून ही त्याचेच प्रतिबिंब पडत असते.
ह्या महिनात गणेश चतुर्थी, कृष्णाष्टमी असे सण होते. त्याचे पडसाद कट्टा साहित्यात उमटलेले आहेतच. 'बैलपोळा' ह्या सणावरील एक कविता आवर्जून दिली आहे. बळीराजा आणि त्याचे हे साथीदार यामुळेच तर आपल्या पानात अन्न येते. त्याची कृतज्ञ आठवण साऱ्यांना ह्यामुळे होईल. मित्रमंडळाची ई-स्मरणिका देखील ह्या कट्ट्यात देत आहोत. तेथे आलेले साहित्य ही रसिकांना यामुळे वाचता येईल.
'हरवलेले गंध', 'बालपण दे गा देवा' हे लेख अनेकांना आपल्या बालपणात घेऊन जातील. 'शब्देविण संवादु' हा लेख संवादाचे आपल्या आयुष्यातील अनन्य साधारण स्थान जाणवून देईल. 'लॉकडाऊनने दिलेली शिकवण' पटतेय का हे देखील जरा ताडून पहायला विसरू नका.
निरोप
ह्या महिन्यापासून आपण 'किस्से कहाण्या दुसऱ्या महायुद्धातील..', नामसंकीर्तन, पालकत्व, विलायती खाऊ आणि समुपदेशन ह्या आपल्या काही लेखमालांचा निरोप घेत आहोत. ह्या लेखमालांनी गेले वर्षभर आपले मनोरंजनही केले आणि आपल्या माहितीत अमूल्य अशी भर ही घातली. या सर्व लेखकांचे मनापासून आभार.
काय म्हणताय? नव्या लेखमाला कोणत्या? सांगते की!!! पण त्यासाठी पुढच्या कट्ट्याची वाट पहायला हवी.

ह्या वर्षी मित्रमंडळाचा गणेशोत्सव नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने साजरा करण्यात आला. रसिकांसाठी या सर्व कार्यक्रमांची लिंक मित्रमंडळाच्या website वर देण्यात आली आहे. सर्वांनी आपल्या सवडीनुसार जरुर हे कार्यक्रम पहावेत ही विनंती.!!!!

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर

अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 


3 comments:

  1. मुखपृष्ठ अतिशय अप्रतिम. चित्रकाराचे खूप खूप कौतुक.

    ReplyDelete