खारीचा वाटा

आज कोरोना विषाणू विरुद्ध अनेक जण लढा देत आहेत. जो तो आपापल्या परीने त्याची कर्तव्ये पार पाडत आहेत. मग ते सफाई कामगार, पोलीस प्रशासन, सरकार, वैद्यकीय व्यावसायिक सगळेच आहेत आणि यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे.

आपला देश महामारीमुक्त करण्यासाठी सर्व डॉक्टर्स,नर्सेस आणि इतर मंडळी जीवाचे रान करत आहेत. पण हे सगळं करत असताना त्यांची सुरक्षितता आणि आणि या सगळ्यासाठी लागणाऱ्या साधनांची पूर्तता असणे गरजेचे आहे. त्याच साधनांपैकी एक म्हणजे हॉस्पिटल गारमेंटस आणि आज जेंव्हा सगळं काही ठप्प आहे, साधन सामुग्री आणि सहकाऱ्यांची कमतरता आहे अशा परिस्थितीत केवळ हॉस्पिटल्स ना काही कमी पडू नये म्हणून माझी आई म्हणजेच सौ. वंदना ओगले आणि तिची सहकारी सौ. रेखा तानाजी जाधव यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन या हॉस्पिटल गारमेंटसच्या ऑर्डर्स पूर्ण करत आहेत आणि या लढ्यात एक खारीचा वाटा उचलत आहेत याचा खरंच खूप अभिमान वाटतो.


या सर्व गडबडीत आजीने तिच्यापरिने घरात लक्ष घालून आईचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आणि बाबांनी ये-जा करून करावी लागणारी कामे करून मदतीचा हात पुढे केला. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते, की आम्ही लेकी तिथे तिच्या मदतीसाठी नाही जाऊ शकत.


आई आणि रेखा मावशी तुम्ही हा जो काही खारीचा वाटा उचलला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.🙏



मधुरा ओगले देव

1 comment:

  1. Hats off to your Mother, who is helping Indian's true hero. And ofcourse to all her helping hands

    ReplyDelete