सगे सोयरे झाले परके
कंपित दाही दिशा
कशी तू केलीस
अमुचि दशा ।।
केवळ एकाच फटकाऱ्याने
विश्वाचा पट दिला उधळूनि
शहरामागून शहरे नगरे
चिडीचूप वाटा तशा।।
हातामधुनी काम निसटले
चालायाचे पाय विसरले
जीवनातले रंग उडाले
निराशली आशा।।
मरणभयाचे तांडव चाले
नकोनकोसे स्पर्श जाहले
श्वासही अवघे गुदमरलेले
अंधारून ये निशा।।
वाट पाहते अवताराची
असुरमर्दिनी
श्रीदुर्गेची
उद्धाराच्या हुंकाराने
पल्लवली आशा।।
निर्मला दाते
खूप समर्पक कविता!
ReplyDelete