क्रांति

"आमच्या संचालक मंडळाला तुमची ही संकल्पना खूपच आवडली आहे मिस्टर तानापुरे. ही कल्पना क्रांतिकारक आहेअसे त्यांचे मत आहे. पुढल्या आठवड्यात तुमच्या ह्या कामासाठी लागणारे पत्र आणि चेक दोन्ही घेऊन जा. अभिनंदन!मुख्य वित्तीय अधिकारी पाटील म्हणाले.

"थँक यू सर."

संतोष तानापुरेने ‘व्हर्टिकल फार्मिंगचा प्रस्ताव एका ग्रुपपुढे मांडला होता. आणि त्या प्रस्तावाची निवड झाली होती. पाटलांनी संचालक मंडळाचा निर्णय आज कळणार म्हणून संतोषला बोलवून घेतले होते. पाटलांना सुद्धा ह्या प्रॉजेक्टबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. बोर्डाने त्याचे खूपच कौतुक केले होते.

 "मला ही याबद्दल जरा सांगा ना. आपण कॉफी घेता घेता बोलू या.पाटील म्हणाले.


संतोष कॉफी घेत सांगू लागला - "सरह्याला 'इनडोर फार्मिंगकिंवा 'अर्बन फार्मिंगअसं ही म्हणतात. एका इमारतीत एल. इ. डी. लाईट्सने सूर्यकिरणांसारखा प्रकाश तयार करून चोवीस तास प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस) करून भाज्या पिकवायच्या. बीजांना लागणारं पाणी हे हवं तेवढंच द्यायचं. आणि ते आम्ही पेटंट केलेल्या मायक्रोनॉझल्सद्वारे समसमान डिस्ट्रिब्युट करायचं. न वापरलं गेलेलं पाणी पुन्हा वापरायचे. कार्बन डाय ऑक्साईडचा ही पुरवठा लागेल तेवढाच करायचा. सगळी प्रोसेस एका सॉफ्टवेयरद्वारे नियंत्रित होते. ह्यामुळे भाज्या एकाच गुणवत्तेच्या तयार होतात. ह्यात तीस टक्के कमी पाणी लागतंकेमिकल्स नाहीत आणि चोवीस तास सूर्यप्रकाशाने पीकही दुप्पट ते तिप्पट वेगाने येतं."

"फँटास्टिक. संतोष. तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे म्हणून नावानेच हाक मारतो. मला सांग हे सगळं तुला सुचलं कसं?

"सरमाझ्या वडिलांनी - शेतीपायी तुझे हाल नकोअसं म्हणून बळजबरीने इंजिनियरिंगला घातलं. माझ्यासारखे कित्येकजण असे इंजिनियर झालेत. आमच्या स्टार्टअपमधे आम्ही सगळेच तसे आहोत. पण सरआमच्या रक्तातला शेतकरी कसा जाणार?

एका नव्या पर्वाला सुरुवात होतेय सर. शेती शहरात येतेय आणि इंजिनियरिंगची पदवी घेतलेले शेतकरी तयार होतायत. ज्या शेतकऱ्याला कोणी दारात उभं करत नव्हतंतोच शेतकरी इंजिनियरच्या वेषात थेट एसीमधल्या सूटवाल्यांच्या मिटींगमधे जाऊन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतोय. आता आम्हाला कोणी अडवू शकत नाही सर. आता आम्हीच क्रांति करायला पाहिजे.

पाटील थक्क होऊन त्या आधुनिक शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाकडे कौतुकाने बघत राहिले.

 

मानस











1 comment:

  1. छानच प्रयोग, असे खूप सारे अभियंता शेतकरी देशाला मिळोत.

    ReplyDelete