प्रत्येकाचा आनंदी, आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा सतत प्रयत्न चालू असतो. आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर असा, अगदी बालपण ते वृद्धावस्था यामध्ये येणारे चढ-उतार यांना समर्थपणे तोंड देऊन पुढे जाता येणे महत्वाचे.
WHO - जागतिक आरोग्य संघटनेने दहा जीवन व्यवस्थापन कौशल्ये नमूद केली आहेत. यांचा उपयोग आयुष्य सुकर-सुलभ करायला कसा होऊ शकतो या विषयीचे माझे विचार या लेख मालिकेमधून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
जीवन कौशल्ये - कानमंत्र पहिला
इंग्रजीत असलेला life-skills हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकलेला असतो. सर्वसाधारणपणे मुलांना शाळेत value-education च्या तासाला ही शिकवली जातात. मुलांपुरतीच ती सीमित न राहता प्रत्येकाला
आबाल-वृद्धांनाही त्याचा फायदा घेता येतो. वयाप्रमाणे त्याचे स्वरूप बदलत जाते. कोणत्याही वळणावर जीवनाचा प्रवास सुकर
झाला तर चांगलेच आहे ना? सदर
लेखमालेत जी दहा जीवन व्यवस्थापन कौशल्ये (Life-Skills) आहेत त्यांची माहिती आणि उपयोग माझ्या
दृष्टीने कसा होतो हे सांगण्याचा प्रयत्न असणार आहे.
या वयात आता कुठे life-skills, वेळ कुणाला आहे असल्या गोष्टी शिकायला? झालं आता सगळं शिकून!! काळ्याचे पांढरे काय उगीच झाले!!! असे मनात येत असेल तर ते विचार पहिले पुसून टाकूया. नवीन काहीतरी वाचायला मिळतंय त्याचा आनंद लुटुया. नवीन विचार आपली विचार क्षमता दृढ करतात. लहान असताना ऐकलेली परीकथा/बोधकथा काही वर्षांनी ऐकली की त्याचा अर्थ नव्याने समजतो.
आजच्या या लेखात ही जीवन व्यवस्थापन कौशल्ये कोणती आहेत त्यांची
तोंडओळख करून घेऊया.
life skills म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रोजच्या जीवनातंले संघर्ष किंवा
आव्हाने यांना
समर्थपणे तोंड देण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असणारी कौशल्ये आणि सकारात्मकता.
▪Self- awareness-(आत्म-जागरूकता) - जरा कानांना ऐकायला बोजड वाटते ना? माझा स्वभाव, इच्छा, आकांक्षा, आवडी-निवडी, मी कोणत्या गोष्टी समर्थपणे
पेलू शकते? कोणत्या गोष्टींचा मला ताण येतो? मी कसा /कशी आहे याची माहिती. को हं?
▪Empathy - (दुसऱ्याच्या भावना जाणण्याची
क्षमता) - दुसऱ्याला काय वाटते? समोरच्या व्यक्तिला आहे तसे स्वीकारणे, समजून घेणे.
▪Critical Thinking - एखाद्या गोष्टीचा साकल्याने
विचार करून निर्णयाप्रत पोचणे.
▪Creative Thinking - विचारांची एक नवी दिशा. त्याप्रमाणे कृती सुद्धा
करणे. सर्जनशील विचार.
▪Decision Making - निर्णय घेणे आणि त्याच्या
परिणामांना सामोरे जाणे.
▪Problem solving - अडचणी/ समस्या सोडवण्याची कला.
▪Interpersonal relations - कौटुंबिक, व्यवसायिक, मित्र परिवार यांच्याशी सलोख्याचे
संबंध ठेऊन ते निभावण्याचे कौशल्य.
▪Effective communication - स्वतःशी आणि दुसऱ्याशी संवाद साधताना भान कसे ठेवावे? आपले विचार किंवा मते कशी प्रकट करवीत याचे नियोजन.
▪Coping with stress - चुकीच्या कल्पना मनात
धरल्याने शरीरावर आणि मनावर येणाऱ्या
ताणावर मात कशी करता येईल? याची उपाययोजना.
▪Coping with emotions - सकारात्मक आणि नकारात्मक विचारांबद्दल जागरूकता.
पुढच्या लेखात जाणून घेऊया self awareness बद्दल सविस्तर माहिती…….
पूर्वा रानडे
तुमचे लेख नेहमीच interesting असतात. पुढचं वाचण्याची उत्सुकता आहे
ReplyDeleteजीवन कौशल्य अगदी छान, योग्य सांगितली आहेत. सर्वांसाठी खरंच आवश्यक
ReplyDelete