माणसांची वर्दळ जशी कमी झाली...
पक्ष्यांना जणू छान मोकळीक मिळाली...
आता आकाश तर त्यांचच
कारण विमानं नाहीत उडत अन् धरतीही
त्यांची...
कारण माणसं घरातून नाही निघत....
मंदिर, मशिदी
झालेत बंद
कारण तिथे सध्या देव नाही वसत....
रूग्णालयात कामात असतो
तिथे सेवा देताना तो नाही थकत !
धर्म जाती पंथांच्या भिंती धडाधड
कोसळल्या
त्यासाठी कुठूनतरी व्हायरस निसर्गानेच
पाठवला...
देवा निसर्गा, पुरे कर तुझा कोप पण बुद्धी देऊन जा.....
मनांची उंची आभाळाजेवढी करून जा...
तुटतच चालला होता माणसापासून माणूस...
धनसंपत्तीच्या मोहात बनला होता कानूस...
देहाने ही दूर करून दिलास तू मोठा फटका
एक दुसऱ्याला पहाण्यासाठी लागेल आता
चटका...
बंदिवान भृंगाची तडफड आता त्याला
कळेल....
लोभ मोह अहं मदाचा बर्फ आता वितळेल...
प्रेम स्नेह नीतीचे मूल्य त्याला
कळेल.....
भ्रष्ट पैसा अनीती स्वार्थलोलुपता दंभ
डोळ्यासमोर जळेल...
पर्यावरण सृष्टीसाठी आता त्याला झटव...
होईल जेव्हां असं तेव्हां बा निसर्गा,
फक्त एक कर...स्टॅच्यू म्हणून या जगाला
‘लॅाकडाऊन’ कर....तू लॅाकडाऊन कर......!!
स्मिता शेखर कोरडे
छान !
ReplyDelete