कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
ह्या घटनेला पार्श्वभूमी होती ती देशाच्या संसदेने मंजूर केलेल्या दोन घटना दुरुस्त्यांची. त्यातील एका दुरुस्तीने नागरिकाचा ‘संपत्तीचा हक्क’ हा मूलभूत हक्क नसल्याचे मानले होते. ह्या दुरुस्तीमुळे संपत्ती कमावणे, राखणे वा हस्तांतरित करणे या नागरिकांच्या हक्कांवर सरकारी नियंत्रण आले असते. संसदेने मंजूर केलेल्या दुसऱ्या घटना दुरुस्तीद्वारे संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यास न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असा अधिकार सरकारने स्वत:कडे घेतला.
ह्या संदर्भात केशवानंद भारती यांच्या याचिकेस अनन्यसाधारण महत्त्व आले. यात गुंतलेल्या मुद्दय़ांचे महत्त्व लक्षात घेता त्यावर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच १३ न्यायमूर्तीचे खंडपीठ बसवले गेले. हा एक न मोडला गेलेला विक्रमच आहे. अनेक दिग्गज वकिलांनी ह्या खटल्यात महत्वाची भूमिका बजावली होती. दोन महिन्यांहूनही अधिक काळ सलग सुनावणी झालेल्या या खटल्याचा निकालही प्रदीर्घ म्हणता येईल असा आहे. कायद्याचा सर्वांगाने विचार करून, त्याचा शब्दश: कीस पाडणाऱ्या या प्रकरणात विविध मुद्दय़ांच्या अनुषंगाने एकूण ११ निकाल दिले गेले. अंतिम निकाल. तो सात विरुद्ध सहा अशा बहुमताने दिला गेला.
नागरिकांना घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार लोकनियुक्त संसदेस नाही, कारण ‘राज्यघटनेची मूलभूत चौकट कोणतेही सरकार बदलू शकणार नाही’ हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय.
वास्तविक रूढार्थाने केशवानंद भारती हरले, कारण न्यायालयाने असा निर्णय देतानाच भारती यांची जमीन अधिग्रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मूलभूत अधिकारांचा भंग होत नाही, असे स्पष्ट केले. पण बहुमताच्या जोरावर वाटेल ते करू पाहणारे सरकारही जिंकले नाही. हे या खटल्याचे महत्वाचे वैशिष्टय़. हा खटला भारताच्या न्यायालयीन इतिहासात महत्वाचा खटला मानला जातो
ह्या निकालामुळे तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी संतापल्या होत्या. संसदेत बहुमत असेल तर पंतप्रधान काहीही करू शकतात ह्या गृहितकाला ह्या निर्णयाने धक्का दिला. त्यामुळेच ह्या खटल्यात भाग घेतलेल्या तीन न्यायाधीशांचे, न्या. जे एम शेलाट, न्या.ए एन ग्रोव्हर आणि न्या.के एस हेगडे यांचे सरन्यायाधीशपद कायमचे हुकले. हे तिघे न्यायाधीश वा खुद्द केशवानंद भारती यांचे वैयक्तिक पातळीवर या खटल्यात नुकसान झाले, हे खरेच. पण त्याच वेळी या निर्णयाने भारतीय राज्यघटनेचे मात्र भले झाले. केशवानंद भारती यांच्या निधनामुळे ह्या साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला.
भारतीय संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले, पण ते शांततेत, सामंजस्याने पार पडले असे म्हणता येणार नाही. काही राज्यसभा सदस्यांनी अशोभनीय वर्तन केल्याने त्यांना निलंबित करावे लागले. हे सर्व पाहता संसदेत कसे वागावे ह्याची नियमावली लवकरच लागू करावी लागेल ह्यात शंका नाही. कामगार कायद्यांतील गेली कित्येक वर्षे खोळंबून राहिलेल्या सुधारणा रेटल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. गेले वर्षभर या विधेयकांवर संसदेच्या समितीत चर्चा झाली आणि तीत सर्वपक्षीयांचा समावेश होता. सरकारने मांडलेल्या मूळ कामगार सुधारणा विधेयकावर या समितीमार्फत जवळपास शंभरभर सुधारणा सुचवल्या गेल्या आणि त्यापैकी तीनचतुर्थाश स्वीकारल्या जाऊन त्या अनुषंगाने विधेयकांत बदल केले गेले. वर्षभराच्या साधक-बाधक चर्चेनंतर अटलबिहारी वाजपेयी सरकारने प्रस्तावित केलेल्या या सुधारणांना अखेर कायद्याचे स्वरूप आले, ही बाब आपल्या औद्योगिक विकास आणि स्थैर्य यासाठी आश्वासक ठरते.
कृषी कायद्यांबाबत विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचे सरकारचे म्हणणे खरे आहे पण बहुमत सरकारकडे असूनही अशी स्थिती का येते हे सरकारचे अपयश नाही का? या नव्या कायद्यांमुळे लहान आणि मध्यम शेतकरी अधिक आत्मनिर्भर होतील, कारण आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी यापुढे त्यांना आसपासच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे शेतकरी हव्या त्या ग्राहकास हव्या त्या किंमतीला आपला शेतमाल विकू शकेल. तसेच, या विधेयकांचा कायदा झाला की शेतकरी आपल्या संभाव्य पिकाच्या विक्रीसाठी त्यांना हवे त्याच्याशी दर निश्चित करून शेतमाल विक्रीचा आगाऊ करार करू शकतील. म्हणजे एका अर्थी कंत्राटी शेतीची त्यास मुभा राहील. या नव्या कायद्यांमुळे शेतकरी आणि त्यांच्या पिकांचे संभाव्य ग्राहक या दोघांनाही सोयीची अशी एक नवी व्यवस्था तयार होईल. मात्र ही यंत्रणा तयार होईपर्यंत एक अनिश्चितता शेतकऱ्यांच्या मनात राहणार हे नक्की.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अनेक राजकीय नेते व त्यांचे निकटवर्ती कब्जा करून बसले
आहेत. ही सत्ता सहजी सोडणे अनेकांना शक्य नाही. थोडक्यात एक जुनी व्यवस्था मोडीत
काढून एक नवी व्यवस्था स्थापित करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. त्याला वेळ
लागणार आहे. पण ह्या नव्या व्यवस्थेचे फायदे समोर आल्यावर शेतकऱ्यांचा फायदाच होईल
अशी आशा करुया.
US Open ह्या टेनिस स्पर्धेत ह्यावर्षी एका विचित्र कारणामुळे नोवाक जोकोविचला स्पर्धेबाहेर करण्यात आले. रागाच्या भारत त्याने चेंडू मारला तो लाईनमन जजला लागला. आणि नियमांनुसार त्याला ह्या स्पर्धेबाहेर करण्यात आले. जोकोविच हा अमेरिकन स्पर्धा जिंकणार असे नक्की होते कारण फेडरर, नदाल ह्या स्पर्धेत भागच घेणार नव्हते. पण तसे व्हायचे नव्हते हेच खरे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका आणि पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांनी विजेतेपद पटकावत युवा खेळाडूंचे नवे राज्य सुरू झाले आहे असे जणू सूचित केले आहे.
IPL स्पर्धाही अनेक
अडथळ्यांची शर्यत पार करत सुरु झाली आहे. टेनिस काय किंवा क्रिकेट काय
प्रेक्षकांशिवायचा रिकामा स्टेडियम डोळ्यांना सुखावत नाही हेच खरे. पण ही आजच्या
काळाची गरज आहे त्यामुळे आलीय भोगासी असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.😞😞
लुकाशेंको |
स्नेहा केतकर
मधलं पान नेहमीप्रमाणेच उत्तम व माहितीपूर्ण. केशवानंद भारतींची माहिती आवडली.
ReplyDeleteVery good Sneha. As usual Covered so many events. This time in more detail
ReplyDeleteJournalist roots of Sneha!!
ReplyDeleteऊत्तम आणि माहिती पूर्ण लेख
ReplyDelete