कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
जून महिन्यातील 'मधले पान' मध्ये मुख्यत्वे परदेशातील घडामोडींचा आढावाच घ्यायचा असे ठरवले होते. कारण देशातील बातम्यांत प्रामुख्याने कोरोना व कोरोनाविषयक बातम्या हाच मुद्दा चर्चेत होता. पण जूनमधील शेवटच्या आठवड्यात काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्यावर दृष्टीक्षेप टाकणे गरजेचे आहे.
येत्या ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण होतील.‘अनुच्छेद-३७०’ रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मिरातील प्रमुख राजकीय पक्षांशी केंद्र सरकारची चर्चा होणे ही घटना स्वागतार्ह आहे. या राज्यात लोकशाही प्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक बोलाविली असणार यात शंका नाही. 'अनुच्छेद ३७० पुन्हा आणा' ही काश्मीरातील ‘सर्व राजकीय पक्षांची मागणी अर्थातच स्वीकार होणे कठीणच आहे. पण जम्मू-काश्मिरला तातडीने राज्याचा दर्जा देऊन लवकरात लवकर लोकनियुक्त सरकार प्रस्थापित केले जावे हे या सर्व पक्षांचे म्हणणे मात्र अत्यंत संयुक्तिक आणि स्वीकारार्ह ठरते. या सीमावर्ती प्रांतातील परिस्थिती पूर्वपदावर यावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी लागेल.
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी |
यातील
पहिला मुद्दा म्हणजे त्या राज्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा.
लडाख या प्रदेशास स्वत:चे
अस्तित्व आहे, चेहरा आहे आणि सर्वसाधारणपणे मानले जाते तसा तो
बुद्धधर्मीय नाही. या प्रांतात मुसलमानधर्मीयांची संख्या ही लक्षणीय आहे. ज्याप्रमाणे जम्मू- प्रांतात
हिंदुबहुल आणि श्रीनगरी काश्मीर खोऱ्यात इस्लामी अधिक त्याप्रमाणेच मध्य आणि पूर्व
लडाखात बुद्धधर्मीय, हिंदू अधिक आणि पश्चिम लडाखात
मात्र इस्लामींचे प्राबल्य असे चित्र आहे.
भाजपचे स्थानिक खासदार जमयांग सेरंग
नामग्याल यांनी
गुरुवारीच लडाखसाठी स्वतंत्र विधिमंडळाची मागणी केली. सर्वोच्च
न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा मतदारसंघ
पुनर्रचनेचे काम सुरू झाले आहे.
ह्यावर अनेक मत-मतांतरे होतीलच. पण तरीही हा प्रदेश मूळपदावर आणण्याच्या
प्रक्रियेला सुरवात झाली या घटनेचे स्वागत आहे. २३ जून १९५३ या दिवशी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचा जम्मू-काश्मीर मधील
तुरुंगात रहस्यमय परिस्थितीत मृत्य झाला होता. याच दिवसाच्या आसपास ही चर्चा झाली हा योगायोगाच
म्हणावा लागेल.
नाओमी ओसाका |
इब्राहिम रइसी |
मध्य पूर्व देशांत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. इराणमध्ये
कट्टर धार्मिकतावादी असलेले इब्राहिम रइसी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
इराण ही जगातली एकमेव घटनात्मक धर्मसत्ता आहे. ‘प्रचंड मताधिक्याने’ रइसी निवडून आल्याचे दावे अधिकृत यंत्रणांनी केले तरी प्रत्यक्षात ४९
टक्केच मतदारांनी मतदान केले.
इराण अणुकरार मध्यंतरी ट्रम्प यांच्यामुळे धोक्यात आला होता. आता त्याचे
पुनरुज्जीवन रइसी यांच्यासारख्या कट्टरपंथी अध्यक्षांच्या निवडीमुळे लांबणार किंवा
बारगळणार हे आता बघायचे. इराणच्या
जनतेला मात्र मोकळा श्वास घेण्यासाठी अजून वाट पहावी लागणार हे नक्की.
सौदी अरेबिया ह्या इराणच्या कट्टर शत्रू आणि कट्टर
धार्मिकतावादी देशांत मात्र स्त्रियांना अनेक सवलती देण्याची चढाओढ लागली आहे.
आपल्या देशातील निम्म्या लोकांना आपण अशा बंधनात ठेवू शकत नाही असा तेथील
राज्यकर्त्यांना साक्षात्कार झाला आहे. पण कशामुळे का असेना पहाट तर झाली असेच
तेथील महिलांना वाटत असेल.
ह्या महिन्यात अतिशय प्रसिद्ध व्यक्तींचे निधन झाले आहे. केनेथ कौंडा १७ जून रोजी निधन पावले. आफ्रिकन
आधुनिकतावादाचे स्वप्न पाहणाऱ्या पॅट्रिक लुमुम्बा, रॉबर्ट मुगाबे, नेल्सन मंडेला या नेत्यांच्या बरोबरीने केनेथ कौंडा यांचे नाव घेतले जात होते. महात्मा गांधींचा प्रभाव मान्य करणारे केनेथ कौंडा, तेथील सविनय कायदेभंग चळवळीचे नेते ठरले. नऊ महिन्यांचा कारावासही त्यांनी भोगला आणि १९६२ च्या निवडणुकीत त्यांनी युनायटेड नॅशनल इन्डिपेन्डन्स पार्टीचे नेते म्हणून विजय मिळवला. झाम्बिया देशाचा जन्म १९६४ मध्ये झाल्यावर कौंडा हेच पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. आफ्रिका खंडाचा इतिहास लिहिताना हे नाव आदराने लिहिले जाईल हे नक्की.
मिल्खा सिंघ यांचेही दु:खद निधन झाले. अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आपल्या
आयुष्यात यश मिळविले. त्यांच्या आयुष्यावर निघालेला सिनेमा अनेकांनी पहिला असेलच. फाळणीच्या
अफाट वेदना पाहून आणि पचवून ते उभे राहिले. मनात कोणतीही कटुता ना ठेवता. १९५८
च्या आशियाई स्पर्धामध्ये त्यांनी ४०० मीटर्समध्ये सुवर्णपदक जिंकलेच, शिवाय विख्यात पाकिस्तानी धावपटू अब्दुल खलिकला २०० मीटर्समध्येही हरवून
दाखवले. मिल्खा सिंग यांनी आशियातील त्यावेळच्या सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या या धावपटूवर लाहोरमध्ये पुन्हा निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्यावेळचे पाकिस्तानी
शासक जनरल आयुब खान यांनी त्यांना ‘फ्लाइंग सिख’
हे बिरुद त्या शर्यतीनंतरच बहाल केले होते. त्यांना कट्टा टीम तर्फे
आदरांजली
जॉन मॅकअफी |
संगणकासोबत मैत्री असणाऱ्या अनेकांना 'मॅकअफी' हे नाव परिचित असेलच. संगणकात
उच्छाद मांडणाऱ्या व्हायरसचा नायनाट करणारे जगातील पहिले व्यावसायिक. ‘अँटिव्हायरस सॉफ्टवेअर’ निर्माण करणारा गणितज्ञ,
संशोधक.. ते करचुकवेगिरी, बदफैलीपणा, वादग्रस्त विधाने यांमुळे कुप्रसिद्ध झालेला फरारी उद्योगपती अशा
चढउतारांनी भरलेला जॉन मॅकअफीचा जीवनप्रवास बार्सिलोनाच्या एका तुरुंगात अखेर
संपला. मृत्यूनंतर काहींनी त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची उकल ‘कवी वा संगीतकाराइतका विक्षिप्त संगणकतज्ज्ञ’
अशी केली आहे. १९८७च्या
दरम्यान त्याच्या डोक्यात संगणकीय व्हायरसना अटकाव करणाऱ्या सॉफ्टवेअरची कल्पना
आली आणि ‘मॅकअफी असोसिएट्स’चा जन्म झाला. तोवर या सॉफ्टवेअरचे
व्यावसायिक मूल्य काहीच नव्हते. जॉन मॅकअफीच्या सॉफ्टवेअरने गडगंज पसरलेल्या
अँटिव्हायरस उद्योगाचा पाया रचला. या कंपनीने जॉनला अफाट संपत्ती आणि प्रसिद्धी
मिळवून दिली. मात्र इतक्या बुद्धिमान
असलेल्या व्यक्तीला असा मृत्यू यावा हे दुर्दैव!! संगणकातील 'व्हायरस' वर उतारा
शोधणाऱ्या गणितज्ञाला मनावर ताबा मिळवता आला नाही हेच खरे.
स्नेहा केतकर
छान स्नेहा
ReplyDelete