नृत्य - माझे पहिले प्रेम



प्रेम म्हटले की एखादी व्यक्ति समोर येते. पण पहिले प्रेम हा विषय ऐकल्यावर जी पहिली गोष्ट माझ्या मनात आली, ती होती नृत्य- नाच....

लहान होते तेव्हा सिनेमा, नाटक आणि टिव्हीवर गाणी बघायचे. त्यातला नाच मला नेहमीच आवडायचा. नवरंग सिनेमामधले संध्याचे डान्स मला खूप आवडले होते. मी परकर पोलकं घालून, ती गाणी म्हणत नाच करत असे.


'नाच रे मोरा' हे माझे आवडते गाणे होते ....
त्यात ‘मोर’ आणि ‘नाच’ हे दोन्ही होते ....

एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे नाच ही मुलींनी शिकण्यासारखी गोष्ट नाही, असे म्हणून मी dance नाही शिकू शकले.

तरीही मी माझे पहिले प्रेम कधीच विसरले नाही. केतकीच्या वेळी दिवस होते, तेव्हा सतत म्हणायचे की ही बेबी खूप छान dance करणार, .... आणि हो, झालंही तसंच. माझे पहिले प्रेम केतकीचं पहिले प्रेम बनले......



मयुरा वझे

3 comments: