(वृत्त - कालगंगा)
माळ घालुनी दिव्यांची रातीला ह्या अंगणी,
भास होता की उतरली अंबराची चांदणी
रेखीती नक्षत्रे रांगोळी नभीच्या अंगणी,
पाहुनी त्यांना केली का रांगोळीची मांडणी
लक्ष्मी येता द्वारी तिला पूजिते सुवासिनी
शालू तिचा भरजरी, नाकी नथीची कोंदणी,
वाट कोणाची बघे ती ओलावूनी पापणी
हाती ती निरांजनी घेऊनी उभी साजणी,
वाट पाहे ती सख्या रे तुझी प्रत्येकी क्षणी
दीप प्रज्वलित हे तारांगणी त्या अंबरी
एकरूपी होऊ पाही अंतरंगी पक्षिणी
डॉ नम्रता कुलकर्णी
गैरमुरद्दफ गझल
2122 2122 2122 212
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
वृत्त - कालगंगा
सुरेख कविता नम्रता
ReplyDelete