मला उभं राहायचंय, स्वतःसाठी स्वतःलाच झटायचंय
मनाची मरगळ काढायचीय, निराशांची जळमटं दूर सारायचीयत
हा ही काळ जाईल, हा ही संघर्ष संपेल
असा विश्वास, अशी उमेद, अशी जिद्द जपायचीय
देवळातील देव अजूनही प्रसन्न आहे
बकुळीच्या फुलांचा सुवास अजूनही ओंजळीत
कायम आहे
रस्त्यावर बहरलेली बोगनवेल अजून टवटवीत
आहे
मलाच कोमेजून कसं चालेल? असं दिशाहीन होऊन कसं चालेल?
कठीण प्रसंग आयुष्यात येणारच
कधी वजा, कधी
जमा होणारच
मनातलं मळभ दूर सारायला हवं
आसू आणि हासूंचं समीकरण साधायला हवं
बरसू दे कधी मेघ डोळ्यांतून गालांवर,
घसरू दे बांध भावनेच्या तालांवर
येणारी सकाळ नक्कीच सुंदर असेल,
येणारे दिवस चैतन्यमयी असतील
या आशेवर शिक्कामोर्तब करायचं
उद्याच्या उष:कालासाठी आज उभं राहायचं
पदर खोचून त्याचं नव्याने स्वागत करायचं
कारण?.........................................
कारण,
मला उभं राहायचंय , स्वतःसाठी स्वतःलाच झटायचंय
गौरी भावे गुप्ता
प्रेरणादायी !
ReplyDeleteKhup chan Gauri
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup chhan.
ReplyDeleteAashawadi honyasathi Navi umed denari poem aahe.
🙏🙏👍👍🙏🙏