माझा महिला दिन



"ताईआज कामाला न्हाई येऊ शकत. खूप पोटात दुकतंय.सकाळी सात वाजता लताचा फोन.
सकाळची सुरवात माझ्या चिडचिडीने झाली. किती सुट्या घेतीये ही ... ह्या महिन्यातली हिची ही पाचवी सुट्टी. 

मनातल्या मनात चिडचिड करत मी कामाचा ढीग उपसायला सज्ज झाले. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर लता कामावर आली. दुर्मुखलेलीदमलेली. तिला पाहून मी केलेल्या चिडचिडीची मलाच शरम वाटली. काम करता करता लता सांगायला लागली. ताईकाल ३००० रुपये खर्च झाले हॅास्पिटलवर. डोळ्यात पाणी येत होतं बिचारीच्या. 

"ताईखाली पार्कींगला ज्या टायलेट हाएत नातेला एकतर कुलुप असतंन्हाईतर त्या घाणीनं भरलेल्या असतात. म्हाज्यासारख्या बऱ्याचजनी सकाळची ७ ची गाडी पकडून हितं येतात. आम्ही ६-७ घरची कामं करतोआनी सांजच्याला ५ वाचता परत जातो. इतक्या वेळात येखादं टायलेट बरं मिळतं. पन ताई वीस बिल्डींगी हायेत. येक काम पहिल्या तर दुसरं पाचव्या बिल्डींगीमधी. बाथरूमला जायाला लागू न्हाई म्हनून पाणी कमी पितो. पॅड टाकाया डबा पन नसतो बाथरुममधी. ताईकाहीतरी करा नं आमच्यासाठी. खूप उपकार व्हतील ". ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. तिला मुतखडयाचा त्रास सुरू झाला होता.

ऐकून सुन्न झाले. ह्याचा छडा लावायचाच मनाशी पक्कं केलं. बिल्डींगच्या WhatsApp group वर मदतीसाठी आवाहन केलं. माझ्यासारख्या चार-पाच जणी 'माणुसकीअसणाऱ्या निघाल्या. 'अड्डा' ह्या App वर एकाच वेळी सगळ्यांनी तक्रार नोंदविली. २४ तासाच्या आत काम सुरू झालं.

काल दुपारी दोन वाजता दाराची बेल वाजली. दारात हाऊसकिपींगचा इनचार्ज हातातल्या मोबाईलवर चकचकीत स्वच्छ केलेल्या टॉयलेटचे फोटो दाखवायला उभा होता. त्याला मनोमन धन्यवाद दिले. आज सकाळी लता कामावर आली. डोळ्यातलं पाणी आणि जोडलेले हात बरंच काही सांगून गेले.

माझा माझ्या पध्दतीने 'महिला दिनसफल झाला.





आरती जोशी 




1 comment:

  1. :-D 👌
    पुलंच्या लेखात उल्लेखलेली समाजकार्य करणारी अतिविशाल मंडळं आठवली. 😁

    ReplyDelete