मिळून साऱ्याजणी .......


स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्या बाळ यांचे काल पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन करून आल्यानंतर लिहिलेली ही कविता


मिळून साऱ्याजणी.....

तू शारदा, तू विद्या, लेऊन आलीस, देऊन गेलीस तेज भास्कराचे...

मृत्यूला दुःखद म्हणू नये...सुखद सुखान्त म्हणा हो जना
हे तेज विचारांचे तत्व आचरणाचे....

कार्यबाहुल्यात रमे ही संन्यासिनी...
ऐहिकांना क्षुद्र माने अशी योगिनी...

कःपदार्थ वाटती तिज आराम सुखे स्वार्थ
जीवनाचा शोधिला जो 'स्व' ला योग्य वाटे अर्थ....

अड्ग उभे राहणे, कसाही येता झंझावात
तियेचा हाच असे बाणा

सुंदर समाजाचे स्वप्न पाहिले
झटे अविरत स्त्रियांच्या कल्याणा...

जोडित रेशीमबंध सदा मैत्रीचे....
अवडंबर ना कसले, राखी भान मानवतेचे...

देव धर्म रीत रिवाज सारे सामावे स्त्री कल्याणात
सदा..अग्निकुंड धगधगते अंतरी सर्वदा....

चौफेर नजर तिची प्रतिभावान असे वाणी
एकटी नसे कधी विद्या राही 'मिळून साऱ्या जणी'...!!

         






स्मिता शेखर कोरडे







2 comments: