नाचणीचा हलवा

नाचणी सांदण/ पुडिंग /हलवा / निनावं अशा बऱ्याच नावानी ऐकलाय हा पदार्थ!!

माझी आई हलवा म्हणते म्हणून मी पण  हलवा म्हणते. मी आई कडून शिकलेली रेसिपी.

साहित्य:
नाचणी सत्व/पीठ - १वाटी
ले खोवलेले खोबरे -१/२ वाटी
गूळ -१वाटी (आवडीप्रमाणे कमीजास्त करावा)
नारळाचं दूध -१वाटी
पाणी - आवश्यकतेनुसार
किंचित मीठ
ड्रायफ्रूट्स - पाव वाटी
सुंठपूड - १ चमचा
खसखस -१ चमचा
वेलदोडा पूड- १/२चमचा

कृती:


नाचणी सत्व + ओलंखोबरं + गूळ + नारळ दूध आणि पाणी मिक्स,किंचित मीठ,सुका मेवा,किंचित खसखस भाजून, वेलदोडा पूड, सुंठ सगळं छान मिक्स ( साधारण भज्यांच्या पिठासारखी )करून थोडावेळ ठेवून द्यावे आणि कुकरच्या भांड्याला तूप लावून ढोकळा उकडतो तसे उकडून घ्यावे. १५ मिनीटे ठेवून, गार करून वड्या पाडाव्यात. 
वरून परत ड्राय फ्रुटस घालून सर्व्ह करावे.
*थोडं मिश्रण अजून पातळ केले तर खरवसासारखे होते. तसेही छान लागते.


* सत्व बनवायला वेळ नसेल तर नाचणी पीठ घेतले तरी चालते. (With fiber) तसेही छानच होतात. 

सौ. श्वेता अनुप साठ्ये 

1 comment:

  1. आजच साधारण याच धरतीची एक पाककृती केली. 'धोंडस'म्हणे! त्यात नाचणी पिठाऐवजी रवा आणि कलिंंगडाचा पांढरा भाग किसून घातला. पाणी घालावेच लागत नाही. कलिंगडाच्या पाण्यात पीठ भिजते. छानच झाले. आता हे ही करून बघते.

    ReplyDelete