नामसंकीर्तन:कन्नड कबीर


शिशुनाळ शरीफ (१८१९- १८८९ )


शेख मोहम्मद अविंध ह्या आपल्या महाराष्ट्राच्या कबीराप्रमाणेच कर्नाटकतही कबीर होऊन गेले. त्यांचे नाव " शिशुनाळ शरीफ" .
हावेरी जिल्ह्यातील ' शिशुविनहळ्ळ ' या खेडेगावात इमामसाहेब यांच्या पोटी ते जन्माला आले. वडीलांचे गुरू हजरेश काद्री हे मुसलमान असूनही " लिंग दीक्षा " द्यायचे, जी हिंदू लिंगायत समाजाची पद्धत आहे. त्यामुळे लहानपणापासूनच हिंदू-मुस्लिम एकच असं मनात बिंबवलं गेलं. "गोविंद भट्ट" यांचं शिष्यत्व पत्करून शरीफजींनी सामाजिक कार्य आपल्या "तत्व पदगळू" या काव्याद्वारे केलं. लोकगीते, लोककला नाटके याद्वारे समानतेचा प्रसार केला. मुस्लिम म्हणून जन्माला आले पण आयुष्यभर हिंदूंच्या सहवासात राहिले.
सी.अश्वथ या थोर लोककला गायकानी त्यांच्या अनेक पदांना संगीतबद्ध करून गायले आहे.

भजन प्रस्तावना 

तरवल्ला तगी निन्ना तंबूरी स्वरा भजन लिंक 

भजन अर्थ 

आजच्या काळात सुद्धा अजून एक कन्नड कबीर आहेत.
इब्राहिम सुतार -

१०-५-१९४० ला बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर या गावात त्यांचा जन्म झाला. सूफी संगीताबरोबरच कन्नड लोकसंगीत,भजने यांचा ते कार्यक्रम करतात. त्याद्वारे मिळणारे धन ते समाजकार्यासाठी वापरतात. कुराण आणि हिंदू तत्वज्ञान, गीता यावर ते प्रवचन करतात. त्यांच्या गायनाच्या समूहात हिंदु आणि मुस्लिम दोन्ही कलाकार उत्तम कला साजरी करतात. मराठी नाटकातल्या / वगातल्या " सवाल- जबाब" सारखा! 
देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी कायम आवाज उठवला आहे. रस्ते तयार करणे, सरकारी शाळेला मदत करणे, अडीअडचणीला कुणालाही मदत करणे हेच त्यांचं काम. 
१९७० ला त्यांनी Folk Music Festival केला. ते हिंदू-मुस्लिम बांधव्याचे ,एकीचे मोठे उदाहरण आहेत.

१९९५ ला कन्नड राज्योत्सवा हा सन्मान आणि २०१८ ला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे. कन्नड समजणा-यांनी त्यांच्या प्रवचनाचा किंवा नाट्याचा अनुभव " यू ट्यूब " वर जरूर घ्यावा.

ज्योती कुलकर्णी


1 comment: