अदिती, एक उच्चशिक्षित, महत्वाकांक्षी होतकरू मुलगी. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय आणि स्वतः च्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करणार नाही हा तिचा प्रण, आणि हा प्रण पूर्ण करेपर्यंत वयाची पंचविशी तिने ओलांडलेली असते. मंदार, अदितीला शोभेल असा अनुरूप जोडीदार. रंग, रूप, आवडी, निवडी सगळं दोघांचं सारखं. अदितीला समजून घेणारा आणि तिच्या करिअरलाही तितकंच महत्व देणारा जोडीदार लाभला.
लग्नानंतर दोघांनी निर्णय घेतला की, एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी-गरजा-अपेक्षा ह्या समजावून घेतल्याशिवाय राजा-राणीच्या संसारात तिसऱ्याचा हस्तक्षेप नको. एकमेकांना समजावून घेतल्यानंतर, स्वतःचं घर, गाडी, चांगला बँकबॅलन्स असल्याशिवाय बाळाचा विचार तर करायचाच नाही. ह्या सगळ्यांमध्ये लग्नाला ३-४ वर्ष होऊन जातात, आणि मग दोघांना मनापासून वाटायला लागतं की आता पती-पत्नी च्या या नात्याला अजून दृढ करण्यासाठी आपल्या प्रेमाचा अंश, आपलं एक बाळ घरात यायलाच पाहिजे. प्रयत्नांची गाडी सुरु होऊन एक वर्ष उलटतं, पण यश काही पदरात पडत नाही.
कधी बीज बनत नाही, कधी बीज बनतं पण फुटत नाही, कधी बीज फुटून बाहेर येतं पण रुजत नाही. कधी गर्भाशयाची तयारी नसते म्हणून गर्भ टिकत नाही. या शारीरिक समस्यांसोबतच, कधी मनाची तयारी नसते, दिवसभराच्या कामामुळे जीव वैतागून गेलेला असतो,तर कधी ऑफिसच्या कामामुळे मंदार बाहेरगावी गेलेला असतो........अशा अनेक कारणांमुळे वर्ष निघून जातं. मग डॉक्टर म्हणतात, IUI / IVF करू, आणि तेंव्हा मंदारच्या तपासण्या करण्याचं ठरतं. त्या तपासण्यांमध्ये कळतं, पुरुष बीजाची संख्या कमी आहे किंवा नॉर्मल पुरुषबीज कमी आहेत, किंवा मोटिलिटी कमी आहे.....अशी अनेक कारणं. मग मंदारचे औषधोपचार सुरु होतात.
या सगळ्या प्रक्रियेत, अदिती आणि मंदारचं शारीरिक, मानसिक, आर्थिक खच्चीकरण झालेलं असतं. सततच्या तपासण्या, औषधोपचार, दवाखान्याच्या चकरा याने ते आधीच वैतागून गेलेले असतात. त्यात शेजारी-पाजारी, नातेवाईक, 'मग कधी देणार गुड न्यूज' असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
या सगळ्यात, अदिती आणि मंदार हेच विसरून जातात की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. एकमेकांना आधार द्यायच्या ऐवजी ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला लागतात. जेंव्हा त्यांनी लग्नाचा विचार केलेला असतो, तेंव्हा लेकरं जन्माला घालायची म्हणून लग्न करायचं हा विचार ही त्यांच्या मनात दूर-दूर पर्यंत नव्हता. आपल्याला समजावून घेणारा, खूप प्रेम करणारा, सुख-दुःखात सांभाळून घेणारा जन्मोजन्मीचा साथीदार लाभेल, या विचाराने त्यांनी लग्न केलेलं असतं. पण हळुहळु ही भावना लोप पावत जाते, आणि 'मूल पाहिजे' ही गरज प्रबळ होत जाते. आपल्या प्रेमाला जगासमोर सिद्ध करायचं असेल तर मूल पाहिजेच, मूल नाही म्हणजे पती-पत्नीचं एकमेकांवर प्रेम नाही, असं सामाजिक समिकरण मनामध्ये रुतून बसतं.
भारतात अशा अदिती आणि मंदारची संख्या लाखोंमध्ये आहे, त्या सगळ्यांना एकच सांगायचं आहे, "Giving birth is not an ultimate goal of your life, but living happy and stress free life is.”
लग्नानंतर दोघांनी निर्णय घेतला की, एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी-गरजा-अपेक्षा ह्या समजावून घेतल्याशिवाय राजा-राणीच्या संसारात तिसऱ्याचा हस्तक्षेप नको. एकमेकांना समजावून घेतल्यानंतर, स्वतःचं घर, गाडी, चांगला बँकबॅलन्स असल्याशिवाय बाळाचा विचार तर करायचाच नाही. ह्या सगळ्यांमध्ये लग्नाला ३-४ वर्ष होऊन जातात, आणि मग दोघांना मनापासून वाटायला लागतं की आता पती-पत्नी च्या या नात्याला अजून दृढ करण्यासाठी आपल्या प्रेमाचा अंश, आपलं एक बाळ घरात यायलाच पाहिजे. प्रयत्नांची गाडी सुरु होऊन एक वर्ष उलटतं, पण यश काही पदरात पडत नाही.
मग निर्णय होतो चांगल्या डॉक्टरला consult करायचा. आधी google वर 5star रेटिंग असलेला, ज्यांनी बाहेर देशात जाऊन ढीगभर डिग्र्या मिळवल्या आहेत असा डॉक्टर शोधला जातो, आणि त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय होतो. पण सोमवार ते शुक्रवार ऑफिसच्या व्यापामुळे डॉक्टरकडे जाणं जमत नाही आणि शनिवारी डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळणं अति मुश्किल. शेवटी अतिप्रयत्न केल्यानंतर शनिवारी पाहिजे त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळते. ५००-७०० रु कन्सल्टिंग फी भरून साधारण ५ मिनिट डॉक्टरांच्या AC केबिनमध्ये बसण्याचा अनुभव अदिती आणि मंदार दोघेही घेतात. त्या ५ मिनिटात स्वतःबद्दल जितकं सांगता येईल तितकं ते दोघे डॉक्टरांना सांगतात.
ज्यात महत्वाचा मुद्दा असतो, 'लग्नाला ५ वर्ष झालीत आणि बाळासाठी प्रयत्न सुरु आहेत'. मग डॉक्टर अदितीला ढीगभर रक्त तपासण्या आणि स्कॅन करायला सांगून पुन्हा आठवड्याभराने बोलावतो. पण पुन्हा ऑफिसच्या वेळा, घरातली कामं, शनिवारची अपॉइंटमेंट ह्या सगळ्या तारेवरच्या कसरतीनंतर दोन-एक महिन्यानंतर भलीमोठी रिपोर्टसची फाईल घेऊन आदिती आणि मंदार डॉक्टरांची AC केबिन गाठतात. तिथून सुरु होतो ८ व्या दिवशी पासून गोळ्या, इंजेक्शन आणि स्कॅन चा खेळ.
कधी बीज बनत नाही, कधी बीज बनतं पण फुटत नाही, कधी बीज फुटून बाहेर येतं पण रुजत नाही. कधी गर्भाशयाची तयारी नसते म्हणून गर्भ टिकत नाही. या शारीरिक समस्यांसोबतच, कधी मनाची तयारी नसते, दिवसभराच्या कामामुळे जीव वैतागून गेलेला असतो,तर कधी ऑफिसच्या कामामुळे मंदार बाहेरगावी गेलेला असतो........अशा अनेक कारणांमुळे वर्ष निघून जातं. मग डॉक्टर म्हणतात, IUI / IVF करू, आणि तेंव्हा मंदारच्या तपासण्या करण्याचं ठरतं. त्या तपासण्यांमध्ये कळतं, पुरुष बीजाची संख्या कमी आहे किंवा नॉर्मल पुरुषबीज कमी आहेत, किंवा मोटिलिटी कमी आहे.....अशी अनेक कारणं. मग मंदारचे औषधोपचार सुरु होतात.
जे नाही त्यासाठी मन मारून जगण्यापेक्षा जे आहे त्यात सुखी समाधानी राहा आणि एकमेकांवर खूप खूप खूप प्रेम करा. नाजूक नात्यांचे हे रेशमी धागे प्रेमाने जतन करा.
Very nice article..
ReplyDeletewell explained..!
ReplyDeleteVery well explained
ReplyDeleteNice article doctor 👌😊
ReplyDeleteVery Well Written!! Kharach pratyekane aahe tyat samadhan manun Happy life jagayla shikle pahije. Aayushya khup sundar aahe aani sarwat mhantwache mhanje ekach aayushya aahe.Live it to the Fullest :)
ReplyDeleteNice article...Eye opener for those who are really struggling for work life balancing & getting satisfaction out of that...
ReplyDeleteNice article mam.
ReplyDeleteKhub chan
ReplyDeleteस्वप्नाली...मस्त सादरीकरण...keep it up..
ReplyDeleteVery nice Article Swapnali.
ReplyDeleteLiked it��
खूप छान लिहिलं आहेस आणि सत्य परिस्थिती आहे आजची. सगळ्यांनी नीट विचार करून पावलं उचलली पाहिजेत, आपल्या जवळ आहे ते जीवापाड जपलं पाहिजे नाहीतर हातातून निसटून जायला वेळ लागत नाही. खूप छान आणि पुढे पण तुला शुभेच्छा..!!
ReplyDeleteAn eye opener for many people.. very well explained... Keep writing dear!!
ReplyDeleteखूप छान लिहिलेस स्वप्नाली.सत्य परिस्थिती आहे सध्याची. लिहित राहा.
ReplyDeleteVery nice article swapnali madam
ReplyDeleteVery nice article swapnali
ReplyDelete