ओंजळीत भरून घेतला आपण,
किती आवडला आपल्याला
आठवतोय ‘तो’ पहिला पाऊस?!
माझ्या हातातून तूझ्या ओंजळीत
आता कसा एकच झाला होता
तुझा आणि माझा ‘तो’ पाऊस!
तुझ्या बरोबर माझाहि जपलास
आयुष्यभर तुझ्या ओंजळीत तू
आपल्या दोघांचा ‘तो’ पाऊस!
आपल्याच कुशीत आला परत
कसा खट्याळ होता नाही
पुढल्या वर्षीचा ‘तो’
पाऊस!
कधी नदीत, कधी डोंगरात,
कधी पानांत, कधी मनांत ,
भेटतच राहीला ‘तो’
पाऊस!
आता खिडकीच्या काचेवर
थरथरत्या ओंजळीतही कसा
शांत वाटतोय ना ‘हा’
पाऊस!
रूचिरा (रागिणी कुलकर्णी )
वा! मस्त
ReplyDelete