फोटो फिचर - वसंताचा बहर

 मी अनुभवलेला वसंताचा बहर, माझ्या संकुलाच्या अंगणात!

उन्हाळ्यात कितीही त्या घामाचा कंटाळा आला तरी निसर्गानी केलेल्या सप्तरंगी उधळणीने ते सगळं विसरायला होतं.

त्यातील काही क्षण तुमच्या समोर सादर करतोय.

आणि हो त्या झाडा वेलींची इंग्रजी नावे सुद्धा देतोय, त्यामुळे बिथरून जाऊ नका.

बंगळुरूमध्ये एप्रिल महिना आला की Facebook, Instagram, सगळीकडे एकच फुल / झाड दिसतं.

हिंदीमध्ये एकदम चोख नाव आहे या झाडाला : बसंत रानी

(Tabebuia / Trumpet Tree)





तब्बल आठ महिने वाट बघितल्यावर खुललेलं हे नीलकमळ. इतकी मनमोहक विरूद्ध रंगसंगती.

असं वाटतं जणू त्याच्या गाभ्यात एक दैदीप्यमान प्रकाशस्रोत आहे.  

(Blue water lily / Nymphaea nouchali)



ही परिजाताची बी. सागर मंथनात निघालेलं हे एक रत्न.

सत्यभामानी आपल्या अंगणी लावला, आणि त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणी.

(Coral Jasmine / Tree of Sorrow / Nyctanthes arbor-tristis)



मध्यभागी असलेला केशरी भाग जणू भगवंताच्या माथ्यावरील टिळा 🙏🏻








बांबूला कित्येक (२०-३०) वर्षातून एकदाच बहर येतो. पण तो आल्यावर बांबू संपतो.

बांबूची वाढ खूप तेजीने होते. अवघ्या २४ तासात बांबू १ मीटर वाढू शकतो. 





हया Shell Ginger (Alpinia zerumbet) च्या कळ्या.

किती सुंदर गुलाबी रंग आहे, नाही का?

असं वाटतं कुणीतरी हातात मोती जपून ठेवलेत.

गजकर्ण रोगावर याच्या मुळाचा औषधी म्हणून वापर करतात.




संत ज्ञानेश्वरांना ज्यानी मोह पडला, त्याच्या सुगंधित पाशातून आपण पामर कसे सुटणार.

मोगरा (Jasminum sambac)








लेकुरवाळी फणस (Jackfruit)













कण्हेर (Nerium oleander) वेगवेगळ्या रूपात आपल्याला आढळते. काही गुलाबी, पांढरा, गडद लाल, पिवळा, फिक्का केशरी.









उन्हाळ्यात केलेल्या छाटणी नंतर याला भरपूर पाने आली 

आणि नंतर  फोटोत दाखवल्याप्रमाणे पांढरी, लाल, जांभळी फुले येतील. (Pseuderanthemum)



सगळ्यांचा नंबर आला मग आवळ्याने का मागे रहावं ?







वसंत ऋतूत आंबा मस्त केसांवर लाली चढवुन मिरवत असतो.

हा आजच्या तरण्या ताठ्या मुलांना सुद्धा लाजवेल. 








मधुमालतीच्या कळ्या उमलतील तेंव्हा पांढरी फुले असतील …





परंतु १-२ दिवसात त्यांचा रंग गुलाबी, लाल, तांबडा असा बदलेल.

(Combretum indicum, also known as the Rangoon creeper)








बहावाच्या या कळ्या, फुटून फुले होण्याची वाट बघताहेत.

(Cassia fistula, commonly known as golden shower)






बहावाचे झुंबर. मलयाळी लोकं त्यांच्या (विषु) नववर्षाला देवाला ही फुले वाहतात. 








चेरीचा जरी इथे बघता नाही आला तरी दक्षिण भारतात सिंगापूर चेरीची भरपूर झाडे बघायला मिळतात. त्याचीही फुले चेरीच्या फुलांसारखीच असतात.

इथे चित्रात फुलाच्या पाकळ्या झडून चेरीचे फळ मोठे होताना दिसतंय. 



मधमाश्या, कीटक आणि पक्षी हे परागण करण्यामध्ये खूप मदत करतात. सिंगापूर चेरी.






जारूळ किंवा ताम्हण (Pride of India, Queen Crepe Myrtle) हे महाराष्ट्राचे राज्यफूल.

Pride of India is Pride of Maharashtra :) 







हे विलायती चिंचेचं फूल (हिंदी: जंगल जलेबी). बऱ्याच जणांनी शाळेबाहेर किंवा बाजारातून आणून मित्र मैत्रिणींसोबत ही चिंच खाल्ली असणारच.

हा रानमेवा… बऱ्याचदा असं वाटतं की तो जंगलात जाऊन किंवा कुठेतरी शेतातच तोडून खावा.

(Pithecellobium dulce, commonly known as Manila tamarind, Madras thorn, or Camachile)


बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना ?








छायाचित्रे व शब्दांकन 

सचिन पांढरे 

1 comment:

  1. सुंदर वासंतिक सोहोळा. छान शब्दांकन आणि छायाचित्रे.धन्यवाद!

    --- रुपाली

    ReplyDelete