दक्षिण कोरियातील वसंत ऋतूतील काही क्षणचित्रे
हे
Gingko चे झाड. शरद ऋतूमध्ये याची संपूर्ण पाने पिवळी होतात. आणि हे झाड खूप सुंदर
दिसते. आता
वसंताची पालवी फुटली आहे. |
या
Thuja च्या झाडाची फुले मी कधी पाहिली नव्हती. याची फांदी आपण लहानपणी पुस्तकात ठेवायचो.
थोडी नारंगी छटा असलेली ही सुंदर फुले २ मिलिमीटर एवढीच असतील.
Magnolia आता संपूर्णपणे बहरेल.
आणि
हे
पर्णविरहित
झाड
हा
गुलाबी
पिसारा
मस्त
ताठर
मानेने
डोलावेल.
पिवळसर
Magnolia ला
पण
अशीच
ओंजळभर
मोठी
फुले
असतात.
मोठ मोठया झाडांना सुद्धा वसंतात असा उत्साह आलेला असतो.
हे Chinese Redbud चे झाड. या कळ्यांचा आणि फुलांचा सुंदर मॅजेंटा कलर आपल्याला आकर्षित करतो |
ही
Cornelian cherry (dogwood). हा छोट्या फुलांचा गुच्छ आकाराने साधारण १ इंच असेल. पण
हे झाड बहरल्यावर साऱ्या बगीच्याची शोभा वाढवतं.
ही
Azaleaची कळी (खरं तर मध्यभागी ४ कळ्या आहेत). या प्रजातीमध्ये विविध रंगांची फुले
आहेत… लाल, पिवळा, गुलाबी, जांभळा, इत्यादी.
थोडी उमलल्यावर ती अशी दिसे
सुवोन
येथील क्योंघी (Kyung Hee University) विद्यापीठात आता वसंत येण्याची वेळ झाली.
सुवोन
येथील क्योंघी विद्यालयात चेरीची झाडे पिंगट फुलोऱ्याचा जिरेटोप घालून अशी दिमाखात
उभी असतात.
ही चेरीची फुले. वसंतात येणारा हा बहर बघायला जगभरातील लोक गर्दी करतात
जपानचा चेरीचा बहर
जगप्रसिद्ध आहे
कोरियात प्रत्येक मोठ्या निवासी संकुलात चेरीची झाडे हमखास आहेतच
दक्षिण
कोरियातील जिन्हे या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला भरपूर चेरीची झाडे लावली आहेत. त्या मधून रेल्वे जातानाचे दृश्य अलौकिक आहे.
चेरीची फुले |
छायाचित्रे व शब्दांकन
सचिन पांढरे
Lovely photos!
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDelete