फोटो फिचर - Sports Vacation: Part 2






             ऑस्ट्रेलिया वि भारत सामन्यासाठी लंडन गाठले. 
             मध्ये ३ दिवस असल्यामुळे लंडन मध्ये हिंडलो. 
            सिनेमात बघितलेला  हा Phone Booth बहुधा 
            फक्त London मध्येच बघायला मिळतो








ग्रीनिच हे लंडन जवळचे उपनगर.
ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. 
पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (0 डिग्री  रेखांश i.e  0 degree Longitude) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. 
त्या ठिकाणी असलेल्या  Royal Observatory मध्ये GMT चा इतिहास समजतो.






Windsor Castle  ला गेलो असताना "Change Of Guard" हा सोहळा बघता आला नाही. 
Buckingham Palace ला हा सोहळा चुकवायचा नाही असा निश्चय करून आम्ही वेळेआधीच पोहोचलो. 
पण संततधार पाऊसाने आमची निराशा केली.

टेनिस या खेळाशी माझी प्रथम ओळख ८५ च्या आसपास बोरिस बेकर आणि स्टेफि ग्राफ मुळे झाली. 
टेनिसचे तीर्थक्षेत्र असलेल्या Wimbledon च्या Center Court ला गेलो तेव्हा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. 


नवीन पिढीचा  hero :  Harry Potter 
त्याच्या सर्व चित्रपटांचे चित्रीकरण Harry Potter वर्ल्ड या ठिकाणी झाले. Hogwarts School ची ही प्रतिकृती. चित्रपटात लांबचे शॉट ह्या प्रतिकृती वर घेतले आहेत.




क्रिकेट ची पंढरी म्हंटले कि Lords Cricket Ground शिवाय दुसरे  काही आठवत नाही. 
इकडे या खेळाचा खूप मोठा इतिहास आहे. 
वर्ल्ड कप मध्ये भारताचा  Lords वर सामना नसल्यामुळे आम्ही एक guided tour घेतली. 
तिथले tour guide खूप आत्मीयतेने सगळी माहिती सांगत होते. 
१९८३ विश्वचषक ते २००२ मधील Natwest series चा अंतिम सामना सर्वच डोळ्यासमोर आले. 
या ग्राउंड च्या आवारात एक छान से संग्रहालय आहे. 
तिकडे "Ashes", व "Prudential Cup " तर आहेतच
पण त्याचबरोबर अनेक खेळाडूंनी दिलेल्या वस्तू आहेत.
भारतीय म्हणून "Prudential Cup" बरोबर सौरव गांगुली आणि मिथाली राजची jersey  
आणि त्यांची माहिती पाहून खूप छान वाटले.


London Eye :

लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (Giant  Wheel  or  Ferris  Wheel) आहे. 
थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे UK मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते.




ह्या Giant  Wheel मधून Westminister Abbey आणि Big Ben चा aerial view


पुढचे ३ दिवस स्कॉटलंड चा दौरा होता. 
स्कॉटलंड मधील रम्य हिरवळ आणि थंड हवेने सुखावलो.  Inverness जवळील एका कुरणात चरत असलेली ही स्कॉटिश गाय.









Loch Ness च्या किनारी असलेला Urquhart Castle , 
७व्या शतकातील हा किल्ला १५०९ साली त्याची पुनर्बांधणी केली गेली होती.


टेनिस, क्रिकेट आणि पॉटर च्या सांकेतिक तीर्थक्षेत्रां नंतर स्कॉटलंड मधील व्हिस्की प्रेमींचे "तीर्थ" क्षेत्र. 
जगप्रसिद्ध असलेली स्कॉच उत्तर स्कॉटलंड मध्ये मुबलक प्रमाणात बनवतात. 
अशाच एका distillery मध्ये लाकडी cask मध्ये वर्षानुवर्षे मुरवत ठेवलेली मदिरा. 










Nottingham च्या वाटेवर असताना मस्त स्कॉटिश ब्रेकफास्ट चा आस्वाद घेतला. 












Nottingham  एक छोटे टुमदार गाव आहे. तिथले हे ट्रेंटब्रिज स्टेडियम. 
सलग २ दिवस पाऊस पडत असल्याने खेळ होण्याची शक्यता खूप कमी होती.






पाऊस  थांबण्याची वाट पाहत स्टेडियम भर फिरताना अचानक विक्रम साठ्येची भेट झाली.
 "How Sachin Destroyed My Life" ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि क्रिकेट प्रेझेंटर म्हणून त्यांची ओळख आहे.












द्वारकानाथ संझगिरी हे मराठी क्रिकेट प्रेमींना माहिती असलेले नाव. क्रिकेट वरील त्यांचे खुमासदार आणि माहितीपूर्ण लेख खूप लोकप्रिय  आहेत. 














Oxford University साठी प्रसिद्ध असलेल्या Oxford गावात Blackwell Book store आहे. 
१८७९ साली १२ स्क्वेअरफीट च्या छोट्या जागेत चालू केलेले हे दुकान आता जवळ जवळ १०००० स्क्वेअरफीट  एवढे मोठे आहे. ह्या दुकानात साधारण २.५ लाख पुस्तके आहेत. 










आमच्या trip  चा शेवटचा टप्पा आणि शेवटची match . 
Manchester मध्ये भारत वि पाकिस्तान. 
सामना म्हणावा तास रंगला नाही पण रोहित चे १४० आणि विराट च्या ६५ चेंडूत ७७ ने आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले

भारतीय संघाला आणि विराट कोहली ला support करायचे म्हणून आम्ही असा पेहराव केला होता.  
कॅमेरामॅनचे लक्ष आपोआपच आमच्याकडे वळले आणि आम्ही TV द्वारे जगभर झळकलो

भारत पाकिस्तानची दुश्मनी असली तरी इंग्लंड मध्ये दोन्ही देशाच्या  चाहत्यांची अशी मैत्री होती.  
१८ दिवसात भारताने केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि 
UK मधील सगळया छान आठवणी मनात साठवून 
आम्ही दुसऱ्या दिवशी परतीची वाट धरली.



फोटो संकलन : सारंग गाडगीळ 





2 comments:

  1. Kya baat hai, wonderful
    Halkya fulkya shabdat, kshan achuk rupali aahes !!

    ReplyDelete
  2. फारच छान चित्रसफर! लंडन आणि इंग्लंड मधल्या ह्या जागांची ह्या सफरीसाठी निवड मस्त! फोटो तर अप्रतिम आहेतच! इतिहास, भूगोल, क्रिकेट, टेनिस, हॅरी पॉटर, पुस्तकं ह्या सगळ्यांच्या पंढरीचं दर्शन खूपच आवडलं! त्या सर्व ठिकाणी जाऊन आल्यासारखं वाटलं!

    Looking forward to seeing more photographs!

    ReplyDelete