केस पिकल्यावरही आता (विडंबन)

 

(गीतकार ना.धों.महानोर तसेच सर्व संबंधितांची माफी मागून 'जैत रे जैत' ह्या सिनेमातीलजांभूळ पिकल्या झाडाखालीह्या गीतावर आधारित हे विडंबन )


केस पिकल्यावरही आता, वाट कोणाची पाहे जी

वाट पाहे जी, पाहे जी वाट पाहे जी, वाट कोणाची पाहे जी

 

येंधळ येडं मन कुणाच्या, मागे जाये जी

मागे जाये जी, जाये जी मागे जाये जी, कुणाच्या मागे जाये जी

 

ज्वानीचं सरलं गाणं, उतारवयं आलं जी

जुन्या पुराण्या प्रेमासाठी पुरतं लागिरं झालं जी

लागिरं झालं जी, लागिरं लागिरं झालं जी, पुरतं लागिरं झालं जी

 

सोडून दिल्या मोकाट बटा, हा बोभाटा झाला जी

केसामंदी केसं रंगवूनी, उसनं कष्ट झालं जी

कष्ट झालं जी, कष्ट कष्ट झालं जी, उसनं कष्ट झालं जी

 

शाळेच्या छप्पराखाली, मन जाऊन आलं जी

केसांच बन थोडं, पिकून पांढरं झालं जी

पांढरं झालं जी पांढरं पांढरं झालं जी पिकून पांढरं झालं जी

 

केस पिकल्यावरही आता, वाट कोणाची पाहे जी 

वाट पाहे जी, पाहे जी वाट पाहे जी, वाट कोणाची पाहे जी



प्राजक्ता सरपटवार पाठक





1 comment: