इंदूर/ भोपाळ, हैदराबाद या वेगवेगळ्या ठिकाणांना
कमीअधिक मार्क्स देत शेवटी नाताळच्या सुटीमधील ट्रिपसाठी पाँडिचेरीने प्रथम
क्रमांक मिळवला. सुटीमधील तिकिटांचे दर आणि गर्दी यांचा विचार करता सप्टेंबरमधेच
सर्व तिकिटांचे आणि हॉटेल्सचे बुकिंग पण करून झाले. त्या नंतर दसरा, दिवाळी काही काळ शांततेत गेला, पण डिसेंबर उजाडला
आणि मग मात्र ट्रिपचे वेध लागले. कोणते कपडे घ्यायचे, काय
काय बरोबर न्यायचे, स्वेटर घ्यावा लागेल का? हे विचार मनात रुंजी घालू लागले. आमच्यासाठी ही ट्रिप नक्कीच खास होती.
कारण २०१७ नंतर आम्ही कुठे फिरायला असे गेलो नव्हतो आणि दुसरं म्हणजे शिल्पा,
सौरभ, समीर, शलाका आणि
सगळ्यांचा आकर्षण बिंदू म्हणजे लाघवी शर्विलच्या सहवासाचा लाभ आम्हाला मिळणार
होता.
Paradise Beach चे एक निराळेच सौन्दर्य... नारळाच्या झाडांच्या आत आत लपलेला हा समुद्र!
खाण्यापिण्याचे पदार्थ या चौपाटीपासून लांब, त्यामुळे हा बीच
खूप स्वच्छ आणि मनमोहक! शर्विल इथल्या वाळूत मनसोक्त खेळला. समीर-सौरभनी समुद्र स्नानाचा
आनंद घेतला. शलाका, शिल्पा, आनंद आणि
अनिल काकांनी पोटरीपर्यंतच्या पाण्यात जाण्यात समाधान मानलं. मी समुद्र किनाऱ्यावर
वाळूत बसून या सर्व गोष्टी न्याहाळत अथांग समुद्राला माझ्या नजरेत सामावून आणि
साठवून घेतलं. बालपणात अलगद शिरून शिंपलेसुद्धा गोळा केले. शर्विलही वाळूत खेळता
खेळता शिंपले सापडले की मला आणून देत होता.
दुसऱ्या दिवशी
सकाळी आम्ही तिथल्या विनायक मंदिरात गेलो, पण ग्रहण काळ असल्याने मंदिर बंद होतं. मग तेथून आम्ही Auroville
ला (पॉण्डेचेरी पासून १४-१५ किलोमीटर अंतरावर ) गेलो. तेथे आपण एक
टुरिस्ट किंवा पिकनिक स्पॉट म्हणून गेलो तर ठीक आहे, पण आपण
एका आश्रमात जाणार आहोत या विचाराने गेलो तर निराशा पदरी पडते. साधारण एक-दीड
किलोमीटर सावलीतल्या पायवाटेने चालत गेल्यावर ३०-३५ फूट लांब असलेली आश्रमाची
वास्तू दिसते. आश्रमाचं बाहेरून दिसतं ते बांधकाम खूप सुरेख आहे. मध्ये घुमट आणि
त्याच्या बाजूने १२ सद्गुणांचं प्रतीक असलेल्या १२ पाकळ्या! आश्रम आतूनही खूप
सुंदर आहे, हे आम्हाला तिथे प्रवेशद्वाराजवळ दाखवलेली
व्हिडिओ क्लिप पाहिल्यावर लक्षात आलं. आश्रमाच्या आत जायचं असल्यास तेथे समक्ष
जाऊन एक दिवस आधी परवानगी घ्यावी लागते. ऐनवेळी जाणाऱ्यांना लांबूनच आश्रमाच्या
वास्तूचं दर्शन घडतं. मला ताजमहालच्या प्रवेशद्वारातून ताजमहाल बाहेरून
बघितल्यासारखं वाटलं, असो....
तिथल्या
पायवाटेवरून जाताना एका वडाच्या झाडाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अतिशय मोठा
विस्तार असलेलं हे वडाचं झाड! पारंब्यांपासून मुळं जमिनीत जातात व खोड तयार होतं हे
माहित होतं. पारंब्या पहिल्या आहेत, त्याला लटकून झोके घेतले आहेत, पण इथे
मात्र एकाच वडाच्या पारंब्यांपासून जवळजवळ २०-२५ झाडंच तयार झाल्याचं दृष्टीस
पडतं.
२८ तारखेला सकाळी ८
वाजता आम्ही ७ seater कॅबने चेन्नईकडे कूच केलं. पॉण्डेचेरीहून चेन्नईला जाण्यासाठी दोन मार्ग
आहेत, त्यातला आम्ही ECR म्हणजे Eastern
Coast Road निवडला. हा रस्ता समुद्राला समांतर आहे. वाटेत असलेली
महाबलीपुरम येथील Shell Museum, Pearl Museum, Fish Museum खूपच
सुंदर आहेत. Pearl Museum येथे शलाका आणि शिल्पाने थोडेसे
शॉपिंग केलं. थोडं पुढे गेल्यावर Shore Temple आहे.
मंदिराच्या बाहेरील पटांगणातून परत एकदा समुद्र दर्शनाने मन सुखावलं. मंदिराच्या
कंपाउंड वॉलवरून समुद्र बघता येतो. शर्विलला वाळू, समुद्र
दिसत होता पण तिथपर्यंत जात येत नव्हतं, त्यामुळे तो नाराज
झाला आणि म्हणाला, ‘हा समुद्र बंद आहे.'
सरतेशेवटी सगळी
तयारी होऊन २५ डिसेंबर हा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे ठाणेकर मंडळी आणि आम्ही
सकाळी १०.३० च्या सुमारास बंगळूर विमानतळावर भेटलो. शर्विल फारच थोड्या वेळात
आम्हा तिघांचा होऊन गेला. या ट्रिपमध्ये आयोजनापासून ते ट्रिप यशस्वी करण्यापर्यंत
तरुण वर्गाचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. कुठेही काही अडचण नाही की गैरसोय नाही. It was smooth sailing throughout. या
तरुण वर्गाकडून आमच्या ज्ञानात बरीच भर पडली. बंगळूर विमानतळावर घरून आणलेल्या
तिखटमिठाच्या पुऱ्या खाऊन झाल्यावर आमची KFC शी तोंडओळख
झाली.
१२.३० च्या विमानाने आम्ही पॉण्डेचेरी विमानतळावर १.२० ला पोचलो. सगळ्यांनाच
बघताक्षणी आवडलेली गोष्ट म्हणजे तिथलं छोटंसं विमानतळ. आम्ही चालतच १० मिनिटांत
विमानतळाच्या बाहेर पडलो. कॅब मिळेपर्यंतचा वेळ पण मजेत गेला. यथावकाश दोन कॅब्सनी
आम्ही Villa Olivia ला पोचलो. Villa सगळ्यांनाच
खूप आवडला. Villa दोन बेडरूम्स, हॉल,
डाईनिंग हॉल, किचन यांनी सुसज्ज आणि प्रशस्त
असं पेन्टहाऊस होतं. किचनमध्ये induction शेगडी,
electric kettle व चहा कॉफीचं साहित्यही होते. शलाकाने आणलेल्या tea
packets नी आमची सकाळच्या चहाची तल्लफ भागवली.
पॉण्डेचेरीत तीन
दिवसांत Rock Beach,
Promenade Beach, भारतीं पार्क, Auroville, Light House आणि Paradise Beach ला भेटी दिल्या. छोटंसं
पॉण्डेचेरी सगळ्यांनाच आवडलं. शहरातील सुनियोजित बांधकामं, रस्ते,
स्वच्छता सगळंच सरस आहे. मुख्य म्हणजे येथील Beaches फारच ओढ लावतात. Promenade आणि Rock Beach वर आपण समुद्रात जाऊ शकत नाही, कारण त्यांना
मुंबईतल्या नरिमन पॉइंटला आहेत तसेच कठडे बांधलेले आहेत. त्यामुळे अतिशय स्वछ,
लांबच्या लांब पसरलेले एकापुढील एक beaches... समुद्राकडे जाणाऱ्या कुठल्याही समांतर रस्त्यानी गेलं की लांबवरूनच
समुद्राची चाहूल लागते आणि हलकेच अथांग पसरलेला निळाशार समुद्र दृष्टीस पडतो.
प्रेमातच पडतो आपण या समुद्राच्या आणि किनाऱ्यावरील शिळांवर धडकणाऱ्या लाटांच्या!
Paradise Beach ला जाताना वाटेत Light House लागतं. २८० पायऱ्या
आहेत वरपर्यंत जायला. पण एकदा वरती पोचून दूरवर पसरलेला समुद्र पाहिल्यावर
डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय ते समजतं.
फ्रेंच कॉलनी बघायची राहिली होती. मस्त टुमदार घरं, planned रस्ते, बोगनवेलीची झाडं, घराच्या सभोवती उंचच उंच संरक्षक भिंती... समुद्रासारखीच फ्रेंच कॉलनी डोळ्यात जतन करून ठेवली. अजूनही फ्रेंच कॉलोनीची दाट छाया आहे तिथे! तिथल्या घरांना, रस्त्यांना, हॉटेल्सना फ्रेंच भाषेत नावं दिलेली आहेत.
फ्रेंच कॉलनी बघायची राहिली होती. मस्त टुमदार घरं, planned रस्ते, बोगनवेलीची झाडं, घराच्या सभोवती उंचच उंच संरक्षक भिंती... समुद्रासारखीच फ्रेंच कॉलनी डोळ्यात जतन करून ठेवली. अजूनही फ्रेंच कॉलोनीची दाट छाया आहे तिथे! तिथल्या घरांना, रस्त्यांना, हॉटेल्सना फ्रेंच भाषेत नावं दिलेली आहेत.
Auroville आश्रम बराच आत आहे. तिथून परत येण्यासाठी बसेस आहेत. पण आम्ही पायी चालणंच
पसंत केलं. दुपारचे २ वाजल्यामुळे नकळतच सगळ्यांची पावलं खाण्याच्या स्टॉल्सकडे
वळली. इथे बेकरीचे पदार्थ उपलब्ध होते. आम्ही येथे सँडविचेस आणि pastries घेतल्या. सौरभच्या नवीन काहीतरी try करूयात या
विचारानं आम्ही काही फुलांचे (जास्वन्द, गोकर्ण इ.) juices
घेतले. Juices चे रंग व चव दोन्ही छान होते.
या ट्रिपमध्ये मला वेगवेगळे अन्नपदार्थ चाखायला मिळाले. Waffles हा नवीन चॉकलेटचा प्रकार मी प्रथमच खाल्ला आणि तो मला आवडलाही.
पॉण्डेचेरीतले तीन
दिवस खूप मजेत गेले.
नंतरचा आमचा spot होता 'Crocodile पार्क'. दुपारचे २ वाजले होते आणि ऊनही टळटळीत होते,
त्यामुळे जावं की नाही असा विचार मी करत होते, पण सगळ्यांबरोबर गेलेच. खूप मोठा पार्क आहे हा, आणि
तेथे इतस्ततः पहुडलेल्या अगणित मगरी आहेत. त्या सुस्तावलेल्या काळ्या रंगाच्या
महाकाय मगरी बघून ८४ लक्ष योनीच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्याची मला आठवण झाली. हा
जन्म यांना का लाभला असेल यासारखे विचार मनात घर करायला लागले.
अशी मजल दरमजल करीत
आम्ही दुपारी ४ च्या सुमारास चेन्नईच्या 'Pebbles Serviced Apartment' मध्ये पोहोचलो. तेथे तिघांच्या
रूम्स तीन वेगवेगळ्या मजल्यांवर मिळाल्या. शलाकाने एका मजल्यावर दोन तरी रूम्स
मिळाव्या म्हणून प्रयत्न केला, पण नाईलाज झाला, थोडे खट्टू झालो पण एकच रात्र तिथे राहायचे आहे असं म्हणून मनाचं समाधान
करून घेतलं. अर्ध्या तासात फ्रेश होऊन बाहेर पडलो. 'नल्ली'
मध्ये शॉपिंग हे एक मोठं आकर्षण होतं. त्यानंतर आम्ही श्रीकृष्ण
स्वीट्सच्या शोधात एक दीड किलोमीटर फिरलो आणि एका मलेशियन रेस्टॉरंटमध्ये जेवलो.
हॉटेलवर जाऊन बॅग्ज
पॅक करून पुन्हा सगळे शर्विलच्या रूममध्ये तास दीड तास गप्पा मारत बसलो. शर्विल
त्या रूममधून कोणालाच जाऊ देत नव्हता. शेवटी सगळ्यांनी झोपेचं सोंग घेतलं आणि तो
झोपल्यावरच आम्ही आपापल्या रूम्समध्ये गेलो. या सोंग वठवण्याच्या प्रक्रियेत आमची
हसून पुरती वाट लागली.
२९ तारीख, सहलीचा शेवटचा दिवस. सकाळी ८ वाजता
आम्ही निघालो. आम्ही कॅबमध्ये बसल्यावर शर्विल थोडासा रडवेला झाला होता. शलाकाने
त्याची समजूत काढली, 'आपण पुढच्या टॅक्सीने जाऊ हं!'
छान लिहिले आहे शुभदा ताई, बरीच नविन माहिती मिळाली.
ReplyDeleteपाँडिचेरी प्रवास वर्णन वाचून पाँडिचेरीला जाण्याची ओढ निर्माण झाली महायोगी अरविंद व माताजी यांना अभिवादन
ReplyDeleteलेखिका शुभदा ताईना धन्यवाद