पौर्णिमेचे दान

 


अमावस्या रात्री

चंद्र हा लपतो

काळ्याकुट्ट नभी

निवांत झोपतो

 

दाखवितो कला

हळू हळू अशा

एका मागे एक

जाती रोज निशा

 

रोज थोडी मोठी

होते चंद्रकोर

पुनवेची वाट

चाले बिनघोर

 

चंद्रकोर खेळ

चंद्र खेळे छान

पंधराव्या दिनी

पौर्णिमेचे दान

 

चंदेरी प्रकाश

शिंपती चांदण्या

देखावा सुंदर

आतुर पाहण्या

 

पुनवेला चंद्र

पूर्ण श्वेत दिसे

चांदण्याच्या गाली

उमटते हसे

 

पंधरा दिवस

दोन्हीत अंतर

अमावस्या झाली

पौर्णिमा नंतर


 

युवराज गोवर्धन जगताप




1 comment: