सूर्याच्या
तेजाने कशी
न्हाऊन
निघाली धरती
सुंदरसे
चित्र कोणी
रेखाटले
जणू आकाशावरती
रश्मीचा
होता उदय
दूर
अंधार झाला
किरणांची
चादर सोनेरी
घेऊन
सूर्य आला
किलबिल
गाणी गात
उठली
सारी पाखरं
गाईचा
पान्हा शोधती
इवली
इवली वासरं
वृक्षवल्ली
बहरले
फूलांनी रंग
उधळले
सूर्य
चढला माथ्यावर
ऊन तापू
लागले
क्षणामागून
क्षण गेले
दिवस सरू
लागला
चालता
चालता सूर्य
तिन्हीसांजेला
पोचला
घरट्यात
परतली पाखरे
मंद झाला
चिवचिवाट
गाईंनी
ही धरली
आपल्या
गोठ्याची वाट
क्षणाची
न मिळे उसंत
वाटे जरा
विश्राम हवा
प्रवास
करून थकला सूर्य
शोधे तो
ही विसावा
निळी
गुलाबी छटा पसरली
सूर्य
निघाला मावळती
सुंदरसे
चित्र कोणी
रेखाटले
जणू आकाशावरती
प्राजक्ता सरपटवार पाठक
आल्हाददायक!
ReplyDelete