पेशवेकालीन इतिहासाचे वैभव लाभलेली, मराठ्यांच्या पराक्रमाने गाजलेली, टिळक-आगरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींचे भूषण असलेली, परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा जपणारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्येचे माहेरघर असलेली माझी पुण्यनगरी!.... हे वर्णन करण्याचा आनंद हा खूपच मोठा आहे. मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेले महाराष्ट्रातील हे दुसरे मोठे शहर..... पुणे
वर्तमान काळाविषयी विचार करताना, भूतकालीन परिस्थितीकडे डोकावून पाहणे ही मानवी मनाची प्रवृत्तीच आहे. पुणे ही एक बलाढ्य हिंदू साम्राज्याची पेशवेकालीन राजधानी होती. इसवी सन १६४२ साली शहाजीराजांनी आपले बारा वर्षाचे चिरंजीव शिवाजीराजांना पुणे व आसपासची ३६ गावे दिली. शिवाजी महाराजांच्या आमदानीत अजिंक्य व अभेद्य ठरलेले सिंहगड, पुरंदर, तोरणा व रायगड हे किल्ले पुण्याच्या आसपास असल्यामुळे पुण्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. शिवाजी महाराजांच्या राजवाड्याची जागा शनिवारवाड्यापुढील लाल महालामध्ये (जिजामाता बाग) होती. त्यांचे वास्तव्य तिथे अनेक वेळेला होत असे.
इसवी सन १७३५ मध्ये पहिले बाजीराव पेशवे, त्यांनी मराठी साम्राज्याची राजधानी सातारा येथून बदलून पुण्यामध्ये आणली आणि राजधानीच्या डौलाला साजेसा असा शनिवार वाडा बांधला गेला. सर्व मराठी राज्याची सूत्रे याच राजवाड्यातून हलत असत. श्री शाहू महाराजांनी थोरले बाजीरावांना वाडा बांधून रहावे अशी आज्ञा केली. एका आख्यायिकेनुसार बाजीराव एक दिवस दौडत असताना, त्यांनी सृष्टी विरुद्धचा चमत्कार पाहिला. एक ससा, एका कुत्र्याच्या पाठीमागे लागला असून कुत्रा जीव घेऊन पळतो आहे व ससा धावतोच आहे असे पाहिले. अखेरीस सशाने कुत्र्यास धरले व ठार मारले. वास्तविक कुत्र्याने सशाची शिकार करावयास पाहिजे होती, बाजीरावांना त्या सश्याचे शौर्य पाहून फारच आश्चर्य वाटले व त्यांनी मनाशी विचार केला की या जागेमुळे सशाला जय मिळाला. आपल्यालाही असाच युद्धप्रसंग दिल्लीच्या बादशहाशी करावयाचा आहे, तेव्हा त्यांनी वाड्यासाठी तीच जागा पसंत केली, आणि त्या विस्तीर्ण जागेवर शनिवार वाड्याची निर्मिती झाली. ह्या वाड्यामधले कटकारस्थानाचे राजकारण पण बरेच गाजले. त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी विश्रामबाग वाडा, बुधवार वाडा अशा बऱ्याच इमारती बांधून पुण्याचे वैभव वाढवले. पुण्याच्या आसपास अनेक उद्याने आणि रमणीय स्थळे निर्माण करून पुण्याच्या सौंदर्यात भर घातली.
यापैकी थेऊरचा विस्तार माधवराव पेशवे यांनी केला. त्यांचा मृत्यू पण येथेच झाला. त्यांच्या निधनानंतर तर त्यांची पत्नी रमाबाई येथे सती गेल्या, त्यामुळे तिथे त्यांचे समाधी स्थळ देखील आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींनी श्री चिंतामणी ची उपासना करून सिद्धी प्राप्त केली आणि त्यांचा मुलगा चिंतामणीने हे मंदिर मूर्त स्वरूपात आणले. असे हे मुळामुठा नदीच्या काठी असलेले मंदिर पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावरती आहे. भक्तजनांच्या चिंता दूर करणारा चिंतामणी अशी त्याची ख्याती आहे.
सध्या
कोरोनामुळे सगळीकडे भयभीत वातावरण आहे, पुण्यात तर संख्या वाढतच आहे आणि त्यात वरुण राजाची पण भरपूर कृपा झाली
आहे. परंतु अशातही पुणेकरांनी आपली मार्मिक विनोद बुद्धी टिकवून ठेवली आहे.
महाराष्ट्राच्या धरतीचे, मुळा-मुठेच्या भरतीचे,आणि मुंबईकरांच्या विश्रांतीचे ठिकाण असणाऱ्या पुण्यात पूर्वी वाडा पद्धत होती. मोठमोठ्या वाड्यांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती गुण्यागोविंदाने राहत होती. परंतु कालानुसार घरे दुभंगली, माणसे विभागली.... गरजेनुसार बिजांडापासून ब्रम्हांडापर्यंत नेणाऱ्या माता-पित्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ येऊ लागली. त्यामध्ये पण पुणेकरांनी भावनेला प्राधान्य देऊन, आपुलकीची झालर लावून निवारा, मातोश्री सारख्या वृद्धाश्रमांची स्थापना केली. त्यात वृद्धांची प्रेमाने काळजी घेतली जाते. असो शेवटी काय तर--- कालाय तस्मै नमः
पुण्यातील
तरूणांची माहिती तंत्रज्ञानातील घोडदौड आणि त्यांनी पादाक्रांत केलेली नवनवीन
यशोशिखरे सर्वश्रुत आहेत. येथील शिक्षण व्यवस्था तसेच जीवनपद्धती आदर्श समजली
जाते. याचाच परिणाम म्हणून अलीकडेच पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला
गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने आज देशात राहण्यासाठी
सर्वात उत्तम अशा शहरांची यादी जाहीर केली असून त्यात पुणे शहराने अव्वल स्थान पटकावले
आहे. आज त्या निमित्ताने गदिमांची कविता आठवते..
विद्या उद्यम कला-संस्कृती इथे न काही उणे,
उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे.....
आशा
झणझणे
आशाताई, खूप छान लेख
ReplyDeleteKhoop sundar lekh
ReplyDeleteAbhinandan khup Sundar lekh aahe
ReplyDeleteवा छान लेख आशाताई.... आपल्या चीन जपान टूर वर लिहा ना
ReplyDeleteआशा लेख खुपच छान लिहीला आहे. भाषा शैली उत्तम आहे. लेख वाचल्यावर पुणे आणि परिसराचे चित्रच डोळ्यांसमोर उभे राहते.
ReplyDeleteअतिशय सुंदर, अभ्यासपुर्ण लेख. असेच नेहमी लिहीत जा.
ReplyDeleteशुभा
थोडक्या शब्दात आपल्या पुण्यनगरीचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. पुणे न पाहिलेल्या व्य्क्तीलाही पुण्याचे चित्रमय दर्शन करविणारा लेख आहे. अभिनंदन.
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteअप्रतिम माहिती व आपल्या लिखाणाच्या ग.दि.मा.च्या शेवटच्या दोन ओळी आणि त्यांचा जन्मदिवस देखील आजच काय योगायोग.आनंद वाटला.लिखते रहो.
Very nicely portrayed the picture of Pune city. Keep it up👍
ReplyDeleteपुण्यनगरीचे सर्वांगीण सुबक शब्दचित्र.
ReplyDeleteSo well written! And You are really well informed!
ReplyDeleteफारच उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDeleteविजया लक्ष्मी नर्लेकर
Deleteडोळ्यांनी जे टिपलेस तू
सौंदर्य पुण्य नगरीचे
मनात जे साठवलेस
ते शब्दातून उमटले
सजीव चित्र पुण्य नगरीचे।
एक सुंदर प्रयत्न 👍
रेखा जोशी ।
ReplyDeleteआशाताई खूप छान लिहिलं आहेस । छान माहिती मिळाली
पुढील पिढीला उपयुक्त असे लेखन आहे
पुढील लेखनासाठी तुला खूप शुभेच्छा ।