(कविश्रेष्ठ विंदांची क्षमा मागून)
प्यालो जरी कितीही, पैसे न खर्चतो मी!
माझी बिले भरे जो त्यालाच मानतो मी!!
भट्टी असे इलेक्शन् अन् पक्ष हे रसायन
दारूत गाळलेल्या, सरकार पाहतो मी!
गुत्ताधनी उगा का दावी समाजसेवा?
तो आमदार भावी हे आज सांगतो मी!
देतो फुकाट दारू, मटणान्न जो पुढारी
त्याचाच कार्यकर्ता होऊन नाचतो मी!
जी बाटली उभी ती, हो आडवी पिताना
हे सत्य बायकांच्या मोर्चास दावतो मी!
दारूत आजच्या या काविळ असे उद्याची
म्हणुनी तिला उद्याच्या आधीच हाणतो मी!
डॉ.दिलीप पां.कुलकर्णी
नेहमीप्रमाणेच उत्तम विडंबनकाव्य दिलीपजी!
ReplyDelete