‘मला नोकरी लागली की पहा मी काय काय करणारे,
एकदा मिळवती होऊ दे मग पहा‘ अशा अर्थाची बडबड
मी आई जवळ केली होती. परंतु मिळवती झाले की प्रेम करणार असं मला अजिबातच म्हणायचं नव्हतं. पण आकाशात मारलेल्या गाठी त्या.... माझा पहिला पगार व्हायला नि मैत्रिणीचा
फोन यायला एकच गाठ पडली.
‘आमची भाटी व्यायली आहे.
तुला हवं होतं ना पिल्लू?
हवी तर आई बाबांना विचारून ये.’
‘हॅ हॅ त्यात काय विचारायचं? ते आता काहीही म्हणू शकत नाहीत‘ इति मी.
लगेच मैत्रिणी कडे धडक!........शी
शू चा crash course!
ते गोजिरवाणं बाळ, कुणालाही वेड लावेल असं.
पिशवीत घातलेली सिमरन, पुढ्यात घेऊन अलगद लुना चालवत मी घरी आले.
'म्यांव
म्यांव' करत तिने घर डोक्यावर घेतलं. काजोल नि फरीदा जलाल सारख्या लडिवाळ आम्ही कधीतरी दिसू का?
मी सिमरन ची single parent होते. त्यामुळे
जबाबदारी वाढली. Come here, go there, पाहुण्यांना
'म्यांव
म्यांव' करून दाखव वगैरे संस्कारांना ती भीक घालेना.
मांडीवर बसली की हलायचं काम नाही! गरम पोळी,
तूप लावून पहिल्यांदा हिच्या पानात पडायला लागली! आपल्या मर्जीची मालकीण, सम्राज्ञी सिमरन, सगळ्यांच्याच
गळ्यातला ताईत बनली!
Permission न घेतां घराबाहेर जाण्याचे व बाहेरच वेळ
काढण्याचे उद्योग ती लहान वयातच करायला लागली. आपले संस्कार कुठेतरी कमी पडतायत की
काय? असं मला वाटायला लागलं. माझी भीती खोटी नव्हती! तिला तिचा
राज लवकरच सापडला. ती प्रेमात पडली होती!
नेहा भदे
खूप छान नेहा. थोडक्यात मस्त विनोदी लिहिलं आहेस . वाचताना हसू guaranteed.
ReplyDeleteकहानी घर घर की ... Everyone goes through this twice - once as a child and then as a parent !! So it was Deja Vu
ReplyDelete