Rèsume

 


"2007: Best Spiker: Interschool Volleyball Cup.

2008: Captain: Interschool Volleyball Cup Winners.

2009: Player of the Tournament: Intercollege Volleyball.

2010: Captain: Intercollege Volleyball Tournament Winners.

2011: Player of the Tournament: West Zone Inter-university Volleyball Tournament.

2012: Captain: All India Inter-university Volleyball Tournament Winners.

2014: Winner, 10K Mumbai Marathon (time 00:41:08).

2015: Winner, Half Marathon: Mumbai. 

2016: Winner, Age Category Marathon: Mumbai (time 02:36:35)....."


सिस्टंट कोचच्या जागेसाठी आलेल्या अर्जांपैकी एक अर्ज वाचत होतो.

 

"काय रे शिंदे? काय ही आजकालची मुलं? हा बघ. कॉलेज झालं आणि व्हॉलीबॉल सोडून ह्या आजकालच्या मॅरेथॉनच्या फॅड मागे पडलाय. एका गोष्टीवर फोकस नसतो आजच्या यंग पिढीचा. पण एक आहे - हा जिंकतोय तिकडेही."

 

"सर, मला सुद्धा हे जरा वेगळं वाटलं म्हणून मी आधीच चौकशी केली. नीट वाचा. २०१२ नंतर दोन वर्षं मध्ये काहीच केलेले नाही. gap आहे."

 "हं. मग?"

 

"सर, एका अपघातामधे त्याचा उजवा हात गेला. नॅशनल व्हॉलीबॉल टीमला सिलेक्ट झाला होता तो त्या वर्षी. सुरुवातीला थोडा खचला सर. पण कमबॅक बघा. सगळ्या मॅरेथॉन्स गाजवतोय सध्या."

 

"त्याने ह्यातलं काहीच लिहीलं नाहीये पण इकडे?"

 

"ही माणसं अशीच असतात सर. उगाच आपलं रडगाणं सांगत नाहीत. ज्यांच्याकडे सगळं असतं तेच जास्त रडतात सर." शिंदे पुटपुटला.

 

"ह्याला बोलवा. He is the right person."

 

पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होतं. अर्जात असलेल्या त्याच्या कामगिरीपेक्षा त्यात असलेल्या दोन वर्षांच्या गॅपने त्याच्याबद्दल बरंच जास्त सांगितलं होतं. आणि त्याच्याच बळावर ही नोकरी ही मिळवून दिली होती.

 


मानस

 

1 comment: