कर्नाटकातील
सकाळची सुरुवात वाफाळलेल्या फिल्टर कॉफीच्या कपने होते. कर्नाटक राज्यात भारतातील
कडक (strong) कॉफी पिण्याची संस्कृती आढळते. हे राज्य केवळ देशातील
७०% पेक्षा जास्त कॉफी तयार करत
नाही, तर दरमहा ,दरडोई एका कपापेक्षा जास्त कॉफी (एनएसएसओच्या आकडेवारीनुसार) वापर करणारे हे एकमेव भारतीय राज्य आहे. आणि कॉफी सेवनाच्या ट्रेंडचे नेतृत्व करते ह्या
राज्याची राजधानी
बेंगळुरू. इंडियन
कॉफी हाऊससारख्या जुन्या पसंतीपासून ते नव्या-युगातील रोस्टरीजपर्यंत ( जिथे कॉफी
बीन (बिया)भाजून ,कुटून पावडर
स्वरूपात मिळतात), हे शहर
या मनपसंत कॉफीच्या प्रेमात पडले आहे. तथापि, काहींनाच ठाऊक असेल की, कॉफी हा एक
असा दुवा आहे, जो
बेंगळुरूला एका तडफदार व आघाडीच्या स्त्री उद्योजकाशी जोडतो, ज्यांनी अनेक दशके ह्या शहरावर आपला प्रभाव पाडला. त्या
महिला आहेत ,डी.साक्कंमा आणि ही त्यांची कथा आहे.
१८८०
मध्ये बिदरमध्ये (कर्नाटकातील तुमकुर
जिल्ह्यातील एक गाव) ह्यांचा जन्म झाला. साक्कंमा लहान असताना, त्यांचे पालक
चांगल्या उदरनिर्वाहाच्या शोधात बंगलोर (आताचे बेंगलुरू) येथे आले. त्या लहानपणापासुन हुशार आणि अभ्यासू होत्या. त्यांचे शिक्षणावर असलेले प्रेम
आणि कुतूहल पाहून त्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठविले. त्यांनी इथे बाजी
मारली.
म्हैसूर राज्यातील माध्यमिक शालेय
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या काही मुलींमध्ये ह्यांचा समावेश होता. तथापि,त्यांच्या
मध्यमवर्गीय कुटुंबावर लवकरच
कठीण परिस्थिती आली आणि साक्कंमा यांना वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लग्नासाठी
भाग पाडले गेले.
त्यांचे
पती सावकार दोड्डदमने
चिक्कबसप्पा शेट्टी होते. कुर्गमधील एक श्रीमंत कॉफी लागवड करणारे शेट्टी, ह्यांना
आधीच दोन बायका होत्या. साक्कंमा एका श्रीमंत लागवडदाराच्या पत्नी म्हणून आयुष्यात
स्थिरावत होत्या. पण लग्नाच्या
अवघ्या दोन वर्षातच त्यांच्या पतीचे निधन
झाले . त्याच्या पाठोपाठ त्यांच्या इतर दोन बायकांचे पण निधन झाले. परिणामी,
अवाढव्य कॉफी इस्टेट सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी
तरुण साक्कंमाच्या
खांद्यावर आली. पण त्या हार मानणाऱ्या नव्हत्या. आपल्या शालेय शिक्षणाचा
चांगल्या रीतीने उपयोग
करून, साक्कंमा कॉफी इस्टेट चालवायला शिकल्या. आणि स्वतःला कॉफी इस्टेटच्या
व्यवस्थापनात, कामात झोकून दिले. एक कडक
प्रशासक असल्याने त्यांनी लवकरच इस्टेटमध्ये भरभराट केली.
१९२०
मध्ये, कॉफीचा व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने साक्कंमा बंगळुरूला बसवनगुडी येथे आल्या. बुल टेम्पल रोडजवळ कॉफी क्युरिंग कम पावडरिंग युनिट
उघडले. जसजशी
साक्कंमाची कॉफी मिक्स शहरात पसरू लागली ,तसतशी त्यांची प्रसिद्धीही वाढू लागली. या उपक्रमाला मिळालेल्या विलक्षण प्रतिसादामुळे या
तरुण उद्योजिकेने अनेक ठिकाणी अनेक कॉफी विक्री केंद्र उघडले. त्या कॉफी पुडी
(कॉफी पावडर) साक्कंमा ह्या टोपणनावाने ओळखू जाऊ लागल्या. लवकरच, ‘साक्कंमा कॉफी वर्क्स‘ बंगळूरमध्ये एक घरगुती
नाव झालं. खरं तर,
शहरातील मस्ती व्यंकटेश अय्यंगार आणि डीव्ही गुंडप्पा यासारख्या साहित्यिक दिग्गजांनी त्यांच्या कॉफीच्या
पावडरचा संदर्भ त्यांच्या साहित्यिक निर्मितीमध्ये
घालायला सुरुवात केली!
पण
साक्कंमाचे मन अजून काही करण्यास अस्वस्थ होते. त्यांचे सर्व उपक्रम यशस्वीपणे
चालू आहेत हे पाहून त्यांनी आपला वेळ वेगवेगळ्या सामाजिक कारणास्तव व्यतीत करण्यास
सुरवात केली. या पुढाकार घेऊन केलेल्या यशस्वी उपक्रमांच्या माध्यमातून लवकरच
त्यांचे नाव बंगळुरूमधील प्रमुख व्यक्तींमध्ये गणले जाऊ लागले. त्या काळच्या म्हैसूर
शासनाद्वारे, राज्यातील औद्योगिक विकासाच्या योजनेसाठी,मदत करण्यासाठी आमंत्रित
केलेल्या शहरातील व्यावसायिकांपैकी त्या एक होत्या. त्वरित मदत करण्याची तयारी
दाखवून, साक्कंमा यांनी कुरुहिना शेट्टी केंद्र संघ आणि वसतिगृह (सध्याच्या
बसवनगुडीमध्ये न्यू नॅशनल हायस्कूल रोड वर स्थित) ह्याची स्थापना करण्यास उदारपणे
गुंतवणूक केली. इतर अनेक संस्थांबरोबरच, त्यांनी वसतिगृहाशेजारी प्रवाश्यांसाठी एक
धर्मशाळा देखील बांधली, ज्याला
‘साक्कंमा भवन‘ असे म्हणतात . इथे त्यांचे छायाचित्र आजही पाहायला मिळते. खरं तर,
बसवनगुडीत ज्या ठिकाणी त्यांचे कॉफी क्युरिंग युनिट चालायचे तो परिसर
आजही,‘साक्कंमा गार्डन ‘म्हणून ओळखला जातो.
त्यांचं
व्यापार कौशल्य आणि सामाजिक कल्याणासाठीची तळमळ पाहून, म्हैसूरचे महाराज, श्री कृष्णाराजा
वाडियार चतुर्थ यांनी, साक्कंमा यांना ‘लोकसेवा पारायणी’ (समाजसेवेसाठी समर्पित)
या सन्माननीय पदवीने गौरविले. ब्रिटिशांनाही त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल आश्चर्य
वाटले. ज्या काळात स्त्रियांना व्यापार
आणि व्यापार क्षेत्रात मर्यादित संधी होती आणि म्हणून त्यांनी ‘कैसर-ए-हिंद’ (भारताचे रत्न) असे पदक देऊन गौरव केला. एवढे
करून साक्कंमा इथेच थांबल्या नाहीत. महिला सेवा समाजाच्या कमलाम्मा दासप्पाबरोबरच,
१९२८ मध्ये ,म्हैसूर प्रतिनिधी विधानसभेसाठी नामांकित झालेल्या त्या पहिल्या महिला झाल्या. विशेष
म्हणजे, दासप्पा या ,म्हैसूर येथून ,पदवीधर होणाऱ्या तिसऱ्या महिला आणि राजेश्वरी
चटर्जी ( कर्नाटकातील प्रथम महिला अभियंता) यांच्या आजी होय.
त्या
काळातील फक्त काही मोजक्या स्त्रियांना असे आयुष्य जगता आले. त्यातल्या एक डी.
साक्कंमा. बंगळुरुच्या ‘कॉफी पुडी’ साक्कंमा यांचे वयाच्या ७५व्या वर्षी १९५०मध्ये
निधन झाले. इतकी वर्षे झाली तरीही
साक्कंमा सारख्या अग्रणी स्त्रियांच्या कथा सावलीतच राहिल्या आहेत. ही वेळ आत्ता
बदलली पाहिजे.
(मूळ लेख
इंग्रजी मध्ये संपादित केले विनायक हेगडे यांनी )
उत्तम माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteछान माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी लेख श्रुती
ReplyDeleteनवीन आणि प्रेरक माहिती
ReplyDeleteछान लेख , खूप प्रेरणा देणारा
ReplyDeleteछान लेख
ReplyDelete