जानेवारीमधल्या एका रविवारची एक रम्य सकाळ. ती पण गोव्याच्या कोलवा बीचवरची. आदल्या रात्रीच अमावस्या असल्यामुळे, रात्रभर खवळलेला समुद्र अगदी मस्त शांत झालाय. एकदम संथ लाटात मी माझ्या मित्रांसोबत समुद्राचा आनंद घेत होते.
कोलवा बीच म्हणजे गोव्यातली एक अतिशय नयनरम्य जागा. गोव्यापासून लांब असलेला हा समुद्र किनारा परदेशी पाहुण्यांनी जास्त भरलेला असतो. नजर जाईपर्यंत त्या शॅक्स आणि त्यात सूर्यस्नान घेत असलेले सर्व वयोगटातले परदेशी पर्यटक.
एकतर कमी उंची आणि पाण्याची भीती,
त्यामुळं मी खूप खोल समुद्रात गेलेच नव्हते. माझ्या मित्र-मैत्रिणींपासून काहीशी लांब आणि एकटी असल्यामुळं मी माझ्या
शेजारी असलेल्या दोन रशियन
आजींसोबत
बोलत होते. मोडक्या तोडक्या इंग्लिशमधे बोलत असताना, एका उंच लाटेपासून
वाचण्यासाठी मी समुद्राकडे पाठ केली आणि मला ती दिसली.
कोण होती ती? साधारण पस्तिशीची,
गव्हाळ रंगाची एक भारतीय बाई, जी गोव्याच्या त्या समुद्र किनाऱ्यावर केशरी रंगाची
साडी, हातात हिरव्या बांगड्या, पायात पैंजण घालून, तिच्या नवऱ्यासोबत आली होती. अगदी करीना कपूरलाही
लाजवेल अशी झीरो फिगर असलेली ती एक सर्वसामान्य बाई होती. तिचा बहुतेक हा पहिला समुद्र दर्शनाचा प्रसंग होता, जेव्हा तिने ते समुद्राचे विराट रूप बघितले होते. तो अथांग समुद्र, त्या
किनाऱ्यावरचे परदेशी पर्यटक, त्या
गोऱ्या गोऱ्या बायका, आपण कसं वागावं, याचं आलेलं दडपण, कुठे आलो आपण अशी थोडीशी वाटणारी भीती, हे सगळं अगदी तिच्या चेहऱ्यावर वाचता येत होतं. साधारण आपण पहिल्यांदा एकटं
पाणीपुरी खाताना, सुकी पुरी मागताना जे होतं ना आपल्याला किंवा एकटं सिनेमाला गेल्यावर जसं होत ना अगदी तेच आणि तसंच तिला झालं होतं.
ती पण माझ्यासारखी भित्री असावी. जोपर्यंत पावलं भिजत होती, तोपर्यंत ती खूप मस्त पायाशी येणाऱ्या लाटांचा आनंद घेत होती.
ती पण माझ्यासारखी भित्री असावी. जोपर्यंत पावलं भिजत होती, तोपर्यंत ती खूप मस्त पायाशी येणाऱ्या लाटांचा आनंद घेत होती.
मग त्यानें, तिच्या नवऱ्याने, हो, तो ही होता सोबत तिच्या, तिला स्वतःसोबत थोडे खोल समुद्राकडे जायला राजी केलं
असावं. त्याच्या हाताला धरून, स्वतःला झोकून देऊन, त्याच्या हाताच्या पकडीवर विश्वास
ठेवून ती त्याच्यासोबत जाऊ लागली.
तिचा नवराही अगदी विशेषच वाटला मला.
तिला सोबत घेऊन जाताना, तिच्यासोबत असताना, तो जणू काही जगाचं भान विसरला होता. त्या
बीचवरच्या एकाही स्री-पुरुषाकडे त्याचे लक्षही नव्हते. जणू काही त्याचे डोळे फक्त तिच्यावरच खिळले होते.
त्याच्या आश्वासक हातात, ती स्वतःला
अथांग सागरात झोकून देत होती. आणि ते दोघेही समुद्रात भिजण्याचा मनमुराद
आनंद घेत होते, एकमेकांवर पाणी उडवत होते, बोलत होते, हसत होते.
मला त्यांच्याकडे,
त्यांच्या त्या निर्व्याज आनंदाकडे पाहत रहावेसे वाटत होते. पण परत बेंगलोरची परतीची बस गाठायची होती, म्हणून आम्ही
तिथून निघालो.
तिथून निघताना, मला एका ४-५ वर्षांच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. लहान
मुलं बघितली,
की मला माझी भाचीच आठवते. मी लगेच तिच्याकडे धावत गेले आणि तिला विचारलं, "where is your mumma?" आणि तिनं, त्या माझ्या मैत्रिणीकडे बोट दाखवलं, जिच्या खिजगणतीतही मी नव्हते. तिचं पण लक्ष असावं, म्हणून ती आणि
तिचा नवरा, दोघेही पळत आले आणि क्षणात ते ज्या सहजपणे एकमेकांच्या सोबत समुद्राचा आनंद घेत होते, त्याच सहजतेने आई बाबांच्या भूमिकेत गेले.
मी जे काही १५-२० मिनिटे बघितलं, ते
माझ्या मनात घर करून गेलं. कदाचित त्या स्त्रीकडे खूप पैसा, कॉर्पोरेट जॉब, मेट्रो
सिटीमध्ये राहणं, नवीन आणि खूप कपडे यातलं काही नसेल. पण तिच्याकडे असे काहीतरी होते, जे तिला रोज जगण्याची उभारी देत
होते. तिच्यावर प्रेम करणारा तिचा नवरा आणि तिची ती गोड
मुलगी.
कुठल्याही पगारापेक्षा, पदापेक्षा ही गोष्ट मोठी होती. कदाचित तिच्या नवऱ्याने तिला
व्हॅलेंटाईन साठी चॉकलेट, टेडी बिअर, गुलाबाची फुले असलं काहीही दिलं नसेल. कदाचित त्याला असलं काही माहिती पण
नसेल. पण आजकालच्या
"no strings attach" च्या जमान्यात तिला तिचं माणूस मिळालं, यापेक्षा नक्कीच मोठं
काही नाही. कदाचित हेच खरं प्रेम असावं, नाही का?
Devyani very well written. Seashore is my weak point. Gov beaches are lovely. Love without any expectations is true love. Valentine day and all is nothing but market Funda. It's a topic of debate ofcourse.
ReplyDeleteHi,
ReplyDeleteI am glad that you liked it 😊
Simple and sweet! Do write again.
ReplyDelete