समुपदेशनात म्हणजे व्यावसायिक सल्ला देताना, वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करतात.
त्याबद्दल जाणून,
त्यांची तोंडओळख करून घेऊया. नेहमी Talking therapy च लागू पडेल असे नाही. तर प्रश्नाची गंभीरता, व्यक्तीचे वय लक्षात घेऊन वेगवेगळी थेरपी
वापरली जाते. समस्या किती गंभीर आहे? याचे
निदान करावे लागते. त्यासाठी काही मानसशास्त्रीय चाचण्या - Psychological tests करणे आवश्यक असते. मग थेरपी-उपचार पद्धती
ठरवून,
त्याला लागणारा वेळ हे ठरविणे सोपे जाते.
अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत
थेरपी-उपचार पद्धती घेता येते. मुलांच्या समस्या - ADHD, Cerebral Palsy, Autism
Spectrum Disorder, specific learning difficulty यासाठी remedial teaching, vocational
training, occupational therapy असे उपाय अंमलात आणता येतात. मुलांचा अभ्यास किंवा त्यांच्या वागणुकीतही
बदल, रागावर नियंत्रण, technology (मोबाइल/gaming) addiction यासाठी मानसशास्त्रीय वर्तन बदल (psychologist behavior
modification) सारखी
तंत्र वापरून वागणे सुधारता येते. व्यवसाय मार्गदर्शनामुळे (career guidance) मुलाचा/मुलीचा अभ्यासात कल कुठे आहे हे
समजायला मदत होते. मुलांना/त्यांच्या पालकांना भविष्याची दिशा ठरविण्यासाठी ह्यामुळे खूपच मदत मिळते.
Token Economy - ही उपचार पद्धती मुलांमध्ये वागण्यातील
बदल घडवून आणण्यासाठी परिणामकारक आहे. मुलांना त्यांच्याकडून जे वागणे अपेक्षित आहे
ते समजावले जाते. तसे जेंव्हा मुले वागतील त्यावेळी त्यांना टोकन किंवा स्टार्स दिले
जातात. जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळते. लहान वयोगटासाठी-३ ते ६ वयापर्यंत शाळेत
याचा वापर करायला काहीच हरकत नाही.
Phobia (अनामिक भीती ) यावर Systematic Desensitization - ही थेरपी उपयोगी पडते. व्यक्तीला हळूहळू
त्त्याला वाटणारी भीती कशी खरी नाही? किंवा
सत्य कसे पडताळून पाहायचे? आपले
विचार कुठे आणि कशा प्रयत्नपूर्वक बदलायला हव्यात हे विचारपूर्वक लक्षात आणून दिले
जाते. शिकवले जाते.
Assertive training - आपल्या भावना योग्य शब्दामध्ये कशा व्यक्त
करायच्या?
मनात एखादी गोष्ट खटकत असेल तर ती अशा
पद्धतीने सांगितली गेली पाहिजे की जेणेकरून गैरसमज निर्माण न होता, नेमकं आपल्याला काय आवडत नाहीये हे दुसऱ्यापर्यंत
पोचले पाहिजे. यात स्वतः आणि दुसरा या दोघांचे अधिकार अबाधित राहतात. कामाच्या ठिकाणी
जर कधी त्रास /पिळवणूक होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो. त्यामुळे
योग्य शब्दांत ते अधिकाऱ्याच्या नजरेस आणून देणे आवश्यक असते. यात संवाद साधताना शब्द
कसे निवडायचे?
केंव्हा कोणत्या शब्दांचा वापर करायचा? याचे सकारण स्पष्टीकरण दिले जाते.
Stress management - खास करून ज्यांना खूप ताण-तणाव आहेत आणि
दिवसेंदिवस रोजचे आयुष्य जगणे त्रासदायक झाले आहे; अशावेळी आपल्या जवळ असलेल्या वेळेचं व्यवस्थापन
कसे करावे?,
व्यक्तिमत्वाची चाचणी, ताण निर्माण करणारी परिस्थिती याचा साकल्याने
विचार करून मग चिंता कमी कशी होईल, परिस्थितीकडे
पाहण्याचा नवीन दृष्टिकोन, रागावरचे
नियंत्रण,
सर्जनशील विचार यांची ओळख करून दिली जाते.
Cognitive Behavior Therapy - लोकांचे वागणे आणि त्यांना अनुभवास येणाऱ्या
भावना याला प्रामुख्याने व्यक्ती अनुभवाची रचना कशी करते यावर ठरते. जर एखादा भावनिक
अडचणीतून जात असेल तर त्याचे विचार आणि वागणे यात त्रुटी असू शकते. ते वास्तवाला धरून
असत नाही. मग ती व्यक्ती स्वतःला दोषी मानते, उदासीन, गोष्टी गृहीत धरून चालणे, पूर्वग्रहदूषित मतप्रवाह अशा पद्धतीने
विचार करते. त्यात त्या व्यक्तिचे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा अनेक स्तरावर बरेच नुकसान
होते. अशावेळी समुपदेशक कोणते विचार वास्तवाला धरून आहेत, कोणते नाहीत, हे कसे पडताळून पाहायचे याचे शिक्षण देतो.
या उपचार पद्धतीला थोडा वेळ लागतो. त्यामुळे ५-६ सेशन्स होऊ शकतात. पण ती नियमितपणे
न चुकवता घ्यावी लागतात. नंतर हळूहळू व्यक्तीच्या लक्षात येते की केवळ नकारात्मक विचार
आणि विश्वास हे जाणीवपूर्वक कसे दूर करता येतात!!!
योग केल्याने आपल्या भावना, मानसिकता, शारीरिक अवस्था या तिन्हींचे एकमेकांशी
असलेले परस्पर संबंध लक्षात येतात. त्यामुळे स्वयं ज्ञान, आत्मविश्वास वाढायला मदत होते. Breathing exercises/प्राणायामामुळे शरीराला ऑक्सीजन-प्राणवायू
मिळाल्याने ताजे तवाने वाटते. मरगळ निघून जाते. Deep Muscle Relaxation मुळे शरीराच्या प्रत्येक भागाकडे मुद्दाम
लक्ष वेधून त्याला रिलॅक्स करत करत पूर्ण शरीर रिलॅक्स करता येते. त्यामुळे शरीराला
आलेली थकावट दूर होण्यास मदत होते. तरतरी येते. सुरुवातीला एकदा समुपदेशकाच्या बरोबर
प्रॅक्टिस करा. अशा कितीतरी सोप्या आणि परिणामकारक उपचारपद्धती आहेत. विषय खूप मोठा
आहे. सगळ्याची माहिती खोलात जाऊन या लेखात देणे शक्य नाही.
समुपदेशन मालिकेतील हे शेवटचे पुष्प.
समुपदेशना बाबत मनातले प्रश्न ,समज, गैरसमज शंका , असलेला Taboo काही अंशी दूर करण्याचा मी एक प्रामाणिक
प्रयत्न केला. माझ्या अनुभवातून काही अडचणी सोडवणे किती सोपे जाते हे हि case studies ची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. जर कोणाला
काही प्रश्न असल्यास मला व्हाट्स अँप किंवा call करून विचारू शकता. मी ती शंका निरसन करण्याचा
निश्चित प्रयत्न करीन.
धन्यवाद
पूर्वा तुझ्या वेगळ्या लेखनामुळे समुपदेशनाचे वेगवेगळे पैलू वाचनात आले. खूप माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteखूप दिवसांनी काहितरी नविन वाचायला मिळाले..
ReplyDeleteसर्वच लिखाण उत्तम व उपयुक्त...
असेच लिहीत रहा व आम्हाला पाठवत रहा...