सावर रे

 

 

सावर रे मना, सावर रे,

गुंतलेल्या ह्या भावनांना
जरा आवर रे…..

सावर रे मना, सावर रे,

खोल ह्या जखमांवर मार जरा
फूंकर रे…..

 

सावर रे मना, सावर रे,

सुटून जे गेले, ते जरा विसर रे…..

सावर रे मना, सावर रे,

जवळ असती ते जतन जरा कर रे…..

 

सावर रे मना, सावर रे,

जीवन खरं काय जरा जाणं रे…..

सावर रे मना, सावर रे,

भरलेले सदा प्रेमाने असावे
घर रे…..


सावर रे मना, सावर रे,
पैश्यांमागे किती धावशील रे…..

सावर रे मना, सावर रे,

मित्रांविना काय करायचा
कुबेर रे…..

 

सावर रे मना, सावर रे,

कोणी असे जीवनाचा खरा आधार रे…..

सावर रे मना, सावर रे,

कोण नेईल भवसिंधु पार रे…..

 

सावर रे मना, सावर रे,

सदगुरू चरणाविना नाही ठाव रे…..

सावर रे मना, सावर रे,

सदैव ठेव हाचि भाव रे…..

 



    
प्राजक्ता सरपटवार पाठक

 








 

1 comment:

  1. जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या मनावर ताबा कसा ठेवावा याची ही कविता जाणीव करून देते

    ReplyDelete