शिशिर..

 


येणारा प्रत्येक शिशिर

सांगत राहतो मला

दिठीतून तुलाही चढतोय

रंग हळदुला...

 

मी नाकारतेच दरवेळेला

मिठी मारत राहते हिरवेपणाला...

'अवकाश आहे पण अटळ ही'

तो डोळे मिचकवत सांगतो मला

 

मग मीही खडसावते त्याला..

आलास तर ये...

मी नाहीच घाबरत पानगळीला

आणि नाही व्हायचंय मला ही ..पाचोळा....

 

फक्त हिरवाईचा रंग माझा

मात्र पूर्ण उतरु देशील खरा...!!

येणारा प्रत्येक शिशिर

सांगत राहतो मला......




   सौ विदुला जोगळेकर







1 comment: