श्री. राजनकर काकांची आणि माझी पहिली भेट साधारण २००४-०५ च्या सुमारास झाली. इंदिरानगर येथील ११ मेनच्या बागेत त्यांनी माझ्या बाबांना माझ्या मुलीसोबत मराठीत बोलताना ऐकले. तेव्हा त्यांनी आपण होऊन बाबांची ओळख करून घेतली, आणि नंतर मित्रमंडळामध्ये त्यांची व राजनकर काकूंची माझी भेट झाली.
त्यानंतर
आतापर्यंत अनेकदा भेटण्याचा योग आला आणि प्रत्येक भेट काही तरी शिकवून आणि प्रेरणा
देऊन गेली. आम्ही केव्हाही त्यांच्याकडे
गेलो की अगदी आपुलकीने आणि अगत्याने आमच्या बरोबर बोलायचे. काकू काही तरी खायला करायच्या किंवा मस्त
पैकी चहा तरी द्यायच्या. निघण्यापूर्वी
काका मात्र त्यांच्या बागेत जाऊन एखादे फळ किंवा घरी लावायला एक रोपटे आवर्जून
द्यायचे. त्यांनी नेहेमी हसतमुखाने केलेले अगत्य मी कधीच विसरू शकणार नाही.
हे माझे अनुभव असले तरी मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना काका काकूंच्या ह्या आपुलकीचा, अगत्याचा आणि आत्मीयतेचा असाच अनुभव आला असेल. अशाच आत्मीयतेने त्यांनी मित्रमंडळासाठी खूप काम केले. राजनकर काका व काकू मित्रमंडळाचे केवळ संस्थापक नव्हते तर ते आतापर्यंतच्या सर्व कार्यकारी समितीचे active सदस्य होते. प्रत्येक कार्यक्रमाच्या योजनेमध्ये त्यांचा पूर्ण सहभाग असायचा आणि त्यांना जमेल तशी सगळी मदत करायचे.
मंडळाचा
गणपती उत्सव म्हणजे त्यांचा आवडता कार्यक्रम. असे एकही वर्षं नसेल ज्या वर्षी काका
काकू गणपतीच्या पहिल्या दिवशी हजर नव्हते. गणेश पूजेचे सर्व साहित्य ते नित्य
नेमाने आणायचे.
काकांनी
मंडळात लेझीम पथक असावे अशी इच्छा व्यक्त केली, आणि त्यांनी स्वतः काही लेझीम विकत आणले. मित्रमंडळाच्या उत्साही कार्यकर्त्या सौ. पल्लवी ह्यांनी मनावर घेऊन लेझीम नृत्य बसवले आणि
गणेशोत्सवात सादर केले. काकांनी पाठ
पुरावा करून पुढाकार घेतलेल्या ह्या उपक्रमात मला सहभागी होता आले ह्यातच मला आनंद
आहे.
जानेवारी २०२१ मध्ये राजनकर काकूंनी ह्या जगाचा निरोप घेतला. मित्रमंंडळाला आईच्या मायेने मोठे करण्यात त्यांचा मोलाचा हातभार होता. मंडळ मोठे झाले तरीही काकूंची मंडळावरील माया तशीच होती. त्यानंतर बरोबर १ वर्षांनी म्हणजेच १३ जानेवारी २०२२ ला वयाच्या ९०व्या वर्षी श्री राजनकर काकांनी अखेरचा श्वास घेतला.
अनेक
वर्षे ह्या दोघांनी पाहिलेले मित्रमंडळाच्या प्रगतीचे स्वप्न, आपण सर्व सदस्यांनी मिळून पूर्ण करत राहू. माझ्या मते हीच त्यांना खरी
आदरांजली असेल.
सारंग गाडगीळ
V nice. Mitramandal memories r incomplete without kaka.
ReplyDeleteखरं च या उभयंतान कडुन खुप शिकता येणारे...।।
ReplyDeleteसारंग मनातले लिहीले... खुप आठवणी...
खूप आठवणी आणि चांगल्या च आठवणी आहेत.
Deleteसगळे लिहिता आले नाही
भावपूर्ण श्रद्धांजली!
ReplyDelete🙏
ReplyDelete