क्वचितच एक रविवार असाही यावा
बेधुंद पावसाच्या बेफाम सरींसवे दिवस
उजाडावा.
तनामनाची काहिली करण्याऱ्या ग्रीष्माला
टाटा बाय-बाय करावा
क्वचितच एक रविवार असाही यावा
चहाचा वाफाळणारा कप अलगद हातात गवसावा
पावसाळ्याचा नाष्टा सोबतीला असावा
बरसणारा मनोहारी पाऊस खिडकीतून निवांत
न्याहाळावा
क्वचितच एक रविवार असाही यावा
अवचितच योजलेल्या वर्षासहलीचा मनमुराद
आनंद लुटावा
ओल्या नागमोडी पायवाटेवरून स्वच्छंद विहरताना
निसर्गराजा शोधावा
हिरव्याजर्द वनश्रीतून पक्षांचा मंजुळ
किलबिलाट अनुभवावा
क्वचितच एक रविवार असाही यावा
संध्यासमयी कीबोर्डवर हलकेच हात फिरावा
घनघनमालाच्या ओल्याचिंब स्वरांनी सारा
आसमंत व्यापावा
वरुणराजाच्या स्वागतात मोकळा रविवार तुडुंब
भरावा
क्वचितच एक रविवार असाही यावा...
वा!
ReplyDelete